डोहाळे जेवण गाणी | Dohale Jevan Songs in Marathi

| |

या लेखात आपण डोहाळे जेवणाच्या वेळी गायली जाणारी गाणी (Dohale Jevan Songs in Marathi) पाहणार आहोत. नवीन बाळाच्या आगमनाची चाहूल हि प्रत्येक नवदांपत्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाची पर्वणी असते. हे बाळ सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख समाधान आणि भरभराट घेऊन येणार असत. त्यामुळे त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होते.

नऊ महिने बाळ आईच्या पोटात असते. पोटातच त्याची हळू हळू वाढ होत असते. त्याचे शरीर आकार घेत असते. साधारणतः पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. बाळ थोडी थोडी हालचाल करू लागते. या बाळाच्या काही इच्छा असतात त्यानुसार आईला त्या गोष्टी खाण्याची इच्छा होते. यालाच डोहाळे लागणे असे म्हणतात. थोडक्यात डोहाळे म्हणजे बाळ आईमार्फत आपल्या इच्छा पूर्ण करून घेते. साधारणतः सातव्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ झालेली असते. अशा वेळी बाळाला जास्त पोषणाची आवश्यकता असते. या महिन्यातच डोहाळे जेवण आयोजित केले जाते. या वेळी होणाऱ्या आईची ओटी भरली जाते. त्यामुळे या कार्यक्रमाला ओटीभरण कार्यक्रम (Baby Shower Marathi Songs) असेही म्हणतात.  डोहाळे जेवणाला होणाऱ्या आईची इच्छा असलेले सर्व पदार्थ बनविले जातात अर्थात बाळाचे चोचले पुरवले जातात. 

आनंदी वातावरण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते. डोहाळे जेवणाची गाणी गायली जातात. (Dohale Jevan Marathi Songs Lyrics) छोटे छोटे गमतीशीर खेळ खेळले जातात. यामध्ये पेढा कि बर्फी हा तसा प्रसिद्ध खेळ आहे. या खेळात २ बंद वाट्या घेतल्या जातात. एका वाटीत पेढा तर दुसऱ्या वाटीत बर्फी ठेवली जाते. नंतर होणाऱ्या आईला त्यापैकी कोणतीही एक वाटी निवडायला सांगितली जाते. जर पेढा निवडला तर होणारे बाळ हे मुलगा असेल आणि बर्फी निवडली तर मुलगी असेल असं मानलं जातं. वास्तवाशी याचा काही संबंध नसतो. हा खेळ फक्त मनोरंजन म्हणून खेळला जातो. 

डोहाळे जेवण गाणी (Dohale Jevan Songs in Marathi)

१. ग कुणीतरी येणार येणार ग (Ga Kunitari Yenar Yenar Ga Lyrics in Marathi)

चांदण्यात न्या गं हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा……२

भोवतालची बस तिला काव हवं ते पुसा तिचे डोहाळे पूरवा, हो हो डोहाळे पूरवा

गं कुणीतरी, गं पारुताई,

गं कुणीतरी येणार येणार गं…..२

पाहुणा घरी येणार येणार गं, घरी येणार येणार गं

गं कुणीतरी येणार येणार गं…..२

पाहुणा घरी येणार येणार गं

इवलस नाजूक पाउल बाई, हळूच आतून चाहूल देई….२

गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला…….२

हो चाला, हो चाला साजीव होणार गं, गं चाला साजीव होणार गं,

गं कुणीतरी येणार येणार गं…..२

पाहुणा घरी येणार येणार गं

होणार जे ते कसा दिसेल गं, मुलगा असे तो की मुलगी असेल गं…..२

कोणी असो तो किंवा ती, फरक तुला सांग पडतो किती……२

शेवटी आई तू, अगं आई तू होणार गं, शेवटी आई तू होणार गं

गं कुणीतरी येणार येणार गं…..३

पाहुणा घरी येणार येणार गं, घरी येणार येणार गं

गं कुणीतरी येणार येणार गं…..२

पाहुणा घरी येणार येणार गं

२. डोहाळे पुरवा (Dohale purava lyrics in Marathi)

डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा..
झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा..
भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा..
वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा..
पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा
सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा
तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌
कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली
महिन्यात सहाव्या थकलं ग पाऊल
सासर्‍यास लागंल कान्‍ह्याची चाहूल
पहिलीच खेप ही जाणवोनी मुळी देवा
लाजर्‍या वेलीला नकळत बहरही यावा
नववा भरुनिया मुलगीच ग व्हावी
व्हावी ती झाशीची राणी
नववा भरुनिया पुत्र पोटी यावा
भारती जवाहीर व्हावा

३. मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा (Dohale Purva Marathi Dohale Jevan Song Lyrics)

मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
कैरी हवी कि चिंचा बोर हौस हिची पुरवा
कैरी हवी कि चिंचा बोर हौस हिची पुरवा
फुलाफुलांच दागदागिनं राणीला चढवा
फुलाफुलांच दागदागिनं राणीला चढवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
ला ला ला ला ला ला ला
आईपणाचं भाग्य थोर ग
चंद्र असे कि चंद्रकोर ग
सौभाग्याचं अभंग लेणं चांदण्यात सजवा
सौभाग्याचं अभंग लेणं चांदण्यात सजवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
कैरी हवी कि चिंचा बोर हौस हिची पुरवा
ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला
संसाराचं सार्थक होई
या भाग्याला उपमा नाही
संसाराचं सार्थक होई
या भाग्याला उपमा नाही
मुकुटामधुनी चंद्र सूर्य ग हौसेनं जडवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा
कैरी हवी कि चिंचा बोर हौस हिची पुरवा
फुलाफुलांच दागदागिनं राणीला चढवा
मैतरणीच सईबाईच डोहाळ पुरवा

४. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या (Kuni govind ghya kuni gopal ghya Lyrics in Marathi)

कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या
या ग सयांनो, या ग या
अविनाशी हा आनंद घ्या
चिरंतनाचा सुगंध घ्या

नभात फुलवी गोड चांदण्या, बाळच ग हसतो
महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो
दुष्टांना का हुंकारुन ग दहशत हा भरतो
राजफुलाचा विकास घ्या,
चैतन्याचा सुहास घ्या

चार दिशांचे चौखुर सुंदर पृथ्वीच्या पाळणी
नक्षत्रांचे छत्रकमल हे झुलत्या सिंहासनी
हसवा रिझवा शिवरायाला जो जो ग गाउनी
युगायुगाचा सारंग घ्या,
क्रांतीचा हा आरंभ घ्या

५. हले हा नंदाघरी पाळणा (Hale Ha Nandaghari Palna lyrics in Marathi)

हले हा नंदाघरी पाळणा

त्यात देखणा गोजिरवाणा, हसतो गोकुळराणा 

ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून त्या फुले चांदणे

स्वरुप सुंदर लोभसवाणे, मोहून घेई मना 

बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे

रुणझुणताती घुंगुरवाळे, ये धेनूना पान्हा 

नंद यशोदा करिती कौतुक, आनंदाचे अमाप ते सुख

मायपित्याविण कसे कळावे, सौख्य तयाचे कुणा

६. जन्म बाईचा (Janma Baicha Dohale Jevan Song Lyrics in Marathi)

हम्म……
आ….
जन्म बाईचा बाईचा खूप घाई चा
एक आई चा आईचा एक ताई चा….२
हम्म…..

बाहुली हो ती खेळ खेळाया ……२
जाहली मोठी मोहरे काया ……२
घम घमे सारा, गंध जाई चा
जन्म बाईचा बाईचा खूप घाई चा
एक आई चा आईचा एक ताई चा….२
हम्म…..

काय मी सांगू काय हे झाले
का तुला कहाले मागणे आले
माय हि सांगे अर्थ माये चा….२
जन्म बाईचा बाईचा खूप घाई चा ……२
एक आई चा आईचा एक ताई चा

७. ओटी भरा ग (Oti Bhara G Dohale Jevan Song Lyrics in Marathi)

आ आ आ आ SS आ आ आ आ स

ओटी भरा ग भरा ग 

ओटी भरा ग भरा ग….

ओटी भरा ग भरा ग ,

हिची खणा नारळांनी 

हिची खणा नारळांनी (कोरस)

आ आ आ आ SS 

शालू हिरवा नेसवा 

जरी बुट्टीचा रेशमी 

शालू हिरवा नेसवा 

जरी बुट्टीचा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS 

ओटी भरा ग भरा ग ,

हिची खणा नारळांनी 

खणा नारळांनी (कोरस)

हीच रूप गोर पान

मूर्तिमंत लक्षुमीच 

सात जन्मीचे हे लेण भाळी शोभे कुंकवांचं

आ आ आ आ SS 

आ आ आ आ SS 

हीच रूप गोर पान

मूर्तिमंत लक्षुमीच 

सात जन्मीचे हे लेण भाळी शोभे कुंकवांचं

झुला सजवा फुलांनी 

झोका हळू द्या साजणी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी 

आ आ आ आ SS 

ओटी भरा ग भरा ग ,

हिची खणा नारळांनी 

खणा नारळांनी (कोरस)

भरलेल्या या ओटीत स्वप्न सुखाचं भारलं 

बाळा जो जो रे म्हणाया मन माझा रे आतुरल 

भरलेल्या या ओटीत स्वप्न सुखाचं भारलं 

बाळा जो जो रे म्हणाया मन माझा रे आतुरल 

माझं सोनुलं गोनुल 

मला दिसे या लोचनी 

माझं सोनुलं गोनुल 

मला दिसे या लोचनी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS 

ओटी भरा ग भरा ग ,

हिची खणा नारळांनी 

खणा नारळांनी (कोरस)

आज माझ्यापाशी माझं

सौभाग्य हे मोलाचं 

सर्व सुखाच्या क्षणात 

रूप बाहेर स्वर्गाचं

मला मिठीत घेऊनि 

मला मिठीत घेऊनि स्वर्ग बोले माझ्या कानी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी 

हीच डोहाळ पुरवा 

शालू नेसवा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS 

ओटी भरा ग भरा ग ,

हिची खणा नारळांनी 

खणा नारळांनी (कोरस)

या लेखातील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट द्वारे जरुर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

dohale jevan songs lyrics, dohale jevan marathi songs lyrics, dohale jevan songs list, dohale jevan gani, dohale jevan songs in marathi, oti bharan songs in marathi, dohale gani, dohale songs marathi, oti bharan songs, dohale jevan songs marathi, dohale jevan kavita in marathi, marathi dohale jevan songs list, dohale jevan marathi songs, dohale songs, डोहाळे जेवणाची गाणी, dohale geet, dohale jevan kavita, dohale jevan in marathi

Previous

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती | Solar System Planets Information in Marathi

Next

Leave a Comment