स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध | Swachateche Mahatva Marathi Nibandh

| |

स्वच्छता हा आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण  भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसेच मन शांत आणि उत्साही ठेवण्यासाठी स्वच्छता फार गरजेची आहे. म्हणूनच स्वच्छतेची आपल्या जीवनातील गरज पटवून देण्यासाठी स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Swachateche Mahatva Marathi Nibandh) या लेखात दिला आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडतील असे अगदी सोप्या भाषेतील स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Swachateche Mahatva Essay in Marathi) आपल्याला येथे पाहायला मिळतील. 

दहा ओळींमध्ये स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Swachateche Mahatva Marathi Nibandh in 10 Lines)

१. निरोगी शरीर, शांत मन आणि सदृढ आत्मा यासाठी स्वच्छता नितांत आवश्यक आहे.

२. आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची सवय  बाळगणे आवश्यक आहे.

३. अस्वच्छ परिस्थितीमुळे देशभरात अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग येऊन मृत्यू झाले आहेत. जसे की कोरोना.

४. कावीळ, कॉलरा, दाद, खरुज इ. हे आजार दूषित अन्न खाल्ल्याने आणि अस्वच्छ ठिकाणी राहिल्यामुळेच होणारे काही आजार आहेत.

५. जेवण्यापूर्वी किंवा बाहेरून आल्यानंतर हात धुणे ही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्याची उत्तम सवय आहे.

६. जवळपास सर्वच धर्मात स्वच्छतेला अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे आणि सर्व पवित्र धर्मग्रंथांमध्येही स्वच्छतेबद्दल वाचायला मिळते.

७. ‘भागवत पुराणात’ स्वच्छता हा एक आदर्श गुण सांगितलेला आहे जो भगवंताचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक समजला जातो.

८. आपल्या घराच्या आसपासच्या परिसरात दररोज कचरा काढून आपण स्वछता राखायला हवी.

९. गावांमध्ये शौचालये बांधणे आणि उघड्यावर शौचास जाण्यापासून नागरिकांना रोखणे हे स्वछता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सरकारने उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

१०. जर आपल्याला स्वच्छ भारत पहायचा असेल, तर प्रत्तेकजनाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी.

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Swachateche Mahatva Essay in Marathi in 300 Words)

स्वच्छता ही एक अशी सवय आहे जी नैसर्गिकरित्याच प्रत्येक व्यक्तीने आणि समाजाने देखील अंगवळणी लावली पाहिजे. पर्यावरणाच्या तसेच राष्ट्राच्याही प्रगतीसाठी आणि वाढीसाठी स्वच्छ आणि निरोगी समाज असणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा भाग आहे.

स्वच्छतेबद्दल लोकांची असलेली टाळाटाळीची वृत्ती आणि स्वच्छतेप्रती नसलेली जागरूकता पाहता, भारत सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ किंवा ‘स्वच्छ भारत मोहीम’ सुरू केलेली आहे. या मिशनचा उद्देश लोकांना वैयक्तिक स्वच्छतेसह पर्यावरणीय आणि सामाजिक स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करणे हा होता. या दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवहनानुसार अनेक शासकीय कार्यालये,  शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परिसराची स्वछता केली गेली.

राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत अनेक उद्दिष्टे ठरवली गेली होती. या मोहिमेच्या काही मुख्य उद्दिष्टांमध्ये लोकांच्या वैयक्तिक स्वच्छतेचे प्रमाण वाढवणे, त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणे तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हे होते.

या मोहिमेदरम्यान उघड्यावर शौचास जाण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी देशभरात करोडो सुलभ शौचालये बांधण्यात आली. उघड्यावर शौचास जाणे ही एक वाईट सवय आहे जी केवळ मानवी आरोग्यासाठीच नव्हे तर पर्यावरणासाठीही हानिकारकच आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी, स्वच्छतेबाबत त्यांना प्रेरित करण्यासाठी अनेक सरकारी संस्था आणि संबंधित गैर-सरकारी संस्था वेळोवेळी स्वच्छता मोहीमा राबवत असतात. सहसा, अशा मोहिमा स्वयंसेवी प्रकारच्या असतात आणि स्वयं-सहायता गट व संस्था किंवा राजकीय संस्थाद्वारे या मोहिमांना निधी दिला जातो.

आपण आज विद्यार्थी दशेत आहोत. जेव्हा समाजात तळागाळात बदल घडवून आणण्याचा विचार कोणाच्याही मनात येतो, तेव्हा शाळा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आम्ही मुले हे राष्ट्राचे भविष्य आणि तुम्ही घडवू इच्छित असलेल्या सकारात्मक बदलाचे आश्रयदाता असतो. आम्हा मुलांना स्वच्छतेचे फायदे आणि हात धुणे, दात घासणे, आंघोळ करणे इत्यादी दैनंदिन स्वछतेबाबतीत शिकवले गेले तर आम्ही या गोष्टी लगेचच आत्मसात करतो. असे म्हणतात की जेव्हा मूल शाळेत कोणतीही चांगली गोष्ट शिकते तेव्हा ते घरी येऊन आपल्या घरच्यांनाही ती गोष्ट शिकवत असते. स्वच्छतेचे शिक्षण सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही.

पर्यावरण स्वच्छतेमध्ये आपला निसर्गातील हस्तक्षेप कमी करून पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आपण करत असलेल्या गोष्टींचा समावेश होतो. याचा अर्थ निसर्गाच्या इच्छेनुसार पर्यावरण आणि त्यातील घटकांना त्यांच्या मूळ स्वरूपात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे पर्यावरण स्वछता होय. आपले शरीर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी आपली आहे, तशीच आपली पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची सुद्धा प्रथम जबाबदारी आहे.

स्वच्छता हे आपल्यावर लादलेले बंधन नसून ती आपली एक नैतिक जबाबदारी किंबहुना कर्तव्य आहे, हे जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांना उमजेल त्यादिवशी ही भारतभू जगातील सर्वात स्वच्छ देश झाल्या-बिगर राहणार नाही. आणि सर्वांनी एकजुटीने मिळून काम केल्यास तो दिवस दूर नसेल.

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Swachateche Mahatva Marathi Nibandh in 500 Words)

आपण अशा देशांमध्ये राहतो जेथे अगदी दगडात देखील देव पाहिला जातो. भारतीय संस्कृतीची अशी विचारधारा आहे की जिथे स्वच्छता असते तेथे पावित्र्य असते, जिथे पावित्र्य तेथे पवित्रता असते, जेथे पवित्रता आहे तेथे प्रभुत्व असते, आणि जेथे प्रभुत्व आहे तेथे देवत्व हे आपोआपच निर्माण होते. यावरून तुम्हाला समजलेच असेल की “स्वच्छता तेथे देव” असे का म्हटले जाते. 

मात्र आजकालची परिस्थिती बघता आपल्या देशात असलेल्या स्वच्छतेबाबत मात्र लाजेने मान खाली घालावी लागते.

कोणी एकेकाळी भारत हा ‘सोने की चिडिया’ म्हणून ओळखला जायचा, कारण त्याकाळी स्वच्छतेला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जायचे. स्वच्छतेमुळे संपूर्ण देशभर पावित्र्य आणि दिव्यता नांदत होती, परिणामी त्याकाळचा समाज हा अतिशय निरोगी व आरोग्य संपन्न असायचा. आणि असा हा समाज अत्युच्च प्रगती करत भारताला सोन्याच्या चिडिया बनविण्यापर्यंत घेऊन गेला होता, मात्र आज देशात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आणि अस्वच्छता आणि परिणामी त्यांच्या जोडीने येणारे असंख्य दुर्धर असे आजार आणि रोग बघायला मिळतात.

आज देशामध्ये अस्वच्छता, घाण, दुर्गंधी यांनी आपले साम्राज्य वाढवू घातले आहे. याला कारण म्हणजे प्रत्येकाला पुढे जायचे आहे मात्र समाजाचा, निसर्गाचा विचार करण्या-इतपत वेळ कुणाकडेही नाही. समाजातील सर्वच लोक अस्वच्छ नसली तरी देखील काही लोकांच्या अस्वच्छ सवयी मुळे आज आपला देश अधोगतीकडे वाटचाल करत आहे.

जोपर्यंत स्वच्छतेचे महत्व देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला देश आर्थिक क्षेत्रात देखील प्रगती करणे शक्य नाही. आज देखील आपल्या देशातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये शौचालयांची उपलब्धता नाही, तर घरात शौचालय असूनही उघड्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड मोठे आहे. एका सर्वेनुसार भारतातील ५० टक्के लोक अजूनही उघड्यावरच शौचाला जाणे पसंत करतात. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

स्वच्छता ही कोण्या एकट्या दुकट्याने साध्य करायची गोष्ट नसली तरी देखील प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली तर अल्पावधीतच देश स्वच्छ होईल.

आजकाल लोक स्वच्छतेबाबत सरकारला जबाबदार धरतात मात्र सरकारद्वारे दररोज सूचना देऊन देखील फार कमी लोक कचरा गाडीमध्ये कचरा वर्गीकृत करून टाकतात. प्रत्येकाने आपापली स्वतःची जबाबदारी ओळखून स्वच्छतेत योगदान दिले तर भारतासारख्या देशाला स्वच्छ भारत अभियान राबवण्याची गरज देखील भासणार नाही.

मित्रांनो स्वच्छतेचे अनेक फायदे आहेत जसे की स्वच्छतेमुळे प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटते, आजूबाजूच्या परिसरातून रोगराईचे समूळ उच्चाटन होते, निसर्ग आपल्या पूर्ण क्षमतेनिशी कार्य करायला लागतो, घाणीच्या साम्राज्यामुळे पसरणारी   दुर्गंधी सुद्धा बंद होते, अस्वच्छतेतून होणारे प्रदूषण रोखले जाऊ शकते, सरकारचा स्वच्छते विषयक कार्यक्रमांवर होणारा अनाठायी खर्च तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणे कचरा प्रक्रिया करणे इत्यादी कामे देखील वाचू शकतात. स्वच्छतेमुळे शहरी भागात तुंबणारी गटारे, रस्त्याच्या कडेला पडणारे घाणीचे साम्राज्य देखील दूर होते. माणसाचे सामाजिक आर्थिक आणि आरोग्य विषयक देखील फायदे होतात.

मित्रांनो स्वच्छतेचे अनेक पैलू असले तरीदेखील प्रत्येकाने आपली वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता पार पाडणे हे स्वच्छतेतील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले पाऊल ठरते. भारतातील प्रत्येक नागरिकांनी स्वतः सोबतच आपला परिसर आणि कामाचे ठिकाण यांची स्वच्छता रोजच्या रोज केली तर महिने कशाला अवघ्या काही दिवसातच भारत हा स्वर्गासम स्वच्छ आणि सुंदर होईल यात काहीच शंका नाही. 

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध (Essay on Swachateche Mahatva in Marathi in 1000 Words)

स्वच्छता म्हणजे सर्वार्थाने स्वच्छ असण्याची अवस्था होय. बळजबरी करून केली जाते ती म्हणजे साफसफाई तर अगदी मनापासून होते ती स्वच्छता. स्वच्छता ही एक चांगली अन आरोग्याला पूरक अशी सवय आहे जी मानवाचा जीवनाचा दर्जा वाढवते कारण स्वच्छतेमुळे माणूस समृद्ध होतो. मुख्यतः, पालक आणि शिक्षकांनी या सवयीला लहान मुलांपासून प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे त्यांना स्वच्छतेची जाणीव होईल. 

स्वच्छता करणे हे वाटते तितके अवघड काम नाही तर अगदीच सोपे असे काम आहे. समाजातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून फक्त स्वच्छतेत तडजोड केली नाही तर आपोआप सर्व परिसर स्वच्छ होण्यास मदत मिळेल. मानव आणि प्राणी या दोघांच्याही  आरोग्यासाठी स्वच्छतेची सवय अत्यंत महत्त्वाची आहे.

स्वच्छता ही आपल्या सभोवतालच्या घाणीपासून आणि पर्यायाने रोगराई पासून मुक्त राहण्याची एक अवस्था किंवा सवय म्हणता येईल. स्वच्छतेने आपल्याला दिवसभर आल्हाददायक वाटते परिणामी आपली दिवसभरातील सर्वच कामे मार्गी लागतात हे अनुभवाने उमजते. आणि अशा या स्वच्छ वातावरणात निरोगी जीवनशैली जगणे ही सुद्धा एक आनंददायी बाबच म्हणावी लागेल. 

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

स्वच्छता ही इतर कोणाची जबाबदारी नाही, तर स्वच्छ राहणे आणि पर्यावरण स्वच्छ करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि इतरांनाही तसे करायला सांगितले पाहिजे . स्वतःच्या घरापासून आणि शाळा, महाविद्यालये, संस्था, सोसायट्या, विविध संस्थांपासून सुरुवात केली तरी अवघ्या एका दिवसातच अखंड भारत स्वच्छ होऊ शकतो. मात्र असे असले तरी स्वच्छता राखणे हा काही एक दिवसाचा उपक्रम नाही; एकदा केलेली स्वच्छता चिरकाल टिकवण्यासाठी प्रत्येकाने रोज स्वच्छतेची सवय अंगवळणी पाडायला हवी. 

स्वच्छता म्हणजे चांगले जीवनमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचे पालन केले पाहिजे व हा सर्वात मोठा गुण आहे. खरंतर लहान-मोठा उच्च-नीच श्रीमंत-गरीब अशा सर्वांनी स्वच्छता स्वयंस्पृतिने करावयास हवी, परंतु कधीकधी ते जबरदस्तीने केले जाते आणि यामुळे व्यवस्थितरीत्या स्वच्छता पार पडत नाही. आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना स्वच्छतेची सवय लावली पाहिजे. 

अस्वच्छता आणि रोगराई यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. रोगराईमुळे जन-जीवनावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, हे आपण कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे. इतरांसाठी म्हणून नाही तर किमान स्वतःला रोगराई होऊ नये म्हणून तरी प्रत्येकाने स्वच्छता ही राखावयासच हवी.

मित्रांनो असे प्रत्येक गोष्टीला नियम असतात त्याप्रमाणे स्वच्छतेला ही काही नियम आहेत. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टीस देखील स्वच्छ करणे तेवढेच महत्त्वाचे आहे, अन्यथा स्वच्छते ऐवजी आणखीच अस्वच्छता पसरत जाईल. शहरातील अपवाद सोडली तर शक्य त्या सर्वच ठिकाणी एक शौचालय घरापासून वेगळे लांब जागेवर असले पाहिजे आणि रोग-संक्रमण आणि रोग-लागण टाळण्यासाठी त्यास दरवाजे असले पाहिजेत. टॉयलेट वापरल्यानंतर प्रत्येकानेच आपले हात हँडवॉश किंवा साबणाच्या सहाय्याने धुवावेत. रोगा संक्रमण झाल्यास लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपल्याकडे प्रथमोपचार साहित्य देखील असणे गरजेचे ठरते. 

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

हानिकारक जीवाणूंची निर्मिती ही शक्यतो अस्वच्छ ठिकाणी वाढलेल्या भाज्यांवर किंवा साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये आणि अडगळीच्या खोलीत होत असते. त्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि त्यांचे वाढते उत्पन्न थांबवण्यासाठी आपण रस्त्याकडेने किंवा कुठूनही भाजी घेताना नीट पारखून घेणे गरजेचे आहे तसेच घरी आल्यानंतर पुरेशा पाण्याने भाज्या नेहमीच धुतल्या गेल्या पाहिजेत. सोबतीने अडगळीच्या खोलीतील कोणतीही वस्तू वापरण्यापूर्वी तिला पुरेशा प्रमाणात स्वच्छ केल्यानंतरच ती वापरात आणावी.

स्वच्छता राखणे ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वपूर्ण असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते. शिक्षणात सुद्धा, स्वच्छतेला पहिले स्थान देण्यात येते कारण स्वच्छ आणि शांत परिसरात विद्यार्थ्यांचा अभ्यास अतिशय चांगला होतो.

विद्यार्थी दशेतील स्वच्छता ही विविध अंगाची मिळून बनलेली असते. यामध्ये सर्वप्रथम आपल्या घर आणि वर्गखोलीसह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे, रोज नेटकी अंघोळ करून शाळेत जाणे, आठवड्याच्या आठवड्याला नखे कापणे, त्यांची स्वच्छता राखणे, केस वेळच्या वेळी कापणे याचा समावेश होतो.

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर सभोवतालच्या स्वच्छ किंवा अस्वच्छ अशा दोन्ही प्रकारच्या वातावरणाचा प्रभाव पडतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. घाणेरडे वातावरण शिकण्यासाठी अजिबात अनुकूल नसते, कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव आणि चिडचिडेपणा निर्माण होतो आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता कमी होते.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

शिक्षणाव्यतिरिक्त कामाच्या ठिकाणीही, हीच संकल्पना लागू होते, कारण आजूबाजूच्या जागेचा कामाच्या उत्पादकतेवर सुद्धा प्रभाव पडतो . स्वच्छ वातावरण असेल तर कामाची उत्पादकता आपोआपच वाढेल, कारण कर्मचारी तणावमुक्त वातावरणात आणि  सकारात्मक मानसिकतेने काम करतील. घाणेरड्या ठिकाणाच्या तुलनेत स्वच्छ वातावरणातील केलेल्या कोणत्याही गोष्टीला यश अधिक असेल. 

आरोग्यामध्ये देखील, स्वच्छता महत्वाची आहे कारण स्वच्छतेच्या पद्धती चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच योगदान देतात. आजूबाजूचा घाणेरडा परिसर लोकांना रोगास बळी पाडतो ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन काम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे लोकांची अन परिणामी देशाची अधोगती होते. 

समाजातील लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्याशी नाते निर्माण होतात. आणि हे नाते निर्माण करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे, कारण घाणेरड्या व्यक्तीकडे जाणे सोडा त्याच्याशी बोलणे देखील कोणी पसंत करत नाही. मात्र समोरचा माणूस नीटनेटका व्यवस्थित आणि स्वच्छ असेल तर मग मात्र नात्यांचे हे बंध आणखीच घट्ट होण्यास मदत होते.

आजूबाजूच्या परिसरावर आणि मानवी शरीरावर स्वच्छतेचे विविध सकारात्मक परिणाम दिसून येतात. स्वच्छतेमुळे संसर्ग आणि आजार दूर राहतात आणि सुंदर आणि स्वच्छ जीवन जगण्यास मदत होते. स्वच्छता ही आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकासात देखील मदत करते.  जरी अन्न पौष्टिक आणि स्वच्छ असेल तरीही त्यातून संपूर्ण पोषक तत्व मिळण्यासाठी आणि रोग दूर ठेवण्यासाठी आपण ते स्वच्छ भांड्यांमध्ये आणि धुतलेल्या हातांनी खावे. 

व्यक्तीच्या माणसे आरोग्यासाठी स्वच्छता बहुअंगाने फायदेशीर ठरते. स्वच्छ वातावरणातील लोक चिडचिड कमी असतात असा अनेक अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. आणि व्यक्तीचे मानसिक आरोग्य स्थिर असेल तर पर्यायाने समाजाचे देखील मानसिक आरोग्य स्थिर राहते आणि समाजात शांती प्रस्तावित होण्यास मदत होते.

मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वच्छतेला इतर गोष्टींप्रमाणेच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, अन्न, पाणी, निवारा या जीवनावश्यक गोष्टींप्रमाणेच स्वच्छतेलाही जीवनात एक आढळ असे स्थान प्राप्त झालेले आहे. स्वच्छतेचे महत्व हे स्वच्छतेतून होणाऱ्या फायद्यांमुळे अधोरेखित केले जाते. स्वच्छतेचा सर्वात पहिला फायदा म्हणजे चांगले आरोग्य होय, मग ते शारीरिक आरोग्य असो मानसिक की सामाजिक. चांगल्या आरोग्य म्हणजे केवळ कुठलाही आजार अथवा रोग नसणे असा होत नाही तर सर्व दृष्टीने माणूस प्रसन्न असणे म्हणजे खरे आरोग्य होय आणि ते स्वच्छतेतूनच प्राप्त होते.

स्वच्छतेमुळे कुठल्याही जिवाणू किंवा विषाणूचे वाढण्याचे प्रमाण अगदीच नगण्य होऊन जाते. त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम जो असू शकतात तसेच कसरत करून उत्तम शरीर कमावण्यास सुद्धा यामुळे चालना मिळते.

मित्रांनो स्वच्छतेचा सर्वांना हवाहवासा असणारा मात्र नेहमीच दुर्लक्षित केला जाणारा फायदा म्हणजे सभोवतालचे सुंदर वातावरण होय. स्वच्छतेमुळे आपला परिसर अधिकच आकर्षक दिसू लागतो निसर्ग आपल्या मूळ रूपात येऊन बहरायला लागतो आणि सर्वत्र नयनरम्य दृश्याची निर्मिती होते, यामुळे आपल्याला बघण्याला चांगले वाटण्यासोबतच भारत देशाकडे अनेक देशी आणि विदेशी विदेशी पर्यटक देखील आकर्षित होतात ज्याचा फायदा म्हणून स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार देखील लागतो.

थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्तीच्या सुखाच्या किंवा शांततेच्या गरजा या वेगवेगळ्या असतात जसे काही लोकांना अध्यात्मिक शांतता हवी असते काहींना स्वच्छता हवी असते तर काहींना आवाजाची शांतता. मात्र स्वच्छता या सर्वांची पूर्तता करते. थोडक्यात काय तर स्वच्छता ही माणसाच्या उत्तम जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

पूर्वीच्या काळी आजच्या पेक्षाही लोक स्वच्छतेच्या बाबतीत जास्त जागरूक होते. पूर्वीच्या स्त्रिया सकाळी आंघोळ केल्याशिवाय कुठलेही काम करत नसत अगदी जेवणही बनवायला घेत नसत तर पुरुष मंडळी अंघोळीपूर्वी कसरत करत आणि अंघोळ झाल्यानंतर पूजापाठ आटोपला की मगच दैनंदिन कामाला हात लावत असत. यातील पवित्रता अपवित्रता पेक्षाही स्वच्छतेचे महत्त्व प्रकर्षाने समजून घेतले पाहिजे. इतकेच कशाला अगदी पूर्वीपासून स्वच्छतेमुळे समाजातील अनेक लोकांना रोजगार मिळत आलेला आहे. याच स्वच्छतेमुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळत आहे.

मित्रहो स्वच्छता राखणे कधीही कठीण काम नसते आणि निरोगी जीवनासाठी प्रत्येक जण दिवसातील थोडासा वेळ काढून स्वच्छता ही करूच शकतो. वैयक्तिक जीवना बद्दल बोलायचे झाल्यास  आपण नियमित आंघोळ करून स्वच्छता राखू शकतो. जेवणाआधी आणि सौचानंतर हात धुणे, आपला परिसर रोजच्या रोज स्वच्छ करणे, रोजचा कचरा वर्गीकरण करून योग्य कचरापेटी टाकणे या आणि यासारख्या अनेक छोट्या छोट्या सवयी अंगीकारून आपण स्वच्छतेप्रति आपले देणे देऊ शकतो. 

धन्यवाद…!

Previous

महत्त्वाची मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi Books and Their Authors

मराठी बालगीते | Marathi Balgeet Lyrics

Next

Leave a Comment