Marathi Mhani With Meaning
१. अति तेथे माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो
२. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा – जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते
३. अडला हरी गाढवाचे पाय धरी – शहाण्या माणसाला प्रसंगी मुर्खाची विनवणी करावी लागते
४. असतील शिते तर जमतील भुते – आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात
५. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी – जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे
६. आगीतून फुफाट्यात – लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे
७. आधी पोटोबा मग विठोबा – आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे
८. अंथरुण पाहून पाय पसरावे – ऐपतीच्या मानाने खर्च करावा
९. आवळा देवून कोहळा काढणे – क्षुल्लक वस्तुच्या मोबदल्यात अधिक लाभ करून घेणे
१०. आयत्या बिळात (बिळावर) नागोबा – दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे
आणखी वाचा :समूहदर्शक शब्द
११. आलिया भोगासी असावे सादर – जे नशीबात असेल ते भोगायला तयार असणे
१२. आपला हात जगन्नाथ – आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते
१३. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार – जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची अपेक्षा करणे व्यर्थ होय
१४. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे
१५. इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
१६. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन करणे
१७. उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता वाटेल ते अमर्याद पणे बोलणे
१८. उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फारच बढाई मारतो
१९. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाउ नये – एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ करू नये
२०. एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्विकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे
आणखी वाचा: मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग
२१. एका हाताने टाळी वाजत नाही – कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात
२२. ऐकावे जनाचे करावे मनाचे – कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे पण शेवटी सारासार विचार करून आपल्या मनाप्रमाणे वागणे
२३. कर नाही त्याला डर कशाला – ज्याच्या कडून गुन्हा घडलेला नाही त्याला भीती बाळ गण्याची काहीच गरज नसते
२४. करावे तसे भरावे – दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतातच
२५. कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस
२६. काखेत कळसा गावाला वळसा – हरवलेली वस्तु जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे
२७. कानामागुन आली आणि तिखट झाली – एखाद्या व्यक्तीपेक्षा दूसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबिज करणे
२८. काळ आला होता पण वेळ आली नव्हती – एखादे घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सूटणे
२९. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही- क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोर पणात उणेपणा येत नाही
३०. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत ठरणे
आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द
३१. कोठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भटाची तट्टाणी – अति थोर माणूस आणि सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही.
३२. कोळसा उगाळावा तितका काळाच – दुष्ट माणसाबाबत जितकी अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात.
३३. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
३४. कोंड्याचा मांडा करून खाणे – हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे.
३५. कोल्हा काकडीला राजी – सामान्य कुवतीची माणसे क्षुल्लक वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.
आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द
३६. खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
३७. खाण तशी माती (बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा) – आईवडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे.
३८. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी – एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे भोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे.
३९. खायला काळ भुईला भार – निरुद्योगी मनुष्य सर्वानाच भारभूत होतो.
४०. गरजवंताला अक्कल नसते – गरजू माणसाला प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
आणखी वाचा : समानार्थी शब्द
४१. गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो.
४२. गरज सरो वैद्य मरो – आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे.
४३. गर्जेल तो पडेल काय? – केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
४४. गाढवाला गुळाची चव काय? – अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल काळत नाही.
४५. गाव करी ते राव न करी (गाव करील ते राव काय करील?) – जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशांच्या बळावर करू शकणार नाही.
४६. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट सध्या झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
४७. गुरुची विद्या गुरूला फळली – एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
४८. गोगलगाय नि पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
४९. घरोघरी मातीच्याच चुली – सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
५०. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.
आणखी वाचा : १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार
५१. चोराच्या मनात चांदणे – आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती असणे.
५२. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे – अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे.
५३. चोरावर मोर – एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.
५४. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये – जेथे राहायचे तेथील माणसांशी वैरभाव ठेवू नये.