मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्यामध्ये अनेक लेखक, कवी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह यांनी मराठी साहित्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु यातील बहुतांशी लेखकांची खास गोष्ट म्हणजे ते स्वतःच्या मूळ नावाने लेखन न करता काही विशिष्ट टोपणनावाने लेखन केले. आणि आजही याच टोपणनावांनी ते ओळखले जातात. (Marathi Writers and Their Nicknames)
या लेखात आपण अशाच मराठी लेखक आणि त्यांच्या टोपणनावांची यादी पाहणार आहोत.
मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे (Marathi Writers and Their Nicknames)
अनंततनय : दत्तात्रेय अनंत आपटे
अनंतसुत,विठ्ठल,कावडीबाबा : विठ्ठल अनंत पिंपळगावकर
अकिंचन : वासू. ग. मेहेंदळे
अनिल भारती : शान्ताराम पाटील
अनंतफंदी : अनंत भवानीबावा घोलप
अज्ञातवासी : दिनकर गंगाधर केळकर
अशोक : नारायण रामचंद्र मोरे
अनिल : आत्माराम रावजी देशपांडे
आनंद : विनायक लक्ष्मण बरवे
आधुनिक : नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंदतनय : गोपाळ आनंदराव देशपांडे
इंदुकांत : दिनकर नानाजी शिंदे
इंदिरा : इंदिरा संत
उदासी/हरिहरमहाराज : नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
एक मित्र/ विनायक : विनायक जनार्दन करंदीकर
एकनाथ : एकनाथ सूर्यनारायण पैठणकर
कांत : वा.रा. कांत
काव्यशेखर : भास्कर काशीनाथ चांदूरकर
कवीश्वरबास : भानूभट/भास्करभट्ट बोरीकर
कवी कुंजविहारी : हरिहर गुरुनाथ सलगरकर
कावडीबाबा/अनंतसुत/विठ्ठल : विठ्ठल अनंत पिंपळगावकर
किरात/भ्रमर : कृष्णाजी लक्ष्मण सोमण
काव्यविहारी : धोंडो वासुदेव गद्रे
के.स.रि. : केशव सदाशिव रिसबूड
केशवकुमार : प्रल्हाद केशव अत्रे
कुमुदबांधव : स.अ. शुक्ल
केशवसुत : कृष्णाजी केशव दामले
कुसुमाग्रज : विष्णू वामन शिरवाडकर
कोणीतरी : नरहर शंकर रहाळकर
ग्रेस : माणिक गोडघाटे
गोविंद : गोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंदाग्रज : राम गणेश गडकरी
गोपीनाथ : गोपीनाथ तळवलकर
गोविंदप्रभु : गुंडम अनंतनायक राऊळ
ग्यानबा / रा. म.शास्त्री : वि.ग. कानिटकर
गिरीश : शंकर केशव कानेटकर
गोमा गणेश : गणेश कृष्ण फाटक
गोपिका/तनया : कु.द्वारका हिवरगावकर
गोविंद/पौत्र : श्रीधर व्यंकटेश केतकर
चेतोहर : परशुराम नारायण पाटणकर
चक्रधर : श्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखर : चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
जननीजन/कज : पु.पां गोखले
जगन्नाथ : जगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्र : रेव्हरंड नारायण वामन टिळक
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती : वासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथ : सखाराम केरसुणे
तुकाराम/तुका : तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
दित्जू/माधव जूलियन : माधव त्र्यंबक पटवर्धन
दामोदर ,वीरेश्वर : सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दासोपंत/ दिगंबरानुचर : दासो दिगंबर देशपांडे
दत्त : दत्तात्रय कोंडो घाटे
दया पवार : दगडू पवार
दा.ग.पा. : दामोदर गणेश पाध्ये
नृसिंहसरस्वती : नरहरी माधव काळे
निशिगंध : रा.श्री. जोग
नारायणसुत : श्रीपाद नारायण मुजुमदार
निळोबा : निळा मुकुंद पिंपळनेरकर
नामदेव : नामदेव दामाशेटी शिंपी
नीरजा : नीरजा साठे
निरंजन : वसंत सदाशिव बल्लाळ
मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे (Marathi Authors and Their Nicknames)
पूर्णदास : बाबा उपसकर-राजाध्यक्ष
पद्मा : पद्मा गोळे
पठ्ठे बापूराव : श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पी.सावळाराम : निवृत्तिनाथ रावजी पाटील
पद्मविहारी : रघुनाथ गणेश जोशी
पुरु.शिव. रेगे : पु.शि. रेगे
प्रीत : स्वप्नील चाफेकर
प्रभाकर : शाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथ : भगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाई : बहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाई : कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बाळा : बाळा कारंजकर
बाबा आमटे : मुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथ : विनायक श्यामराव काळे
बोधलेबुवा : माणकोजी भानजी जगताप
बालकवी / कलापि : त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बी – B : बाळकृष्ण अनंत भिडे
बी – BEE : नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारी : भगवान रघुनाथ कुळकर्णी
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत: ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
भ्रमर/किरात : कृष्णाजी लक्ष्मण सोमण
भगवानकवि : भवान रत्नाकर कर्हापडकर
भावशर्मा : के.(केशव) नारायण काळे
भानुदास/मामळूभट : भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्म : पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भानजी : भास्कर त्रिंबक देशपांडे
माधव जूलियन : माधव त्र्यंबक पटवर्धन
मंदार : एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
माधवानुज : काशीनाथ हरी मोडक
मानसी सरोज : नम्रता माळी पाटील
मनमोहन : गोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
माधवसुत : दामोदर माधव कुळकर्णी
महिपती : महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
मीरा : मीरा तारळेकर
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा : माणिक मनोहर नाईक
माधव : माधव केशव काटदरे
मनोहरबंधू : भास्कर कृष्ण उजगरे
माधव मिलिंद : कॅ. मा.कृ. शिंदे
मध्वमुनीश्वर : त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मोरोपंत : मोरेश्वर रामचंद्र पराडकर
महीपतिनाथ/ढोलीबुवा : सखाराम केरसुणे
मुक्तिबोध : शरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वर : मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मुक्ताबाई/मुक्ताई : मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
योगेश : भालजी पेंढारकर
यशवंत : यशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरा : यशोधरा साठे
रामदास : नारायण सूर्याजी ठोसर
रंगनाथस्वामी(निगडीकर) : रंगनाथ बोपाजी घोडके
रा. म. शास्त्री / ग्यानबा : वि.ग. कानिटकर
राधारमण : कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविराय : राम जनार्दन जोशी
राजहंस : यादव शंकर वावीकर
वैशाख : त्र्यं.वि. देशमुख
वसंत : वासुदेव बळवंत पटवर्धन
वसंतविहार : शंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ. : वामन दाजी ओक
विंदा करंदीकर : गोविंद विनायक करंदीकर
विठाबाई : विठा रामप्पा नायक
विहंगम : बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
विठ्ठल केरीकर : विठ्ठल नरसिंह साखळकर
वामन पंडित : वामन तानाजी शेषे
विठ्ठलदास : विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विसोबा खेचर : विसोबा चाटे
विनायक/एक मित्र : विनायक जनार्दन करंदीकर
विष्णुदास : कृष्णराव रावजी धांदरफळे
विठा रेणुकानंदन : विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
शारदाश्रमवासी : पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
श्रीराम : श्रीनिवास रामचंद्र बोबडे
श्रीधर : श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीकृष्ण : श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
साधुदास : गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सामराज : शामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
संजीव : कृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनी : संजीवनी मराठे
सौमित्र : किशोर कदम
सरस्वती कंठाभरण : दिनकर नानाजी शिंदे
सुधांशु : हणमंत नरहर जोशी
सानिया : सुनंदा बलराम कुलकर्णी
साने गुरुजी : पांडुरंग सदाशिव साने
सुमंत : अप्पाराव धुंडिराज मुरतुले
सांवतामाळी : सांवता परसूबा माळी
सदानंदस्वामी : सदानंद चिंतामणी उपासनी
स्वरूपानंद : रामचंद्र विष्णू गोडबोले
सुहृद्चंपा : पुरुषोत्तम शिवराम रेगे
हरिबुवा : हरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
होनाजी : होनाजी सयाजी शेलारखाने
हरिहरमहाराज/उदासी : नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
तुमचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मराठी लेखक आणि त्यांच्या टोपणनावांची यादी (List of Marathi Authors and Their Nicknames) तुम्हाला फार उपयोगी पडू शकते. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या माहितीवर प्रश्न विचारले जातात. या लेखाच्या साहाय्याने तुम्ही सहजपणे प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकता.