स्मार्टफोनच्या दुनियेत फार कमी काळात आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारी रिअलमी भारतीय बाजारात अजून दोन स्मार्टफोन्स घेऊन आली आहे.
कमी किंमतीतल्या फोन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या रिअलमीने यावेळी फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपली दावेदारी सादर केली आहे.
रिअलमी एक्स ७ या सीरिज मधले रिअलमी एक्स ७ (Realme X7 5G) आणि रिअलमी एक्स ७ प्रो (Realme X7 Pro 5G) हे दोन नवीन फोन्स कंपनीने भारतात सादर केले आहेत.
विशेष म्हणजे हे दोन्ही फोन्स ५जी ला सपोर्ट करत आहेत.
लार्ज डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, शानदार कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी अशा दमदार फीचर्ससोबत हे फोन्स भारतीय बाजारपेठेंत धुमाकूळ घालण्यास सज्ज आहेत.
पाहूया या फोन्सची काही अनोखी फीचर्स.
डिस्प्ले (Realme X7/X7 Pro 5G Display)
डिस्प्ले हि कोणत्याही फोनची एक महत्वाची गोष्ट असते, कारण ती नेहमी आपल्या नजरेसमोर असते.
रिअलमीने आपली एक्स ७ सीरीजसाठी पंच होल डिस्प्लेचा वापर केला आहे.
या सिरीजमधील पहिला फोन रियलमी एक्स ७ मध्ये १०८० × २४०० पिक्सल रेज्ल्यूशन असलेला ६.४ इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
तसेच रियलमी एक्स ७ प्रोमध्ये १०८० × २४०० पिक्सल रेज्ल्यूशन असलेला ६.५५ इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
रियलमी एक्स ७ ची स्क्रीन ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तर एक्स ७ प्रो ची स्क्रीन १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
दोन्ही फोन्स मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चं डिस्प्लेसाठी प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम आणि प्रोसेसर (OS and SoC)
दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टिमवर लॉन्च झाले आहेत जे रिअलमी युआयसह काम करतात.
रिअलमी एक्स ७ मध्ये ७ एनएम चा २.६ गीगाहर्ट्जपर्यंत क्लॉक स्पीड असलेला मीडियाटेक डायमेंसिटी ८००यू ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
तर रिअलमी एक्स ७ प्रो हा स्मार्टफोन २.६ गीगाहर्ट्जपर्यंत क्लॉक स्पीड असलेल्या ७ एनएम फॅब्रिकेशनवर काम करणाऱ्या मीडियाटेक डायमेंसिटी १०००+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.
रिअलमी एक्स ७ मध्ये ग्राफिक्ससाठी माली जी७७ जीपीयू तर रिअलमी एक्स ७ प्रोमध्ये एआरएम जी७७ एमसी ९ (ARM G77 MC9) जीपीयू वापरण्यात आला आहे.
रॅम आणि स्टोरेज (RAM and Storage)
रिअलमी एक्स ७ हा स्मार्टफोन ६ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
रिअलमी एक्स ७ प्रो हा ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा (Realme X7/X7 Pro 5G Camera)
रिअलमी एक्स ७ स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप प्रोव्हाइड करतो.
त्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रो लेंस यांचा समावेश आहे.
रिअलमी एक्स ७ प्रो हा क्वाड कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे.
त्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर,८ मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि पोर्ट्रेट लेंन्स देण्यात आली आहे.
बॅटरी (Realme X7/X7 Pro 5G Battery)
रिअलमी एक्स ७ स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी ५० वॅट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह ४३१० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
तर रिअलमी एक्स ७ प्रो ला ६५ वॅट फास्ट चार्जिंगसह ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
दोन्ही फोन्स यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतात.
किंमत (Realme X7/X7 Pro 5G Price in India)
रिअलमी एक्स ७ च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज वेरिएंट ची किंमत २१,९९९ रुपये एवढी आहे.
या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट आणि रिअलमी.कॉम वर १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून असेल.
रिअलमी एक्स ७ प्रोच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे.
आणखी वाचा: सॅमसंगचे तीन नवीन स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीला… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत