Sachin Tendulkar Tested Corona Positive
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे.
त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करत सचिनने याबद्दल माहिती दिली.
सचिन तेंडुलकर क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू आहे.
क्रिकेट विश्वातील अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.
छत्तीसगढ रायपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सचिनने भारतीय लेजंड्स संघाचे नेतृत्व केले होते.
सचिनच्या नेतृत्वाखाली भारतीय लेजंड्स संघाने हा चषक आपल्या नावावर केला होता.
परंतु काही दिवसांपासून सचिनला कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळून आली.
चाचणी केल्यानंतर सचिन कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. (Sachin Tendulkar Tested Corona Positive)
घरातील इतर व्यक्तींची चाचणी नेगेटिव्ह आल्याचं सचिनने सांगितले आहे
“मी माझी चाचणी केली आहे आणि कोरोनाला दूर करण्यासाठी योग्य खबरदारी घेत आहे.
परंतु काही सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
घरातील इतर व्यक्तींच्या चाचण्या निगेटिव्ह आहेत.
मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे.
ज्यांनी मला सपोर्ट केला अशा सर्व तसेच देशातील इतर अनेक आरोग्य संबंधित कर्मचाऱ्यांना धन्यवाद.
सर्वानी काळजी घ्या.” असे ट्विट करत सचिनने आपण कोरोना बाधित असल्याची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिल्या शुभेच्छा
सचिन कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने ट्विट करत सचिनला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.