इतक्या दिवसांनी तुला बघून काय होईल
याची कल्पनाच करवत नव्हती…
पण तू समोर आलास आणि…
बस त्या क्षणात फक्त तूच होतास,
गाड्यांचा गोंगाट, हातातलं सामान,
प्रवासाचा शीण, सगळं शून्य…
आणि त्या नंतर तुझं
माझी बॅग घेण्यासाठी पुढे येणं
आणि माझ्या खांद्यावर हात टाकून
i miss you so much म्हणणं
तत्क्षणी माझं वास्तवात परत येणं…
तू आहेस, अगदी होतास तसाच, हे जाणवणं
अगं खिडकी नको ना उघडू एसी लावलाय
असं म्हणून पुन्हा स्वतःच एसी बंद करणं,
najm najm लागल्यावर माझ्याकडे बघत बसणं
सगळं तेच !
वर्षभरात सर्व जग बदललं,
आपणही बदलू हे माझं म्हणणं खोटं ठरवणं.
जमलं रे तुला !
आता वाट कुठे नेईल माहीत नाही
पण त्या वाटेवर तू असशील साथी माझा कायमचा!
introverted_soul
आणखी वाचा: