सॅमसंगचा नवीन सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन Samsung Galaxy A32 5G लवकरच भारतात

| |

 सॅमसंग वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

सॅमसंग लवकरच गॅलॅक्सी ए सिरीज मधील नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.

भारतातील सॅमसंग फोन्सची वाढती मागणी पाहता सॅमसंग गॅलॅक्सी ए३२ ५जी (Samsung Galaxy A32 5G) हा नवीन फोन घेऊन भारतीयांच्या सेवेसाठी हजर होत आहे.

सॅमसंगने मागच्याच महिन्यात युरोप मध्ये हा फोन लाँच केला आहे.

आता भारतासह अन्य काही देशांमध्ये हा फोन शिरकाव करण्याच्या तयारीत आहे.

यासंबंधीचे सपोर्ट पेज सॅमसंग इंडिया वेबसाईटवर प्रकाशित झाले आहे.

त्यामुळे लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात दिसण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

या स्मार्टफोनच्या लाँचिंग डेट आणि किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

आणखी वाचा: सॅमसंगचे तीन नवीन स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीला… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

काय आहेत Samsung Galaxy A32 5G ची स्पेसिफिकेशन्स?

लार्ज डिस्प्ले, जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी याशिवाय फास्ट चार्जिंग ही काही या फोनची वैशिष्ट्ये आहेत.

हा फोन भारतामध्ये ५जी सपोर्ट असेल की ४जी हे अजून स्पष्ट झालेले नाही. 

डिस्प्ले (Samsung Galaxy A32 5G Display)

Samsung Galaxy A32 DisplayPin
Samsung Galaxy A32 Display

सॅमसंग गॅलॅक्सी ए ३२ मध्ये ६.५ इंचाचा ८१.६ % स्क्रीन टु बॉडी रेशिओ असलेला लार्ज डिस्प्ले देण्यात आला आहे.

याचे रिझोल्युशन १८०० x २४०० पिक्सेल आहे तर हा इन्फिनिटी व्ही टाईप डिस्प्ले आहे.

डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कोणते ग्लास वापरण्यात आले आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.

कॅमेरा (Samsung Galaxy A32 5G Camera setup)

Samsung Galaxy A32 CameraPin
Samsung Galaxy A32 Camera

क्वाॅड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी ए३२  ५जी स्मार्टफोन मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/१.८ अपर्चर असलेला ४८ मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे.

त्याचबरोबर हा फोन एफ/२.२ अपर्चर असलेल्या ८ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड एंगल लेंसला सपोर्ट करतो.

छोट्या गोष्टींचे फोटो काढण्यासाठी एफ/२.४ अपर्चर असलेली  ५ मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला २ मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी गॅलेक्सी ए३२ मध्ये एफ/२.२ अपर्चर असलेला १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम आणि प्रोसेसर (OS and SoC)

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी हा स्मार्टफोन ७ नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेल्या मीडियाटेक डायमेंसीटी ७२० चिपसेटवर काम करतो.

यामध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे ज्याचा मॅक्सिमम सीपीयू स्पीड २.० गिगा हर्ट्झ इतका आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टिमवर लॉन्च झाला आहे जो वन युआय ३.० सह काम करतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी मध्ये ग्राफिक्ससाठी माली -जी ५७ एमसी ३ (Mali-G57 MC3) जीपीयू वापरण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज (RAM and Storage)

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध करण्यात येणार आहे.

सध्या या एकाच व्हेरिएन्ट बद्दल माहिती देण्यात आली आहे.

यासोबतच मायक्रो एसडी कार्डद्वारे १ टीबी कॅपॅसिटीपर्यंतच्या एक्सपांडेबल स्टोरेजची सुविधाही देण्यात आली आहे.   

बॅटरी (Samsung Galaxy A32 5G Battery and Charging)

Samsung Galaxy A32 BatteryPin
Samsung Galaxy A32 Battery

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी मध्ये ५००० एमएएच ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे.

ही १५ वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत (Samsung Galaxy A32 5G Price)

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी या फोनच्या किमतींबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीकडून करण्यात आलेली नाही आहे. 

परंतु याची अंदाजे किंमत २५४९९ रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.     

कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध? (Available Colors)

Samsung Galaxy A32 Color VarientsPin
Samsung Galaxy A32 Color Varients

सॅमसंग गॅलेक्सी ए३२ ५जी ग्राहकांसाठी चार रांगांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि जांभळा या रंगांचा समावेश आहे. यातील तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता.

आणखी वाचा: Realme X7 5G व X7 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Previous

विराट कोहली बायोग्राफी

डोळ्यांत तुझ्या मी पाहता वाटे…

Next

Leave a Comment