मित्रांनो या लेखात आपण वेगवेगळ्या फुलांचे नावे पाहणार आहोत. (Flowers Name in Marathi) आपण आपल्या सभोवताली अनेक प्रकारची फुले पाहतो. प्रत्येकाचा रंग, आकार, सुगंध वेगवेगळा असतो. काही फुले देवाच्या चरणी अर्पण केली जातात तर काही फुले केसांत माळून आपले सौंदर्य फुलवतात. काही वेळा आपल्याला त्यातील सगळ्याच फुलांची नावे माहित नसतात. कधी मराठी नाव माहित असते पण इंग्रजी नाव माहित नसते तर कधी इंग्रजी नाव माहित असते परंतु मराठी मध्ये त्या फुलाला काय म्हणतात हे आपल्याला माहित नसते. म्हणूनच या लेखात आपण फुलांची इंग्रजी आणि मराठी (Marathi Flower Names) अशी दोन्ही नावे पाहणार आहोत.
फुलांची नावे (Flowers Name in Marathi)
Rose : गुलाब
Hibiscus Flower : जास्वंद
Lotus Flower : कमळ
Jungle Geranium : रुग्मिनी
Crossandra : अबोली
Tuberose : निशिगंध ची फूले
Saussurea Obvallata : ब्रम्ह कमळ
Chrysanthemum : शेवंती
Golden Frangipani : सोनचाफा
Jarul Flower : ताम्हण
Bluewater Lily : नील कमळ
Cypress Vine : गणेशवेल
Periwinkle Flower : सदाफुली
Jasmine : चमेली
Night-blooming Jasmine : रातराणी
Yellow Marigold : पिवळा झेंडू
Sunflower : सूर्यफूल
Oleander Flower : कण्हेर
Jasminum Grandiflorum : जाई
Common Jasmine : जुई
Orange Tiger Lily : टाइगर लिली
Coral Jasmine : पारिजातक
Arabian Jasmine : मोगरा
Orange Jasmine : कुंती
Narcissus : नर्गिस
Delonix Regia : गुलमोहर
Blue Pea : गोकर्णी
Lantana Camara : तणतणी, घाणेरी
Canna Indica : कर्दळ
Rangoon Creeper : मधुमालती
Cockscomb Flower : कुर्दु, कुरदा
Daisy Flower : गुलबहार
Hollyhock Flower : गुलखैरा
Common Flax : अळशी
Water Primrose : पाण लवंग
Mexican Tuberose : रजनीगंधा
Indigo Flower : नीळ फुल
Common Crape Myrtle: डायती
Datura alba Flower : पांढरा धोतरा
Yellow Oleander : पिवळा कनेर
Crape Jasmine : तगर चे फूल
Frangipani : चाफा
Giant Milkweed : रूई
Foxtail Orchid : सीतेची वेणी, गजरा
Peacock Flower : शंकासुर
Tulip Flower : कंद पुष्प
Prickly Pear Cactus : निवडुंग
काही रोचक तथ्य
१. भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
उत्तर : कमळ.
२. भारतातील सर्वात मोठे फुल कोणते ?
उत्तर : टायटन अरम हे भारतातील सर्वात मोठे व सर्वात उंच फुल आहे.
३. असे कोणते फुल आहे कि जे आपण खाऊ शकतो ?
उत्तर : गुलाबाच्या फुलापासून बनविलेले गुलकंद आपण खाऊ शकतो.
४. जगातील सर्वात मोठे फुल कोणते ?
उत्तर : इंडोनेशिया देशात सापडणारे रॅफ्लेशिया अर्नोल्डी हे जगातील सर्वात मोठे फुल आहे. ते जवळपास ३ फुट लांब व १५ किलो वजनाचे असू शकते.
५. फुलांचा राजा किंवा राणी म्हणून कोणते फुल ओळखले जाते ?
उत्तर : गुलाब.
६. सर्वात सुगंधी फुल कोणते ?
उत्तर : लव्हेंडर.
७. जगातील सर्वात महाग फुल कोणते ?
उत्तर : जुलीयेट गुलाब.
हि फुलांची नावे तुम्हांला माहित होती का आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.