मराठी सुविचार | Marathi Suvichar 

| |

सुविचार म्हणजे चांगले विचार. (Marathi Suvichar Quotes) असे विचार ज्यांचा अंगीकार केल्याने जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात. या लेखात आपण असेच १०० पेक्षा जास्त मराठी सुविचार पाहणार आहोत. माणूस हा त्याच्या विचारांनी ओळखला जातो. आपले विचारच आपला आत्मविश्वास वाढवतात, चार लोकांमध्ये आपली वेगळी छाप पाडण्यासाठी उपयोगी पडतात. 

१००+ मराठी सुविचार | Marathi Good Thoughts

1. नेहमी तत्पर रहा,

बेसावध आयुष्य जगू नका.

2. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,

भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती

आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून

दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

Best Marathi SuvicharPin
Best Marathi Suvichar

3. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

4. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,

ते पाप आहे असे माहीत असूनही,

आपण त्याला कवटाळतो.

5. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

6. अन्याय करणे हे पाप आणि

होणारा अन्याय सहन करणे

किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

7. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,

समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

8. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही

केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

9. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे

अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

10. टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ,

स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

आणखी वाचा : मराठी प्रार्थना

11. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे,

म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

12. प्रसिध्दी ही अशी बाब आहे,

जी कितीही मिळाली तरी,

माणसाची तहान भागत नाही.

13. थोडे दुःख सहन करुन,

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,

काय हरकत आहे.

आपण थोडे दुःख सहन करायला,

14. खूप मोठा अडथळा आला की समजावं,

आपण विजयाच्या जवळ आलो.

15. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

16. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं तर माफ करा.

17. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

18. माणसानं राजहंसासारखं असावं.

आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,

नाही ते सोडून द्यावं.

19. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर

नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले

तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

20. मन ओळखणाऱ्यांपेक्षा

मन जपणारी माणस हवीत कारण,

ओळख ही क्षणभरासाठी असते

तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

आणखी वाचा : महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक

21. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

22. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही

हे जरी खरे असले तरी कोण

कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

23. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते

त्याचा तिरस्कार कधीच करू नका.

कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

24. माणसाचं छोट दु:ख

जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं

की त्याला सुखाची चव येते.

25. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे

कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,

तर आयुष्यभर एकटे राहाल.

26. मोत्याच्या हारापेक्षा

घामाच्या धारांनी मनुष्य

अधिक शोभून दिसतो.

27. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,

तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम

आणि तुमच्याजवळ सर्वकाही

असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

28. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा

जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

29. कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;

मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.

कारण सौंदर्य नष्ट होते.

30. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,

भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आणखी वाचा : भारतीय शहरे आणि त्यांची टोपण नावे

31. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,

माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो

पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

32. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग

अजून तयार व्हायचा आहे.

33. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.

ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

34. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.

35. प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी

आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी

एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

Motivational Marathi QuotesPin
Motivational Marathi Quotes

36. आपल्या नियतीचे मालक बना

पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

37. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;

ज्ञानाचा प्रकाश कुठुन

कधी येईल सांगता येत नाही.

38. विचार असे मांडा कि तुमच्या

विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

39. आपल्याला मदत करणाऱ्या

माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

40. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना

त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

आणखी वाचा : मराठी बालगीते

41. परीक्षा म्हणजे स्वत:च्या

आत डोकावून पाहण्याची संधी !

42. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

43. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर

स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.

44. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी

स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

45. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,

कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

46. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

47. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,

जी एकदाच खर्च करून

त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,

पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,

ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,

परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

48. आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते

तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच

विश्वास ठेवायला तयार होत नाही.

49. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,

पण त्यातून यशाच्या दिशेने

जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

50. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते

ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात

एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे

मराठी सुविचारांची यादी (List of Marathi Suvichar Quotes)

51. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,

जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही

प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,

तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

52. छत्री पावसाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Best Marathi Suvichar QuotesPin
Best Marathi Suvichar Quotes

53. तुमचा आजचा संघर्ष

तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो

त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

54. यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,

पण समाधान हे महाकाठीन,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

55. प्रत्येक पाऊल योग्य नसते,

पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात

ते धेय्य नक्की गाठतात.

56. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही

कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

57. सुरुवात कशी झाली यावर

बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

58. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

59. जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

60. यश मिळवायचं असेल तर

स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

आणखी वाचा : सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती

61. प्रत्येकाच्या मनात एक

आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

62. ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

63. यश मिळवण्यासाठी

सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

64. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो

तोच खरा माणूस !

65. चुकतो तो माणूस

आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

मित्र परिसासारखे असावेत

म्हणजे आयुष्याचं सोनं होतं

66. उशीरा दिलेला न्याय हा

न दिलेल्या न्यायासारखा असतो.

67. छंद आपल्याला आयुष्यावर

प्रेम करायला शिकवतात.

68. आपण जे पेरतो तेच उगवतं.

69. फ़ळाची अपेक्षा करुन

सत्कर्म कधीच करु नये.

70. शरीराला आकार देणारा

कुंभार म्हणजे व्यायाम.

आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द

71. प्रेम सर्वांवर करा पण

श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

72. आधी विचार करा; मग कृती करा.

निघून गेलेला क्षण

कधीच परत आणता येत नाही.

73. आयुष्यात आई आणि

वडील यांना कधीच विसरु नका.

74. अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

75. दु:ख कवटाळत बसू नका;

ते विसरा आणि सदैव हसत रहा.

76. आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल

असे कधीही वागू नका.

77. सत्याने मिळतं तेच टिकतं.

78. उद्याचं काम आज करा

आणि आजचं काम आत्ताच करा.

79. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो

म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

80. नवं काहीतरी शिकण्यासाठी

मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

आणखी वाचा : समानार्थी शब्द

81. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

82. जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

83. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

Marathi Quotes SuvicharPin
Marathi Quotes Suvichar

84. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय

कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

85. हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;

मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

86. स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

87. खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

88. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

89. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !

90. जो गुरुला वंदन करतो;

त्याला आभाळाची उंची लाभते.

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

91. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

92. बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत

सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

93. माणसाचा सगळ्यात मोठा

सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

94. क्रांती हळूहळू घडते;

एका क्षणात नाही.

95. मनाची श्रीमंती ही कुठल्याही

श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

96. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली

यावरुन तुमची श्रीमंती कळते.

97. वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

98. अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

99. जगण्यात मौज आहेच पण

त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

100. संभ्रमाच्या वेळी नेहमी

आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

101. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,

किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

102. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;

आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

प्रेरणादायी मराठी सुविचार (Motivational Marathi Suvichar)

1. कासवाच्या गतीने का होईना,

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. 

Marathi Motivational SuvicharPin
Marathi Motivational Suvichar

2. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,

शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

3. गरूडाइतके उडता येत नाही,

म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

4. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,

पण संकटाचा सामना करणं,

त्याच्या हातात असतं.

5. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

6. मोठी स्वप्ने पाहणारेच,

मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

7. स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?

कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

Motivational Marathi SuvicharPin
Motivational Marathi Suvichar

8. न हरता, न थकता न थाबंता

प्रयत्न करणाऱ्यांसमोर

कधी कधी नशीब सुध्दा हरत.

9. जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

10. यश प्राप्त करण्यासाठी,

यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि

अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा

जास्त प्रबळ असली पाहिजे.

Marathi Motivational ThoughtsPin
Marathi Motivational Thoughts

11. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.

आणखी वाचा : मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

12. जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

Marathi Good ThoughtsPin
Marathi Good Thoughts

13. माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,

पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

Previous

आरती संग्रह | Aarti Sangrah

माझी आई मराठी निबंध । My Mother Essay in Marathi

Next

Leave a Comment