माझ्या ही नकळत मला
माझ्या मनात एक सळ उसळली
या 18 व्या वयात
एक अनोळखी लाट उसळली
या अनोळखी लाटेत, कुठे तरी
प्रेम या शब्दाची ओळख जाणवली
हेच जाणवता जाणवता
प्रेमाची अनेक रुपे दिसली
परंतु ही लाट नक्की कोणती
काही फारशी उमगली नव्हती
तरीही माझ्या या जीवनात
एका नवीन भावनेची उत्पत्ती जाणवली
काही कालांतराने ह्या उत्पत्तीची
नक्की ओळख पटली
माझ्या या जीवनात एका अनोळखी
तरीही जन्मांची ओळख पटणारी
अशा एका व्यक्तीची जाणीव झाली
त्या व्यक्तीची सुंदर प्रतिमा,
माझ्या मनात कोरली गेली.
याची जाणीव होताच मला
तीची ओढ जाणवू लागली,
कल्पना करताक्षणी तीची
हृदयात घंटी वाजू लागली,
घंटी वाजताच जगण्याची
नवी उमेद मिळाली.
गौरव गुळेकर
आणखी वाचा: