मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी आहे. त्याला नातेसंबंध, बांधिलकी जपायला आवडते. त्यासाठी तो वेगवेगळी नाती (Relations in Marathi) तयार करतो. प्रत्येक नात्याचे महत्त्व आणि मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्या चौकटीत राहूनच नातेसंबंध जपले जातात. त्या नात्याचे पावित्र्य राखले जाते. नात्यांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, काळजी या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. किंबहुना याच गोष्टींवर एखाद्या नात्याची नीव ठेवली जाते. काही नाती हि रक्ताची असतात तर काही मानलेली असतात. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत असलेली आपली नाती (Family Relations in Marathi) हि रक्ताची असतात तर काहीवेळा काही अनोळखी माणसांसोबत नाती तयार होतात. या लेखात आपण अशीच मराठीतील सर्व नात्यांची नावे पाहणार आहोत.
बऱ्याच लोकांना नात्यांची नावे माहित नसतात. अशा लोकांसाठी हा लेख खूपच फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये वडिलांकडील नात्यांची नावे (Paternal Relations in Marathi) आणि आईकडील नात्यांची नावे (Maternal Relations in Marathi) दिली आहेत.
कुटुंबातील नात्यांची नावे (Family Relations in Marathi)
१. पिता : वडील, बाबा (Father)
२. माता : आई (Mother)
३. वडिलांचे वडील : आजोबा (Grandfather)
४. आईचे वडील : आजोबा (Grandfather)
५. वडिलांची आई : आजी (Grandmother)
६. आईची आई : आजी (Grandmother)
७. आजोबांचे वडील : पणजोबा (Great Grandfather)
८. आजोबांची आई : पणजी (Great Grandmother)
९. वडिलांचा भाऊ : काका (Paternal Uncle)
१०. काकांची बायको : काकी (Aunt-in-law)
आणखी वाचा : प्राणी आणि त्यांची घरे
११. आईचा भाऊ : मामा (Maternal Uncle)
१२. मामाची बायको : मामी (Aunt-in-law)
१३. वडिलांची बहीण : आत्या (Paternal Aunt)
१४. आईची बहीण : मावशी (Maternal Aunt)
१५. मावशीचा नवरा : मावसा/ मावश्या
१६. वडिलांचा मोठा मुलगा : दादा/ सख्खा भाऊ/ मोठा भाऊ(Elder Brother)
१७. वडिलांचा छोटा मुलगा : भाऊ / सख्खा भाऊ (Younger Brother)
१८. वडिलांची मोठी मुलगी : ताई/ मोठी बहीण/ सख्खी बहीण (Elder Sister)
१९. वडिलांची छोटी मुलगी : बहीण / सख्खी बहीण (Younger Sister)
२०. काकांचा मुलगा : चुलत भाऊ (Cousin Brother)
आणखी वाचा : मानवी शरीराच्या अवयवांची नावे
२१. काकांची मुलगी : चुलत बहीण (Cousin Sister)
२२. मामाचा मुलगा : मामे भाऊ (Maternal Cousin Brother)
२३. मामाची मुलगी : मामे बहीण (Maternal Cousin Sister)
२४. आत्याचा मुलगा : आत्ते भाऊ (Cousin Brother)
२५. आत्याची मुलगी : आत्ते बहीण (Cousin Sister)
२६. मावशीचा मुलगा : मावस भाऊ (Cousin Brother)
२७. मावशीची मुलगी : मावस बहीण (Cousin Sister)
२८. भावाची बायको : भावजय/ वहिनी (Sister-in-law)
२९. बहिणीचा नवरा : जिज्याजी/ दाजी (Brother-in-law)
३०. भावाचा मुलगा : पुतण्या (Nephew)
आणखी वाचा : प्राण्यांची मराठी नावे
31. बहिणीचा मुलगा : भाचा (Nephew)
३२. भावाची मुलगी : पुतणी (Niece)
३३. बहिणीची मुलगी : भाची (Niece)
३४. नवऱ्याचे वडील : सासरे (Father-in-law)
३५. बायकोचे वडील : सासरे (Father-in-law)
३६. नवऱ्याची आई : सासूबाई (Mother-in-law)
३७. बायकोची आई : सासूबाई (Mother-in-law)
३८. नवऱ्याचा भाऊ : दीर (Brother-in-law)
३९. दीराची बायको : जाऊ (Sister-in-law)
४०. बायकोचा भाऊ : मेहुणा (Brother-in-law)
आणखी वाचा : मराठी महिन्यांची नावे
४१. नवऱ्याची बहीण : नणंद (Sister-in-law)
४२. नणंदेचा नवरा : नांदावा (Brother-in-law)
४३. बायकोची बहीण : मेहुणी Sister-in-law
४४. मेहुणीचा नवरा : साडू
४५. मुलीचा नवरा : जावई (Son-in-law)
४६. मुलाची बायको : सून : (Daughter-in-law)
४७. मुलाचा मुलगा : नातू (Grand Son)
४८. मुलाची मुलगी : नात (Grand Daughter)
इतर काही नाती (Other Relations in Marathi)
१. पती / नवरा : Husband
२. पत्नी / बायको : Wife
३. वधू / नवरी मुलगी : Bride
४. वर / नवरा मुलगा : Groom
५. मित्र : Friend (Male friend)
६. मैत्रीण : Friend (Female friend)
७. शेजारी : Neighbour
८. वारस : Heir
९. दत्तक मुलगा : Adopted son
१०. दत्तक मुलगी : Adopted Daughter
११. सावत्र बाबा : Step-father
१२. सावत्र आई : Step-mother
१३. सावत्र बहीण : Step-Sister
१४. सावत्र भाऊ : Step-Brother
१५. प्रियकर : Boyfriend
१६. प्रियसी : Girlfriend
आणखी वाचा : मराठी बालगीते
वाचकहो या लेखातील मराठीतील नात्यांची नावे याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि नाती समजून घ्यायला मदत करा.