माझी आई मराठी निबंध । My Mother Essay in Marathi

| |

“आई” हि प्रत्येकाच्या हृदयाच्या सर्वात जवळ असणारी व्यक्ती आहे. आईशिवाय जीवन अपूर्ण आहे. म्हणूनच आईचे महत्त्व, तिचे आपल्या आयुष्यातील स्थान समजावून सांगण्यासाठी शाळेमध्ये माझी आई मराठी निबंध (My Mother Essay in Marathi) लिहायला सांगितला जातो. या लेखात आपण पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा माझी आई मराठी निबंध (Mazi Aai Marathi Nibandh) पाहणार आहोत. 

दहा ओळींमध्ये माझी आई मराठी निबंध (My Mother Essay in Marathi in 10 Lines)

१. माझ्या आईचे नाव कविता आहे.

२. ती ३५ वर्षांची आहे.

३. ती एक गृहिणी आहे.

४. तिला स्वादिष्ट पदार्थ बनवणे खूप आवडते.

५. माझ्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी ती मला नेहमी मदत करत असते.

६. ती मला सर्वांशी चांगले वागणे आणि चांगल्या सवयी शिकवते.

७. मी माझ्या आईसोबत सर्व काही शेअर करतो.

८. ती माझ्यावर प्रेम करते आणि मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मला प्रोत्साहन देते.

९. माझी आई शिक्षिका असल्याने ती दररोज संध्याकाळी माझा अभ्यास करून घेते.

१०. माझ्या आईने शिकवलेल्या सर्व चांगल्या सवयी मला माझ्या शाळेत सुद्धा उपयोगी पडतात.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझी आई मराठी निबंध (My Mother Marathi Essay in 300 Words)

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी|

माझी आई ही आमच्या कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे, कारण ती आम्हा सर्वांना जोडून ठेवणारा एक दुवा आहे. घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची आणि पौष्टिक खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यास ती कधीच विसरत नाही. कुटुंबातील छोट्या-छोट्या गरजांचीही तिला सतत काळजी असते. ती घर नीटनेटके ठेवणे, आम्हा मुलांचा अभ्यास घेणे, आमचे करिअर आणि भविष्य नीट घडावे यासाठी सतत झटणे यातच गुंतलेली असते. देवाने या विश्वात बनवलेला सर्वोत्कृष्ट सजीव कोणता असेल तर ती म्हणजे आई कारण ती आम्हा मुलांवर आणि कुटुंबावर कुठलीही अपेक्षा न ठेवता नितांत प्रेम करते.

‘आई’ हा केवळ शब्द नाही तर, ती स्वतः एक भावना आहे. जेव्हा आपण आई म्हणतो तेव्हा आपल्या अनेक समस्या आपोआपच जादुईपणे दूर होतात असे दिसते. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आई महत्त्वाची भूमिका बजावते. क्षणभरही निराश न होता ती आपल्याला नेहमी आनंदी ठेवत असते. आईशिवाय जगण्याची आपल्यातील कोणीच साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. आई ही मुलाच्या आयुष्यातील पहिली गुरू असते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

आई आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असते. ती एकटीच अशी व्यक्ती आहे जी तिच्या मुलांना खूप जवळून आणि पूर्णपणे ओळखते. मुलं आयुष्यात कुठेही असली तरीही आई ही सतत जवळ हवी असते, शाळा सुरू असो, उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी असो, किंवा लग्न करायचे असो आईशिवाय मुलांचे पान हलत नाही. कारण फक्त ती आणि तीच मुलांना एक मजबूत सपोर्ट सिस्टीम असणे म्हणजे काय याचा अर्थ दाखवते.

मित्रांनो लहानपणापासून आजवर आईने आपल्यासाठी जे केले आहे त्याची जगातील कोणीच व्यक्ती परतफेड करू शकत नाही. तिच्या म्हातारपणी सेवा करून तिने दिलेल्या प्रेमाची आणि आपुलकीची परतफेड करण्याचा प्रयत्न करणे हेच आपले कर्तव्य आहे. तिच्या प्रेम, काळजी आणि संरक्षणाच्या बदल्यात तिने काहीही मागितले नसले तरीही आपण आपल्या आपुलकीच्या चार शब्दांनी आईला आधार आणि आनंद देऊ शकतो. आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे तुम्ही तिच्याशी किती काळजी घेता किंवा विचारपूस करता यावरून लगेच समजून येते.

मला आशा आहे की माझी आई या विषयावर लिहिलेला हा निबंध आपल्या जीवनातील आईचे ममत्व समजून घेण्यासाठी आणि आई विषयीच्या महत्व भावना समजून घेण्यासाठी मदतगार ठरेल.

धन्यवाद…!

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझी आई मराठी निबंध (Mazi Aai Marathi Nibandh in 500 Words)

आई हा शब्द आपल्या आयुष्यातील पहिला शब्द आहे जो आपण प्रत्येक दु:खात आणि वेदनांमध्ये सगळ्यात आधी घेतो. माणूस दु:खात एकवेळ भगवंताचे नाव विसरतो, पण आईचे नाव घ्यायला विसरत नाही.

आई हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे जिच्या शिवाय आयुष्य जगणे खूप कठीण होऊन बसते, मुलाचे आईवरचे प्रेम कमी असू शकते पण आईचे मुलांवरचे प्रेम कधीच कमी होत नाही. प्रसंगी आई स्वतः उपाशी झोपते मात्र आपल्या लेकराला कधीच उपाशी झोपवत नाही.

जसे माशाला जगण्यासाठी पाणी खूप गरजेचे असते तसेच जीवनात आई असणे खूप महत्वाचे असते. त्याचप्रमाणे आईसाठी तिची मुले सुद्धा खूप प्रिय असतात. आई नसती तर या जगाची कल्पना करणे फार कठीण झाले असते. आयुष्याच्या प्रवासात पाहिले पाऊल चालायला आईच शिकवते.

आई ही अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांना सुरुवातीपासून चांगले संस्कार देते. आई कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेत असते. खरे तर आई नसती तर या जगात कोणीही जन्माला आलेच नसते.

आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, जरी ती स्वतः जुने कपडे घालत असली तरीसुद्धा आपल्या मुलांसाठी नवीन कपडे विकत घेते. स्वतः ओल्या जागेवर झोपते मात्र मुलांना कोरड्या ठिकाणी निजवते. आईची महती सांगायला समुद्राची शाई अन आभाळाचा कागद केला तरीही कमीच पडेल.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आईला नेहमी आपल्या मुलांसोबत राहायचे असते, मूल शाळेतून आल्यावर आई त्याला खायला देते आणि त्याला विचारते आज शाळेत काय झाले आणि जेवण पूर्ण खाल्ले की नाही, आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो, या जगात आई एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्या लेकरांसाठी प्रसंगी वाघाशीही लढू शकते.

जरी आई मुलावर रागावली असेल तरीसुद्धा ती जास्त वेळ मुलाशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. आई आपल्या मुलांच्या सुखासाठी निर्जल उपवास सुद्धा ठेवते आणि काहीही न खाता-पिता दिवसभर राहते. देव म्हणजेच आई आहे की देव या जगात आईच्या रूपाने आपल्या रक्षणासाठी येतो हे कळतच नाही.

आई, आज मी काय आहे आणि काय बनणार आहे हे मला माहीत नाही पण तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करेन.

तू मला जन्म दिलास, स्वतःचा जीव धोक्यात घालून मला या जगात आणले आहेस, मी तुझे ऋण कधीच फेडू शकणार नाही, आई मी तुझे डोळे कधीच पाणवू देणार नाही, आई माझ्यामुळे जर तुझे कधी मन दुखावले असेल तर मला माफ कर.

आई मला तुझ्याशिवाय कोणी नाही, माझ्या सोबत तू असशील तर जगाची सगळी ताकद माझ्या हातात येते. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत मी कधीच  गरीब होऊ शकत नाही.

“आई” मला अंधाराची भीती वाटते, पण जेव्हा तू माझ्यासोबत असतेस तेव्हा मी नेहमी न घाबरता झोपतो. आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि जगातील प्रत्येक आनंद तुझ्या चरणात असावा असे मला वाटते.

धन्यवाद आई, मला या जगात आणण्यासाठी… 

माझी आई सतत घरकामात मग्न असते, मात्र माझ्या एका हाकेतच आई तिच्या हातातील काम सोडून माझ्यासाठी नेहमीच तत्पर असते.  ती एक उत्तम स्वयंपाक बनवणारी गृहिणी आहे, मला कुठलाही पदार्थ खाऊ वाटला की आई जवळ बोलायचा उशीर, लगेच तो पदार्थ मिळालाच म्हणून समजा. माझी आई माझ्यावर फार प्रेम करते आजपर्यंत तिने माझ्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, तसेच त्याग देखील केलेला आहे. माझ्या आईचे माझ्यावर असणारे उपकार मी या जन्मात कधीच फेडू शकत नाही, तरी देखील आईची सेवा करून मला आईच्या या ऋणातून मुक्त व्हायचे आहे.

 अशी ही माझी साधी भोळी आई मला फार आवडते.

 धन्यवाद…!

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझी आई मराठी निबंध (My Mother Essay in Marathi in 1000 Words)

आई माझी जणू उन्हामध्ये सावली

आई माझी जणू पावसामध्ये छत्री 

आई माझी  थंडीमध्ये  शाल

येऊ देत आता दु:खे खुशाल

आई किंवा ‘माय’ हा असा शब्द आहे जो जन्माला येणार प्रत्येक मूल या जगात आल्यानंतर सर्वात पहिला शब्द म्हणून आई हाच शब्द उच्चारते.  मित्रांनो भारतीय संस्कृती जगात सर्वात महान मानली जाते, आणि येथे आई व वडील यांना देवाचा दर्जा दिला जातो. मुलांच्या जन्म नंतर आईचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आई आपल्या मुलांच्या सरबराईत गुंतलेली असते. जसजशी मुले मोठी होतील तसतसे आईच्या मागील व्याप अजूनच वाढतो, त्यात मुलांची शाळा, त्यांचे अभ्यास घेणे याचीही भर पडते.

आपण आईशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही, म्हणून आपण आपल्या आयुष्यात आई असतानाच आईचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. जर देवाने आई ही हस्ती निर्माणच केली नसती तर आपण कोणीच या जगात नसतो. “आई” हे संपूर्ण जगभर सर्वात जिव्हाळ्याचे असे नाते आहे.

या जगात नवजात बाळाचे आगमन झाले की सर्वात घृणास्पद व्यक्ती म्हणजे नवजात बाळाची आई. तुम्हाला असे वाटते की तुम्हाला जगातील आवश्यक गोष्ट सापडली आहे.

असे म्हटले जाते की आई ही जगातील सर्वात ताकतवान योद्धा असते. मुलगी, बहीण, पत्नी असताना नाजूक असणारी स्त्री आई झाल्यानंतर कधी कणखर होते हे तिचे तिलाही कळत नाही. आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी आई जगातील कुठल्याही ताकदीसोबत लढू शकते.

आईला तिच्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी असते आणि आईपेक्षा आतून प्रेमळ अन वरून कठोर कोणीही नसते. आईला आपल्या मुलावर खूप प्रेम असते, परंतु प्रसंगी आपली मुले चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून आई आपल्या मुलांवर हात देखील उभारते. मात्र यामध्ये आईचा दूरदृष्टीकोन आणि मुलांप्रती असलेले प्रेमच लपलेले असते.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

माझ्या आईशिवाय या पृथ्वीवर कोणीही मला जवळचे असे नाही.  आई शिवाय माझ्यासाठी हे जग सोन्याने जरी मडविले तरीही काहीच नसेल. देवाने प्रत्येकाच्या आईला सुखरूप ठेवावे हीच देवाच्या कडे मागणी आहे.

“आई” हा शब्द अतिशय मौल्यवान आहे. आई हे फक्त नाव नाही तर आपल्या जीवनाचा पाया आहे. आईशिवाय जगणे कठीण आहे. आईचा उठविण्याचा आवाज ऐकू येईपर्यंत सकाळ झाली आहे असं वाटतच नाही. आणि रविवारी तर आईने उठविल्याशिवाय मी कधीच उठत नाही.

आई आणि देव यांच्यातील सर्वात महान कोण आहे असे विचारले तर मी सरळ आईचे नाव सांगून देतो कारण देव हा महान असला तरी देखील माझ्यासाठी माझी आई हीच देव आहे. म्हणूनच, प्रत्येकाने मातृत्वाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे कारण तिच्यासारखे प्रेमळ या जगात कोणीही असू शकत नाही.

आपल्या चांगल्या आणि वाईट काळात आई नेहमीच आपल्याला साथ देत असते.  आईसाठी नेहमी आपली मुले सुंदरच असतात. आपल्या मुलाला कोणी कुरूप म्हटलेले आईला कदापी खपत नाही. तिच्या आयुष्यात आई इतर कोणापेक्षाही तिच्या मुलांना सर्वात जास्त जीव लावत असते. बाकी सर्वजण तिच्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर येतात.

ती आपल्याला जगातील आवश्यक त्या सर्व गोष्टी देते. आणि आपल्या वाईट काळात आपल्याला पाठीवर हात ठेवून लढण्याची प्रेरणा देत असते. बाळाचा जन्म झाल्यावर आई सर्वात खुश होते.  तिच्यासाठी हा क्षण सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो.

आई आणि मुलांचे नाते अनमोल असते; ते कधीही बदलत नाही. जगातील कोणत्याही आईने तिचे प्रेम आणि मुलांचे संगोपन यात आजपर्यंत वयाच्या कोणत्याही टप्प्यात तडजोड केलेली नाही.

“ आई” हा आपल्या सर्वांसाठी पहिला शब्द आहे, जो दुःख आणि वेदनांमध्ये आपल्या सर्वांच्या तोंडात आपोआपच येतो.  माणूस दुःखात देवाचे सुद्धा नाव विसरतो पण आईचे नाव कदापिही विसरत नाही.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

आई हा आपल्या जीवनाचा एक अमुलाग्र असा भाग आहे, सकाळी उठल्याबरोबर असो किंवा बाहेरून कुठूनही येणे असो आपले डोळे नेहमी आईलाच शोधत असतात. जोपर्यंत आई दिसत नाही तोपर्यंत कोणाचेही चित्त थाऱ्यावर येत नाही. मुलांचे प्रेम आईसाठी वय परत्वे कमी होऊ शकते, परंतु आईचे प्रेम तिच्या मुलांसाठी कधीही कमी होत नसते.  प्रत्येक मूल आपल्या आई शिवाय इतर कोणावरही पूर्ण विश्वास ठेवत नाही. अगदी नव्याने जन्मलेले बाळ देखील आपल्या आईच्या मायेचा हात लगेच ओळखते. आणि इतर कोणाकडेही गेल्यानंतर रडणारे ते बाळ आईने घेतल्याबरोबरच शांत होते, हे दुसरे तिसरे काही नसून आईच्या मायेची जादू आहे.

आई सोबत असणे ही प्रतिष्ठेची बाब आहे. ते भाग्यवान आहेत की जे अजूनही त्यांच्या आईसोबत राहतात.  मात्र समाजातील काही विघातक लोक आपल्या आईचे लहानपणापासूनचे सर्व उपकार विसरून आईला वृद्धाश्रमात ठेवतात अशा मुलांना खरंतर आईच्या पोटी जन्म घेण्याचाही अधिकार नाहीये. 

जेव्हा मुले मोठी होतात आणि शाळेत जातात तेव्हा आईला दिवसभर हुरहुर लागून राहते. मुले शाळेतून आली की आईला आभाळ ठेंगणे झाल्यागत वाटते, मुलासाठी काय करू आणि काय नको असे तिला होते. शाळेतून आल्याबरोबर माझी आई मला सगळ्यात आधी माझ्या आवडीचे पदार्थ जेवायला देते, त्यानंतर माझा अभ्यास घेते आणि झोपताना मला छान गोष्टी देखील सांगते.  

मातृत्व या गोष्टींमध्ये प्रचंड ताकत आहे. आई आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी प्रचंड सामर्थ्यवान बनते. जेव्हा जेव्हा आई मुलावर रागवते किंवा त्याला मारते तेव्हा आई सुद्धा मनातून रडतच असते मात्र आपल्या मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी आईला वेळप्रसंगी कठोर पावले देखील उचलावी लागतात.  मी आजारी असेल तर आईला जेवण सुद्धा गोड लागत नाही. घरातील काम सांभाळून सतत ती माझ्याजवळच बसून असते.

माझी आई माझी एक चांगली मैत्रीण सुद्धा आहे कारण मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माझ्या आई सोबत बोलू शकतो.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

माझी आई सकाळी घरची कामे आवरल्यानंतर शेतात जाते, दिवसभर बाबांबरोबर तेथे कष्ट केल्यानंतर संध्याकाळी घरी येऊन स्वयंपाक देखील करते. आम्हा मुलांचा अभ्यास सुद्धा घेते, झोपण्यापूर्वी घरातील सर्व आवर करून ती मला जवळ घेऊन थोपटून झोपवते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांच्या आधी उठून पुन्हा कामाला सुद्धा लागते. ती कितीही दमली तरी कधीच तक्रार करत नाही. माझी आई दर रविवारी बाजारला जाते. मला आई सोबत बाजारला जायला खूप आवडते. बाजारात आई मला खाऊ घेऊन देते.

घरातील कोणीही आजारी असो, त्यांची सेवा करण्यात माझी आई सदैव तत्पर असते. अशावेळी ती स्वतः उपाशी राहते मात्र आजारी व्यक्तीची पुरेपूर काळजी घेते. ती डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवून ताप उतरवते. माझ्या आईसारखी आजारी व्यक्तीची सेवा कोणीही करू शकत नाही, यासाठी आमचे आजोबा माझ्या आईचे नेहमीच कौतुक करत असतात.

मला जगातील सर्वात उत्तम आई मिळाली आहे. यासाठी मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो, आणि यासाठी देवाला सुद्धा  नेहमीच धन्यवाद देत असतो. माझ्या आईसारखी प्रेमळ आई सर्वांना मिळाली तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होईल…

मित्रांनो, आजच्या या लेखातील ‘माझी आई’ या विषयावरील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे हे निबंध तुम्हाला कसे वाटले याबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. तसेच आपण शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांनाही हा लेख नक्कीच शेअर करा.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

 धन्यवाद…!

Previous

मराठी सुविचार | Marathi Suvichar 

पसायदान | Pasaydan in Marathi

Next

Leave a Comment