सॅमसंगचे तीन नवीन स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीला… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

| |

सॅमसंग… स्मार्टफोन्सच्या दुनियेतील एक नावाजलेली कंपनी.

आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांसाठी ओळखली जाणारी भारतीय बाजारपेठेतील एक अग्रेसर कंपनी.

उत्कृष्ट डिस्प्ले ही सॅमसंगच्या स्मार्टफोन्सची खासियतच म्हणावी लागेल.

अशातच सॅमसंग आपल्या भेटीला तीन नवे ५ जी स्मार्टफोन्स घेऊन येत आहे.(Samsung Galaxy S21 5G, S21 Plus 5G, S21 Ultra 5G Price Features Specifications in Marathi)

गॅलॅक्सी एस सिरीजमधील ‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ (Galaxy S21 5G), ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ (Galaxy S21+ 5G) आणि ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ (Galaxy S21 Ultra 5G).

Samsung Galaxy S21 5G ImagesPin
Samsung Galaxy S21 5G Images

या तिन्ही ५जी फोन्समध्ये भरभरून फीचर्स देण्यात आली आहेत.

लार्ज डिस्प्ले, दमदार कॅमेरा, जबरदस्त बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि भरमसाठ स्टोरेज कॅपॅसिटी या फोन्सला ‘चार चांद’ लावतात.

डिस्प्ले (Samsung Galaxy S21/S21+/S21 Ultra 5G Display)

सॅमसंगच्या डिस्प्लेबद्दल काय बोलणार? ही कंपनी आपल्या फोन्सच्या डिस्प्लेसाठीच ओळखली जाते.

Samsung Galaxy S21 5G DisplayPin
Samsung Galaxy S21 5G Display

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी मध्ये ६.२ इंचाचा सुपर स्मूथ फ्लॅट फुल एचडीप्लस (Flat FHD+) डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ साठी ६.७ इंचाचा सुपर स्मूथ फ्लॅट फुल एचडीप्लस (Flat FHD+) डिस्प्ले देण्यात आला आहे तर ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ साठी ६.८ इंचाचा एज क्वाड एचडीप्लस (Edge Quad HD+) डिस्प्ले देण्यात आला आहे.

तिन्ही स्मार्टफोन्सच्या स्क्रीन्स १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.

डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी लेटेस्ट कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचा उपयोग करण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम आणि प्रोसेसर (OS and SoC)

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’, ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ आणि ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ तिन्ही फोन्समध्ये ५ नॅनोमीटर फॅब्रिकेशन असणारा ऑक्टा कोर एक्सिनोस २१०० प्रोसेसर वापरला आहे.

ज्याचा मॅक्सिमम सीपीयू स्पीड २.९ गिगा हर्ट्झ इतका आहे.

तिन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टिमवर लॉन्च झाले आहेत जे वन युआय ३.१ सह काम करतात.

सॅमसंग गॅलॅक्सी एसी २१ अल्ट्रा ५जी मध्ये मोबाईल कनेक्ट टू विंडो (Mobile Connect to Window) फिचर देण्यात आले आहे. या फिचर चा करून कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर मोबाईल वापरू शकता.

Samsung Galaxy S21 Ultra 5G Windows OS connectivityPin
Samsung Galaxy S21 Ultra 5G Windows OS connectivity

रॅम आणि स्टोरेज (RAM and Storage)

रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत हे फोन्स कोणालाच नाराज करत नाहीत.

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ आणि ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ हे दोन फोन्स ‘८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज’ आणि ‘८ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज’ अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ हा स्मार्टफोनसुद्धा ‘१२ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज’ आणि ‘१६ जीबी रॅम, ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज’ अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

कॅमेरा (Samsung Galaxy S21/S21+/S21 Ultra 5G Camera)

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ आणि ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ हे ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप प्रोव्हाइड करतात.

Samsung Galaxy S21 5G CameraPin
Samsung Galaxy S21 5G Camera

त्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा तर १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे.

दोन्ही फोन्स ३०x पर्यंत स्पेस झूम करू शकतात.

‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ हा स्मार्टफोन क्वाड रेअर कॅमेरा सेटअप प्रोव्हाइड करतो.

त्यामध्ये १०-१० मेगापिक्सलचे दोन टेलीफोटो कॅमेरा, १०८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन १००x एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पेस झूम करू शकतो.

फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर ‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ आणि ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ मध्ये प्रत्येकी १० मेगापिक्सलचा तर ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ मध्ये ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी (Samsung Galaxy S21/S21+/S21 Ultra 5G Battery)

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ या स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी ४००० एमएएच, ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’मध्ये ४८०० एमएएच तर ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’मध्ये ५००० एमएएच अशी जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे.

सोबतच ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’मध्ये वायरलेस चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे.

किंमत (Samsung Galaxy S21/S21+/S21 Ultra 5G Price)

‘गॅलॅक्सी एस २१ ५जी’ ची किंमत ६९,९९९ रुपये तर ‘गॅलॅक्सी एस २१ प्लस ५जी’ ची किंमत ८१,९९९ रुपये आहे. ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा ५जी’ ची किंमत १०५९९९ रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy S21 Ultra 5G Water ResistancePin
Samsung Galaxy S21 Ultra 5G Water Resistance

सॅमसंग गॅलॅक्सी एसी २१ अल्ट्रा ५जी हा स्मार्टफोन पूर्णपणे वॉटर रेझिस्टन्स (Water Resistance) आहे त्यामुळे पाण्यात पडला तरीही काही टेन्शन नाही.

आणखी वाचा: Realme X7 5G व X7 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Previous

व्हाट्सअ‍पला भारतीय पर्याय, संदेस अ‍ॅप (Sandes App) सर्वांसाठी उपलब्ध! जाणून घ्या काय आहे खास

कार्तिक आर्यन बायोग्राफी

Next

Leave a Comment