पशुपक्ष्यांचे आवाज । Sounds of Animals and Birds in Marathi

| |

या लेखात आपण वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज मराठी मध्ये (Sounds of Animals and Birds in Marathi) कसे असतात ते पाहणार आहोत. आपल्या सभोवताली किंवा निसर्गात अनेक पशु पक्षी आढळतात. त्यांच्या जाती, रंग, रूप, आकार, राहणीमान, यांमध्ये भिन्नता आढळून येते. काही प्राणी जंगलात राहतात. जंगलातील दाट झाडी, डोंगरदऱ्यांमधल्या कडेकपाऱ्या यांमध्ये ते निवास करतात. काही प्राण्यांना माणूस स्वतःच्या उपयोगासाठी पाळतो. पक्ष्यांच्या बाबतीतही तसेच आहे. 

पशुपक्ष्यांचे आवाज (Sounds of Animals and Birds in Marathi)

यातील प्रत्येकाचे आवाज वेगवेगळे आहेत. त्यांच्या आवाजांना मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या नावानी किंवा विशेषणांनी संबोधले जाते. बहुतांशी स्पर्धा परीक्षांमध्ये पशुपक्ष्यांच्या आवाजावर प्रश्न विचारले जातात. अशा वेळी या सोप्या प्रश्नांमध्ये गोंधळून जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच या लेखात आम्ही पशुपक्ष्यांचे आवाज (Marathi Animal Birds Sound) यांबद्दल माहिती दिली आहे. 

प्राण्यांचे आवाज (Animal Sounds in Marathi)

प्राणी : प्राण्यांचे आवाज

१. सिंह (Lion) : गर्जना (Garjana)

२. शेळी (Goat) : बें-बें (Be-Bee)

३. मांजर (Cat) : माँव-माँव (Maw-Maw)

४. घोडा (Horse) : खिंकाळी (Khinkalne)

५. बेडूक (Frog) : डराँव-डराँव (Darav darav)

६. वाघ (Tiger) : डरकाळी (Darkali)

७. हत्ती (Elephant) : चित्कार (Chitkarne)

८. कुत्रा (Dog) : भुंकणे (Bhunkne)

९. गाय (Cow) : हंबरणे (Hambarne)

१०. बैल (Ox) : हंबरणे (Hambarne)

आणखी वाचा : प्राण्यांची मराठी नावे

११. म्हैस (Buffalo) : रेकणे (Rekne)

१२. साप (Snake) : फुत्कारणे (Futkarne)

१३. कोल्हा (Fox) : कुई-कुई (Kolhekui)

१४. उंट (Camel) : रेकणे (Rekne)

१५. माकड (Monkey) : चीं-चीं/ भुभु:कार (Chi-Chi)

१६. गाढव (Donkey) : चरेकणे (Rekne)

आणखी वाचा : प्राणी आणि त्यांची घरे

पक्ष्यांचे आवाज (Bird Sounds in Marathi)

पक्षी : पक्ष्यांचे आवाज

१. कबुतर (Pigeon) : गुटर्रगू (Gutarghum)

२. हंस (Swan) : कलरवणे (Kalrav)

३. डास/ माशी (Mosquito) : गुणगुणणे (Gungunane)

४. कोकिळ (Kokil) : कुहू-कुहू (Kujan)

५. बदक (Duck) : पॅक-पॅक (Quack-Quack)

६. कावळा (Crow) : काव-काव (Kaav-kaav)

७. पोपट (Parrot) : विठू-विठू (Vithu vithu)

८. पक्षी (Bird) : किलबिल (Kilbil)

९. भुंगे (Beetle) : गुंजराव (Gunjarav)

१०. मोर (Peacock) : केकाराव (Kekraav)

आणखी वाचा : फुलांची नावे

११. ससाणा (Kite) : चित्कारणे (Chitkarne)

१२. चिमणी (Sparrow) : चिव-चिव (Chiv-Chiv)

१३. घुबड (Owl) : घुत्कारणे (Ghutkaarne)

१४. कोंबडा (Cock) : बांग/  आरवणे (Aaravne)

१५. टिटवी (Red-wattled lapwing) : ट्वी -ट्वी (Twi-Twi)

१६. गिधाड (Vulture) : चित्कारणे (Chitkarne)

पशुपक्ष्यांच्या आवाजांबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. 

Previous

नात्यांची नावे । Relations in Marathi

भारतातील पहिले | List of First in India in Marathi

Next

Leave a Comment