आमच्या मराठी खबर.कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
खासगीपण व वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपण्याच्या आपल्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या ऑनलाईन व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.
आम्ही कोणती माहिती गोळा करतो, का गोळा करतो आणि आपण आपली माहिती कशी व्यवस्थापित करू किंवा हटवू शकता हे समजण्याकरता आमचे गोपनीयता धोरण आपल्याला मदत करेल.
मराठी खबरच्या गोपनीयता धोरणाविषयी अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता.
माहिती जमा करणे आणि स्वयंचलनाने साठवणे
जर आपण आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, माहिती वाचलीत किंवा काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही आपल्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो.
या माहितीवरून आपली नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये आपण कोणते ब्राऊजर वापरता (उदा. गुगल क्रोम, एज, इंटरनेट एक्सप्लोरर, इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरता (उदा. विंडोज १० किंवा मॅक ओएस इ.) आणि इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव, तारीख आणि आपण भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना आपण भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते.
काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये व मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊझिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.
व्यक्तिगत माहिती जमा करणे
आपण आपली माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो.
एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि आपली आवड अशी माहितीसुध्दा आम्ही जमा करतो.
विविध कारणांसाठी ती वापरली जाऊ शकते. उदा. आपण आपले नाव आणि ईमेल आयडीची नोंदणी आमचे न्यूजलेटर मिळवण्यासाठी, बातमी पाठवण्यासाठी अथवा एखाद्या चर्चेत भाग घेऊन त्यावर प्रतिक्रिया पाठवण्यासाठी करू शकता.
आपण दिलेली माहिती पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.
त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक देण्यात दिली जाते.
या संकेतस्थळांचे गोपनीयता धोरण मराठी खबर संकेतस्थळाच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल.
या संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांनी त्या संकेतस्थळांच्या गोपनीयता धोरणाची व्यवस्थित चौकशी करावी. कारण त्यांच्या गोपनीयता धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.
आपण आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ जाहिरात संस्थेमार्फत (उदा. गुगल, अमेझॉन) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे जाहिरातदार आपल्या ब्राऊझरवर काही कूकीज ठेवू शकतात.
त्यामार्फत आपण भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती (आपले नाव, पत्ता, ई-मेल इत्यादींचा समावेश यामध्ये असणार नाही.) गोळा केली जाऊ शकते.
आवडीच्या वस्तू अथवा सेवांच्या जाहिराती आपल्यापयर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
इतर संकेतस्थळांना जोडणे
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे गोपनीयता धोरण आमच्या अखत्यारित येत नाही.
ज्यावेळेस आपण आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल, तेव्हा आपण पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे संबंधित संकेतस्थळाच्या गोपनीयता धोरणानुसार असतील.
त्यामुळे आपण त्यांचे गोपनीयता धोरण वाचून पुढील कारवाई करावी, असा सल्ला आम्ही देतो.
प्रश्न/तक्रारीचे निराकरण:
निराकरणाची पध्दत: आपण पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्या ‘तक्रार निवारण’ ई-मेल वर (marathikhabar.newswebsite@gmail.com) इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.
आपल्या तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश करावा ही विनंती.
१) आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, ई-मेल आयडी व सुरु असलेला भ्रमणध्वनी क्रमांक
२) बातमी अथवा लेखाचा मथळा, दिनांक आणि संबंधित वेबपेज लिंकबरोबर तक्रारीचा विषय आणि ओळखीसाठी म्हणून आपण पुरवलेल्या माहितीचा उल्लेख अवश्य करावा.
३) माहिती वैयक्तीक अथवा संवेदनशील व्यक्तीगत आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
४) आपण आपल्या तक्रारीला पूरक म्हणून काय कागदपत्रे जोडली आहेत त्याचा तपशील देणे आवश्यक आहे.
५) आपल्या तक्रारीसोबत सादर केलेली कागदपत्रे आणि माहिती पूर्ण आणि अलिकडच्या काळातील असून असत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
६) तक्रार नोटीस पत्र किंवा ई-मेलमधील माहिती बिनचूक असली पाहिजे आणि ज्या बद्दल तक्रार केली आहे तो विषयही संयुक्तिक असला पाहिजे, या बद्दलचे निवेदन.
७) आपल्याला आमच्या गोपनीयतेच्या धोरणाबाबत काही प्रश्न अथवा सूचना असतील तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
तक्रार कार्यासाठी दर्शविलेल्या ई-मेल खेरीज अन्य कोणत्याही प्रकारे संपर्क साधल्यास त्याची जबाबदारी मराठी खबर घेणार नाही
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबाबत तक्रार कराल तेव्हा ती थेट त्या व्यक्तीशीच संबंधित असली पाहिजे. तसेच आपण नोंदवलेल्या घटनेशी त्या व्यक्तीचा थेट संबंध असला पाहिजे. वाद-विवाद निर्माण होऊ शकणारी, एकांगी किंवा दूरस्थ/ओढून ताणून संबंध जोडलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
(शेवट संपादित केल्याचा दिनांक: ०६ फेब्रुवारी २०२१)