भारतीय संस्कृतीमध्ये पंचांग म्हणून हिंदू कॅलेंडर चा वापर प्राचीन काळापासून होत आला आहे. यांमध्ये तिथींना खूप महत्त्व देण्यात आले आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो कि हि मराठी दिनदर्शिका (Marathi Months Name in Marathi) पूर्णपणे तिथींच्या आधारे बनवलेली असते. आपल्या संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्त्व आहे. मराठी कॅलेंडर मध्ये हे सण तिथीनुसार कधी साजरे केले जातात हे दर्शविलेले असते.
इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मराठी कॅलेंडर मध्ये हि १२ महिने आहेत. इंग्रजी कॅलेंडर ची सुरुवात जानेवारी महिन्याने होते तर मराठी कॅलेंडर ची सुरुवात चैत्र महिन्याने होते. यातील महिने हि ३० किंवा ३१ दिवसांचे असतात. प्रत्येक महिन्याचे दोन भागात विभाजन केलेले असते. या भागांना पंधरवडा किंवा पक्ष असे म्हणतात. एका महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात.
आपली मराठी संस्कृतीमध्ये मराठी दिनदर्शिका फार महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या लेखात आपण मराठी महिन्यांची नावे (Marathi Mahinyanchi Nave) आणि त्यांची माहिती पाहणार आहोत.
मराठी महिन्यांची नावे (List of Marathi Months Name)
- चैत्र (Chaitra)
- वैशाख (Vaishakh)
- ज्येष्ठ (Jeshtha)
- आषाढ (Aashadh)
- श्रावण (Shravan)
- भाद्रपद (Bhadrapad)
- आश्विन (Ashwin)
- कार्तिक (Kartik)
- मार्गशीर्ष (Margshirsh)
- पौष (Paush)
- माघ (Magh)
- फाल्गुन (Falgun)
मराठी महिने आणि त्यांची माहिती (Marathi Months Information in Marathi)
1. चैत्र (Chaitra)
हिंदू कॅलेंडर ची सुरुवात चैत्र महिन्याने होते. वसंत ऋतू मध्ये मराठी वर्षाची सुरुवात होते. त्यावेळी निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. चैत्र महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण, उत्सव साजरे केले जातात. चैत्र शुद्ध एकादशीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. मराठी संस्कृती मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते असे मानले जाते. यांशिवाय रामनवमी, वसंत पंचमी हे महत्त्वाचे सण ही चैत्र महिन्यात साजरे केले जातात. विविध आठवणींच्या दरम्यान चैत्र महिना आपल्या जीवनात सुखाची आणि सौख्याची अनुभूती करू देतो.
2. वैशाख (Vaishakh)
हिंदू कॅलेंडर मधील दुसरा महिना म्हणजे वैशाख. हा महिना साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान येतो. चैत्र महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक महत्त्वाचे दिवस येतात.
अक्षय तृतीया: या दिवसाला हिंदू कॅलेंडर मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तां पैकी एक मानला जातो. या दिवशी मानसिक आणि शारीरिक समृद्धीसाठी पूजा आणि दान देण्याची परंपरा आहे.
वैशाख पूर्णिमा: वैशाख महिन्याच्या पूर्णिमेला एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आयोजित होतो. वैशाख पूर्णिमेला पूजन केलेल्या तुलसीपत्रांचा वापर करून श्रीकृष्ण व राधेचे पुजन केले जाते.
गंगा दशहरा: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गंगा स्नान केलेले जाते आणि गंगाजल घेण्याची परंपरा आहे.
अक्षय नवमी: वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात अक्षय नवमी व्रत आयोजित होतो. या दिवशी धार्मिकपणे वृद्धावस्था वाटप व्रत केले जाते.
वैशाख आमावस्या: हे व्रत वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात अमावास्येच्या दिवशी आयोजित केले जाते. या दिवशी धार्मिकपणे पितृ पूजन केले जाते.
3. जेष्ठ (Jeshtha)
मराठी कॅलेंडर मधील हा तिसरा महिना सर्वात उष्ण असतो. साधारणतः मे आणि जून महिन्यांदरम्यान हा महिना येतो. जेष्ठ महिन्यात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.
4. आषाढ (Aashadh)
मराठी दिनदर्शिकेमधील हा चौथा महिना हे. हा महिना साधारणतः जून आणि जुलै या महिन्यांदरम्यान येतो. आषाढ महिन्यात वर्षातील पावसाळ्याची सुरवात होते. यावेळी शेतीच्या कामांना सुरुवात होते. आषाढ महिन्यात दिवस जरा जास्तच मोठा असतो. या महिन्यात महाराष्ट्रात गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे प्रमुख उत्सव साजरे केले जातात.
5. श्रावण (Shravan)
श्रावण (Shravan) महिन्याला हिंदू पंचांगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. विक्रम संवत्सरानुसार, हा महिना जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. या महिन्यातील श्रावणी सोमवारांचे व्रत प्रसिद्ध आहे. अनेक स्त्रिया तसेच पुरुष हे व्रत मनोभावे पूर्ण करतात. श्रावण महिन्यातील दुसरं प्रमुख उत्सव म्हणजे नाग पंचमी आहे. या दिवशी भगवान शेषनागाचे पूजन केले जाते. याशिवाय नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे महत्त्वाचे सण देखील याच महिन्यात साजरे केले जातात.
6. भाद्रपद (Bhadrapad)
हिंदू कॅलेंडर मधील सहावा महिना म्हणजे भाद्रपद. हा महिना साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर यांदरम्यान असतो. या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आणि खूपच उत्साहाने साजरा केला जाणार सण म्हणजे गणेश चतुर्थी. आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणून लोक त्याची मनोभावे पूजा करतात.
7. अश्विन (Ashwin)
अश्विन हा हिंदू कॅलेंडर मधील सातवा महिना आहे. हा महिना साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर यांदरम्यान येतो. अश्विन महिन्यामध्ये नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी किंवा दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी हे सण उत्साहाने साजरे केले जातात.
8. कार्तिक (Kartik)
हिंदू वर्षातील हा आठवा महिना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान येतो. या महिन्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाचे सण उत्सव साजरे केले जातात. यांमध्ये बलिप्रतिपदा, भाऊबीज, गोकुळाष्टमी या सणांचा समावेश आहे.
9. मार्गशीर्ष (Margshirsh)
मार्गशीर्ष हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. हा महिना साधारणपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर यांदरम्यान येतो. दत्त जयंती आणि लक्ष्मी पूजा हे या महिन्यात येणारे सण आहेत.
10. पौष (Paush)
पौष हा मार्गशीर्ष नंतर येणारा हिंदू कॅलेंडर मधील दहावा महिना आहे. हा महिना डिसेंबर ते जानेवारी यांदरम्यान येतो. मकर संक्रांत हा सण या महिन्यात साजरा केला जातो. परंतु पौष महिन्याला अशुभ महिना असे मानले जाते. कोणतेही शुभकार्य या महिन्यामध्ये केले जात नाही.
11. माघ (Magh)
हिंदू पंचांगातील अकरावा महिना म्हणजे माघ. साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी यांदरम्यान हा महिना येतो. महाशिवरात्री हा या महिन्यात येणारा आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.
12. फाल्गुन (Falgun)
फाल्गुन हा हिंदू पंचांगातील बारावा आणि शेवटचा महिना आहे. फेब्रुवारी ते मार्च यांदरम्यान हा महिना येतो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी होलिकादहन होते. होळी, शिमगा, रंगपंचमी हे या महिन्यामध्ये साजरे केले जाणारे सण आहेत.
मित्रानो या लेखात आपण मराठी महिन्यांची नावे (marathi months name)आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये अभिप्राय लिहून कळवू शकता. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.