गेल्या काही दिवसांपासून जुने वाहन भंगारात काढण्याविषयीचे धोरण (Vehicle Scrappage Policy 2021) चर्चेत आहे.
या धोरणाविषयी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी लोकसभेत बोलताना म्हणाले की या धोरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
इतकेच नाही तर जुन्या वाहनांना रस्त्यावरुन दूर करून प्रदूषण कमी करता येणार आहे.
येत्या काही महिन्यांत हे धोरण अधिसूचित करण्यात येईल असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.
या धोरणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले या धोरणाअंतर्गत वेळोवेळी वाहनाची फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे.
स्वयंचलित सर्व्हिस सेंटर
ही फिटनेस टेस्ट घेण्यासाठी ऑटोमेटेड सर्व्हिस सेंटर वर काम करण्यात येत आहे.
या स्वयंचलित फिटनेस टेस्ट पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप मॉडेल च्या आधारे तयार करण्यात येणार आहेत.
या स्वयंचलित फिटनेस टेस्टसाठी दहा हजार करोड़ रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून जवळपास पस्तीस हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
फिटनेस टेस्ट मध्ये अयशस्वी ठरलेल्या वाहनांना दंड भरावा लागणार आहे.
या धोरणामुळे ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये वृद्धि होणार आहे
त्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
निर्यात वाढणार आहे. GDP मध्ये वृद्धि दिसून येणार आहे.
याशिवाय दरडोई उत्पन्न वाढेल. तसेच प्रदूषण कमी होईल.
नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचाही फायदा होईल असे नितिन गडकरी यावेळी म्हणाले.
रोजगाराच्या संधी उपलब्ध
याशिवाय चालक प्रशिक्षक संस्थानची आपल्या देशात कमी आहे.
जवळपास २२ लाख चालकांची पदे रिक्त आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त चालक प्रशिक्षक संस्था सुरु करण्यावर भर देण्यात येत आहे.
या संस्था प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात येणार आहेत यामुळे डायरेक्ट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. असेही ते म्हणाले.
देशातील वाहन क्षेत्राच्या दृष्टीने हे धोरण अतिशय चांगले मानले जात आहे.