समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

| |

समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi) म्हणजे समान अर्थ असलेले शब्द. मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत जे शब्द म्हणून जरी वेग वेगळे असले तरी त्यांचा अर्थ समान आहे.

या पोस्ट मध्ये आपण अशाच समानार्थी शब्दांची यादी (List of Samanarthi shabd in marathi) पाहणार आहोत.  

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. (Synonyms in Marathi) 

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण असे खूप शब्द वापरत असतो परंतु सगळ्याच शब्दांचे समानार्थी शब्द (samanarthi shabd marathi) आपल्याला माहित नसतात. त्यामुळे खाली दिलेली यादी तुम्हाला ज्ञान वाढविण्यासाठी आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. 

‘अ’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd marathi starts with letter ‘A’)

  • अग्नी : अनल, विस्तव, आग, पावक, वन्ही
  • अभिनय : हावभाव, अंगविक्षेप
  • अभिनेता : नट
  • अभियान : मोहीम
  • असंख्य : अगणित, अपार, अमित
  • अमृत : सुधा, पीयूष, अपार
  • अरण्य : रान, कानन, वन, विपीन
  • अर्जुन : पार्थ, धनंजय, फाल्गुन
  • अश्व : घोडा, हय, तुरग, वारू, वाजी
  • अही : सर्प, साप, भुजंग, व्याल
  • अंतरिक्ष : अवकाश
  • अवचित : एकदम, अचानक
  • अपाय : त्रास, इजा
  • अचल : स्थिर, शांत, पर्वत
  • अपराध : गुन्हा
  • अत्याचार : अन्याय, जुलूम
  • अगत्य : आस्था
  • अग्रज : आधी जन्मलेला
  • अग्रपूजा : पहिली पूजा
  • अग्र : टोक
  • अकल्पित : एकाएकी घडणारे
  • आकालीन : अयोग्य वेळचे
  • अखंडित : सतत चालणारे
  • अगम्य : न समजू शकणारे
  • अंडज : पक्षी
  • अतिथी : पाहुणा
  • अनरुत : खोटे
  • अनुज : नंतर जन्मलेला
  • अनुग्रह : कृपा
  • अंतिम : शेवटचे
  • अध्यापन : शिकवणे
  • अध्ययन : शिकणे
  • अधर : ओठ, ओष्ट
  • अभ्युदय : भरभराट
  • अहर्निश : रात्रंदिवस
  • अधनय्य : अजाण
  • अवतरण : खाली येणे
  • अहंकार : गर्व
  • अक्षय : नाश न पावणारे, अखंडित
  • अस्थीपंजर : हाडांचा सापळा

आणखी वाचा : विरुद्धार्थी शब्द

‘आ’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd marathi starts with letter ‘A’)

  • आई : माता, जननी, माय, जन्मदा
  • आगामी : येणारे
  • आगमन : येणे
  • आयुष्य : जीवन
  • आहार : भोजन, खाद्य
  • आरसा : दर्पण
  • आश्चर्य : नवल, विस्मय, अचंबा
  • आवाहन : विनंती
  • आनंद : मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आमोद
  • आठवण : स्मरण, स्मृती
  • आकाश : गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  • आयुध : शस्त्र
  • आराधना : प्रार्थना
  • आला : निरबंध
  • आरोहण : वर चढणे
  • आस : ओढ

आणखी वाचा : मराठी वाक्प्रचार आणि वाक्यात उपयोग

‘इ’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘I’)

  • इंद्र : देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  • इहलोक : मृत्यूलोक
  • इशारा : सूचना, खूण

‘उ’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘U’)

  • उदरनिर्वाह : चरितार्थ
  • उपवन : बगीचा, बाग, उद्यान, वाटिका
  • उणीव : कमतरता, न्यून, न्यूनता
  • उदर : पोट

‘क’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘K’)

  • कपाळ : निढळ, भाल, ललाट, निटील
  • कावळा : वायस, एकाक्ष, काक
  • किरण : कर, अंशु, रश्मी
  • काळोख : अंधार, तिमिर, तम
  • काळजी : चिंता, फिकीर, विवंचना
  • कमळ : अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
  • कष्ट : मेहनत
  • करमणूक : मनोरंजन
  • कनक : सोने, कांचन, हेम
  • कट : कारस्थान
  • कठोर : निर्दय
  • काठ : तिर, किनारा, तट
  • कटी : कंबर
  • कान : कर्ण, श्रवण, श्रोत्र
  • कुटी : झोपडी
  • किल्ला : गड, तट, दुर्ग
  • काष्ठ : लाकूड
  • किमया : जादू, चमत्कार
  • कृश : हडकूळा
  • कृपण : कंजूष, चिकू
  • खडक : दगड, पाषाण

आणखी वाचा : मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

‘ग’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘G’)

  • गर्व : अहंकार, ताण
  • गरज : जरुरी, आवश्यकता, निकड
  • गणपती : गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  • गवई : गायक
  • ग्रंथ : पुस्तक
  • गौरव : अभिनंदन, सन्मान, सत्कार
  • गनीम : शत्रू, अरी
  • गरुड : खगेंद्र, द्विजराज, वैनतेय
  • गाय : धेनु, गो, गोमाता
  • गृहिणी : घरधनिन
  • गोष्ट : कथा, कहाणी
  • गाणे : गीत
  • गंध : वास, परिमळ
  • घर : सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन
  • घास : कवळ, ग्रास
  • घोडा : हय, तुरग, वारू

‘च’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘CH’)

  • चंद्र : इंदु, शशी, विधू, सोम, हिमांशू
  • चेहरा : तोंड, मुख, वदन
  • चांदणे : चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना
  • छंद : नाद, आवड
  • छिद्र : भोक

आणखी वाचा : १ ते १०० अंक आणि त्यांचे मराठी उच्चार

‘ज’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘J’)

  • जमीन : भु, भूमी, भुई, धरा
  • जयघोष : जयजयकार
  • जिव्हाळा : माया, प्रेम, ममता
  • जरब : दरारा, दहशत, वचक, धाक
  • ज्येष्ठ : मोठा, वरिष्ठ
  • जीर्ण : जुने
  • जरा : म्हातारपण
  • जिन्नस : पदार्थ
  • झाड : वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
  • झेंडा : ध्वज, निशाण, पताका
  • झुंबड : गर्दी, रीघ, थवा
  • झुंज : लढा, संग्राम, संघर्ष
  • झोका : हिंदोळा

‘ट’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘T’)

  • टंचाई : कमतरता
  • ठक : लबाड
  • ठसा : खुण
  • ठेकेदार : कंत्रादार, मक्तेदार
  • ठग : लुटारू
  • तरुण : जवान, युवक
  • तृषा : तहान, लालसा
  • तारे : तारका, चांदण्या, नक्षत्रे
  • तिमिर : अंधार, काळोख
  • तुरुंग : कारागृह, कैदखाना, बंदीखाना
  • तारू : जहाज, गलबत
  • तरु : वृक्ष, झाड
  • तृण : गवत
  • थवा : समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
  • थंड : शीत, गार, शीतल

आणखी वाचा : शब्दसमूहाबद्दल एक शब्द

‘ड’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘D’)

  • डोके : शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
  • डौल : दिमाख, ऐट, रुबाब
  • डोळा : नयन, लोचन, नेत्र, अक्ष
  • ढग : जलद, अंबुद, पयोधर, पयोद
  • ढेकूण : मुतकून, खटमल

‘द’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘DH’)

  • दिवस : वार, वासर, दिन, अह
  • दंत : दात
  • दारा : बायको, पत्नी
  • दूध : दुग्ध, पय, क्षीर
  • देव : सूर, ईश्वर, अमर, ईश
  • दंडवत : नमस्कार
  • दागिना : अलंकार, भूषण
  • दास : चाकर, नोकर
  • दानव : राक्षस, दैत्य, असुर
  • देह : शरीर, तनु, तन, काया
  • देऊळ : मंदिर, राऊळ, देवालय
  • दीन : गरीब
  • दुर्धर : कठीण, गहन
  • दुजा : दुसरा
  • दुनिया : जग
  • दैन्य : दारिद्र्य
  • दुर्दशा : दुरवस्था दु : स्थिती
  • धरती : धरणी, पृथ्वी, वसुंधरा, वसुधा, मही, भूमी, क्षोणी, धरित्री, अवनी, रसा
  • धनुष्य : चाप, कोदंड, धनु, तीरकमठा
  • धन : पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा, दौलत
  • धवल : पांढरे, शुभ्र

‘न’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘N’)

  • नदी : सरिता, टटीनी, तरंगिनी
  • नवरा : पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत
  • नोकर : चाकर, सेवक, दास
  • नमस्कार : वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
  • नवनीत : लोणी
  • नजराणा : भेट, उपहार
  • नगर : शहर, पूर, पुरी
  • नदी : सरिता, तटिनी, जीवनदायिनी
  • नारळ : श्रीफळ, नारियल
  • नृप : राजा, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महिपती
  • निर्जन : ओसाड
  • नाथ : धनी, स्वामी
  • निरझर : झरा
  • नेता : नायक, पुढारी
  • निर्मळ : स्वच्छ
  • नौदल : आरमार
  • नीच : तुच्छ, अधम, चांडाळ

आणखी वाचा : समूहदर्शक शब्द

‘प’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘P’)

  • पत्नी : भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया
  • पान : पल्लव, पर्ण, पत्र
  • पर्वत : अचल, नग, अद्री, शैल, गिरी
  • पुढारी : नेता, नायक, अग्रणी
  • पक्षी : खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
  • पुरुष : नर, मर्द
  • पराक्रम : शौर्य, प्रताप, विक्रम, बहादूरी
  • पाय : पद, पाद, चरण
  • पाणी : जल, अंबु, पय, निर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी
  • पृथ्वी : धरती, धरणी, वसुंधरा, धरित्री, भु, भूमी, धरा, मही, क्षमा, रसा
  • पर्वत : नग, अद्री, गिरी, अचल, शैल
  • पशु : प्राणी, जनावर, श्वापद
  • पोपट : शुक्र, राघू, रावा
  • परिमल : सुवास, सुगंध
  • पती : नवरा, भ्रतार
  • पारंगत : निपुण, तरबेज
  • पंक्ती : रांग, ओळ, पंगत
  • पंडित : शास्त्री, विदवान, बुद्धिमान
  • पंक : चिखल
  • फुल : पुष्प, सुमन, कुसुम, सुम
  • प्रासाद : वाडा, मंदीर
  • प्रात:काळ : सकाळ, उषा, पहाट
  • प्रताप : पराक्रम, शौर्य
  • प्रजा : लोक, रयत, जनता
  • प्रघात : चाल, पद्धत, रीत, रिवाज
  • प्रसिद्ध : प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम, विख्यात
  • प्रवीण : निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निषणात
  • प्राचीन : पूर्वीचा, पुरातन, जुनाट
  • प्रपंच : संसार
  • प्रतीक : चिन्ह, खूण
  • प्रकाश : उजेड, तेज
  • प्रेम : प्रीती, लोभ, अनुराग

‘ब’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘B’)

  • बळ : शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद
  • बाप : पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता
  • बाग : बगीचा, उद्यान, उपवन
  • बहर : हंगाम, सुगी
  • बाण : शर, तिर, सायक
  • बिकट : कठीण, अवघड
  • बक : बगळा
  • ब्रीद : बाणा, प्रतीक्षा
  • बांधेसूद : रेखीव, सुडौल
  • बंधन : निर्बंध, मर्यादा
  • ब्राम्हण : द्विज, विप्र
  • बैल : वृषभ, पोळ, खोड
  • बंधु : भाऊ, भ्राता
  • बेडूक : मंडुक, दरदुर
  • ब्रम्हदेव : ब्रम्हा, चतुरानन, कमलसन, विरंची, विधी, प्रजापति
  • बेढव : बेडौल
  • भरभराट : उत्कर्ष, प्रगती, समृद्धी
  • भरवसा : विश्वास, खात्री
  • भु : जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री
  • भांडण : तंटा, कलह, झगडा, कज्जा
  • भाऊबंद : नातेवाईक, आप्त, सगेसोयरे
  • भान : शुद्ध, जागृती
  • भाऊ : भ्राता, बंधू, सहोदर
  • भेद : फरक, भिन्नता
  • भेकड : भित्रा, भ्याड, भिरु
  • भगिनी : बहीण
  • भुंगा : भ्रमर, अली, मधूप, मिलिंद, मधुकर, भृंग
  • भार : ओझे

आणखी वाचा : सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती

‘म’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘M’)

  • महा : महान, मोठा
  • मनसुबा : बेत, विचार
  • मुलगा : सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन
  • मुलगी : सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहीता, नंदिनी
  • मासा : मिन, मत्स्य
  • मलूल : निस्तेज
  • महिमा : थोरवी, मोठेपणा, महात्म्य
  • मित्र : स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी
  • मंदिर : देऊळ, देवालय
  • मुनी : ऋषी, साधू
  • मकरंद : मध
  • मयूर : मोर
  • मौज : मजा, गंमत
  • मित्र : दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही
  • मेष : मेंढा
  • मानव : मनुष्य, माणूस, नर, मनुज
  • मत्सर : द्वेष, असूया
  • मोहिनी : भुरळ
  • मुलामा : लेप
  • मार्ग : रस्ता, वाट, पथ, सडक
  • मूषक : उंदीर
  • मंगळ : पवित्र

‘य’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd marathi starts with letter ‘Y’)

  • यज्ञ : मख, याग, होम
  • यातना : दुःख , वेदना
  • युवती : तरुणी
  • युद्ध : लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
  • याचक : भिकारी
  • यान : अंतराळवाहन

‘र’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘R’)

  • रस्ता : मार्ग, पथ, वाट, पंथ
  • रात्र : रजनी, यामिनी, निशा, रात
  • राग : संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप
  • रुक्ष : कोरडे, निरस
  • राजा : भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र
  • रंक : गरीब

‘ल’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘L’)

  • लघुता : लहान, कमीपणा
  • लाज : शरम, भीड
  • लक्ष्मी : श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
  • लावण्य : सौंदर्य
  • लढा : लढाई, संघर्ष
  • लाडका : आवडता

आणखी वाचा : मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे

‘व’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd marathi starts with letter ‘V’)

  • वल्लरी : वेल, लता
  • वारा : भवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, समीकरण
  • वानर : मर्कट, कपी, शाखामृग
  • वीज : चपला, तडीत, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युलता
  • विष्णू : श्रीपती, रमापती, रमेश, चक्रापानी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंदा, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरोषोत्तम, वासुदेव, ऋषिकेश, पदमनाभ, पितांबर, शेषशायी
  • वानगी : उदाहरन, दाखला
  • वस्त्र : वसना, अंबर, पट
  • विहार : क्रीडा, सहल, भ्रमण
  • वाघ : व्याघ्र, शार्दूल
  • वेदना : यातना, कळ, दुःख, व्यथा, शूळ
  • वत्स्य : वासरु, बालक
  • वर : नवरा, पती, भ्रतार
  • वायदा : करार
  • वाली : रक्षणकर्ता, कैवारी
  • वंदन : नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात
  • वचक : धाक, दरारा
  • वासना : इच्छा
  • विलंब : उशीर
  • वर्षा : पाऊस, पावसाळा
  • व्रण : खूण, क्षत
  • विमल : निष्कलंक, निर्मळ
  • विस्तृत : विशाल, विस्तीर्ण
  • विलग : सुटे, अलग
  • विवंचना : काळजी, चिंता
  • वीज : चपला, चंचला, तडीता, बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युलता
  • विषण : खिन्न, कष्टी
  • विनय : नम्रता
  • विद्रुप : कुरूप
  • विस्मय : आश्चर्य, नवल
  • वेष : पोशाख
  • व्याकुळ : दुःखी, कासाविस

‘श’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘S’)

  • शंकर : महेश, त्र्यंबक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र
  • शेष : अनंत, वासुकी
  • शत्रू : अरी, रिपू, वैरी
  • शिक्षक : गुरुजी, गुरू, मास्तर
  • शक्ती : ताकद, जोम, जोर, सामर्थ्य
  • शिकारी : पारधी
  • शव : प्रेत
  • शिकस्त : पराकाष्ठा
  • शेतकरी : कृषक, कृषिवल
  • शीघ्र : जलद
  • शेज : बिछाना, अंथरूण, शय्या
  • शर : बाण, तिर, सायक
  • शीण : थकवा
  • सकल : समस्त, सर्व, अखिल, निखिल, सगळा
  • संसर्ग : संपर्क , संबंध, सहवास
  • सिंह : केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज
  • साप : सर्प, उरग
  • संहार : नाश, विध्वंस, विनाश, सर्वनाश
  • स्त्री : अबला, महिला, ललना, वनीता, नारी, अंगना, कामिनी
  • समुद्र : सागर, उद्दी, सिंधू, अर्णव, अंबुध्दी, पयोधी, जलधी, वारीराशी, रत्नाकर
  • सीमा : मर्यादा, हद्द
  • संघर्ष : कलह, झगडा, टक्कर, भांडण
  • सह्याद्री : सह्यपर्वत, सह्याचल, सह्यागिरी
  • सुंदर : सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम
  • सूर्य : रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशु, दिनकर, दिनमनी, प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, मार्तंड, वासरमनी
  • स्वच्छ : नीट, निर्मळ, साफ
  • सेनापती : सेनानी, सेनानायक
  • समाधान : आनंद, संतोष
  • सुरुवात : आदी, आरंभ, प्रारंभ
  • स्तुती : प्रशंसा, कौतुक
  • संहार : नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस
  • सज्जन : संत
  • साधू : संन्यासी
  • सोने : सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम
  • समय : वेळ
  • साथ : सोबत, संगत
  • सुंदर : सुरेख, छान, देखणे
  • स्वामी : मालक
  • संशोधक : शास्त्रज्ञ
  • सैन्य : फौज, दल
  • सीमा : वेस, मर्यादा, शिव
  • संघ : गट, चमू, समूह
  • संग्राम : युद्ध, समर, संगर, लढाई
  • स्वेद : घाम, घर्म
  • संदेश : निरोप
  • सेवक : दास, नौकर
  • संशय : शंका
  • संकल्प : बेत, मनसुबा
  • सुगम : सुलभ, सोपा, सुकर

आणखी वाचा : महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक

‘ह’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd marathi starts with letter ‘H’)

  • हत्ती : गज, कुंजर, वारण, नाग
  • हात : हस्त, कर, पाणी, भुज, बाहू
  • हिंमत : धैर्य, धाडस
  • होडी : नाव, नौका, तर
  • हिम : बर्फ
  • हरीण : मृग, कुरंग, सारंग
  • हुशार : चतुर, चाणाक्ष
  • ह्दय : अंतःकरण, अंतर
  • हताश : निराश

‘क्ष’ ने सुरु होणारे समानार्थी शब्द (Samanarthi shabd in marathi starts with letter ‘KSH’)

  • क्षीर : दूध
  • क्षत : जखम, व्रण, इजा
  • क्षमा : माफी
  • क्षेम : कल्याण, हित, कुशल
  • क्षय : झीज, ऱ्हास
  • क्षुधा : भूक
  • क्षीण : अशक्त
  • क्षोभ : क्रोध
Previous

नवग्रह स्तोत्र (मराठी अर्थासहित)

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

Next

Leave a Comment