आरती संग्रह | Aarti Sangrah

| |

या लेखात आपण आरती संग्रह (Aarti Sangrah) पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवता आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धे नुसार वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करत असतो. अशाच काही देवी देवतांच्या आरती या लेखात दिल्या आहेत. आशा करतो पूजा करताना या आरती तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

संपूर्ण आरती संग्रह | Marathi Aarti Sangrah

१. श्री गणपतीची आरती (Ganapati Aarti)

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणीरक्षावे सुरवरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

२. शेंदूर लाल चढायो (Shendoor Lal Chadhayo Aarti)

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको,
दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ,
हाथ लिए गुड़-लड्डू साईं सुरवरको ,
महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको,

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता II

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी,
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी,
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी,
गंड-स्थल मदमस्तक झूले शाशिहारी,

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता II

भावभगत से कोई शरणागत आवे,
संतति संपती सभी भरपूर पावे,
ऐसे तुम महाराज मोको अति भावे,
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे.

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता II

३. श्री विठोबाची आरती (Pandurangachi Aarti)

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥

जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

तुळशीमाळा गळा कर ठेवुनि कटीं।
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥

जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वन माळा गळा।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥

जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती।
चंद्रभागे माझी सोडुनिया देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥

जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥

जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाई वल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा॥

४. श्री शंकराची आरती (Shankarachi Aarti)

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केलें।
त्यामाजी अवचित हलाहल जें उठले।
ते त्वां असुरपणें प्राशन केलें।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

५. श्री रामाची आरती (Shri Ram Aarti)

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा॥

ठकराचे ठाण वारी धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा॥

६. श्री दुर्गा देवीची आरती (Durga Aarti)

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

७. स्वामींची आरती (Swaminchi Aarti)

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी,
पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी।
लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।
श्वासा संगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी ।
अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति ।
सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी ।
सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।।

अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा ।
पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।
अल्पचि भिक्षा घालुनी स्वामी, न्यावे मज संगती ।
सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती

८. गणराया आरती ही तुजला (Ganaraya Aarti)

गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥

रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥

भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥

गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥

भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥

९. दशावताराची आरती (Dashavtar Aarti)

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।

मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥

दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी । प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥

सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥

नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥

पितृवचना लागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें । नंदाघरि  जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥

गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥

म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७॥

१०. कर्पूरगौरा गौरिशंकरा (Karpurgaura Aarti)

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।

नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ ध्रु० ॥

त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।

उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥

तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।

नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।

नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ ध्रु० ॥

ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।

जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥

सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।

मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥

११. धन्य धन्य हो प्रदक्षिणा (Dhanya Dhanya Ho Pradakshina Aarti)

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची।।  

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभवी ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।। 

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशि, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी ।। 

मृदुंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती,  नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ।।  

कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।।   

प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला,  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

१२. ज्ञानराजा आरती (Dnyanraja Aarti)

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा |

सेविती साधुसंत ||

मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |

हित नेणती कोणी |

अवतार पांडुरंग |

नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |

उभ्या गोपिका नारी |

नारद तुंबर हो ||

साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |

विश्र्व ब्रम्हाची केलें |

रामजनार्दनी |

पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

१३. आरती विठ्ठलाची (Vitthal Aarti)

येई हो विठ्ठले माझे माउली ये ||

निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ||

आलिया गोलिया हाती धाडी निरोप |

पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |

गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||

विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||

असो नासो भाव आम्हा तुज्या थाया

कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया || ४ ||

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

१४. साईबाबा आरती (Saibaba Aarti)

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।
मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।

जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।

तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।

आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।

माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।

इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

१५. तुला खांद्यावर घेईन (Tula Khandyavar Ghein)

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन

साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||

पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान

साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||

वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड

तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||

माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई

तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||

पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन

साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||

१६. श्री गुरुदत्ताची आरती (Guru Dattachi Aarti)

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।

नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।

सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।

परा ही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। जय देव जय देव

दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।

प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। जय देव जय देव

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।

मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।। जय देव जय देव

१७. श्री महालक्ष्मीची आरती (Shri Mahalakshmi Aarti)

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी

वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता

पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता

कमलाकारे जठरी जन्मविला धाता

सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी

झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि

माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी

शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय.

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी

गायत्री नीजबीजा निगमागमसारी

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी

मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी

वारी माया पटल प्रणमत परिवारी

हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी

मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.

१८. श्री कृष्णाची आरती (Shri Krushnachi Aarti)

ओवालू आरती मदनगोपाळा।

श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।

ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

मुखकमल पाहता सूर्याचिया कोटी।

वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।

तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

एका जनार्दनी देखियले रूप।

रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

१९. श्री तुकारामाची आरती (Shri Tukaram Aarti)

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥
आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

राघवे सागरात ।
पाषाण तारीले ॥
तैसे हें तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ॥
आरती तुकाराम ॥

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ॥
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

आरती तुकाराम ।
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

२०. देवा देवीची निरोप आरती (Deva Devinchi Nirop Aarti)

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।

वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो

प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना

रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे

तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया

प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी

हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी

कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी

आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी

चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

२१. मंत्रपुष्पांजली मंत्र (Mantra Pushpanjali)

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।

स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

२२. घालिन लोटांगण (Ghalin Lotangan Aarti)

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

Previous

फुलांची नावे | Flowers Name in Marathi

मराठी सुविचार | Marathi Suvichar 

Next

Leave a Comment