कार्तिक आर्यन बायोग्राफी

| |

कार्तिक आर्यन बायोग्राफी (Kartik Aaryan Biography)

सध्या तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाव म्हणजे कार्तिक आर्यन.

दिसायला देखणा असलेल्या कार्तिकचे खरे नाव कार्तिक तिवारी असे आहे.

कार्तिकचा जन्म २२ नोव्हेंबर १९८८ रोजी ग्वालियर, मध्यप्रदेश येथे झाला.

बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनीरिंगची पदवी घेत असतानाच कार्तिकने मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

तीन वर्षाच्या संघर्षानंतर २०११ साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

त्यानंतर कार्तिकने २०१३ साली ‘आकाशवाणी’ आणि २०१४ साली ‘कांची: द अनब्रेकेबल’ या चित्रपटांमध्ये काम केले परंतु या चित्रपटांना तितकेसे यश मिळाले नाही.

२०१५ साली कार्तिकने लव रंजन आणि नुसरत भरूचा यांच्यासोबत २०१५ साली केलेल्या ‘प्यार का पंचनामा २’ तसेच २०१८ साली केलेल्या ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटांनी कार्तिकची चित्रपटसृष्टीत नवी ओळख निर्माण केली.

यानंतर त्याने ‘लुका छुपी’ आणि ‘पती पत्नी और वो’ यांसारखे आणखी काही चित्रपट केले.

कार्तिक आर्यन बायोग्राफी (Kartik Aaryan Biography)

बायोग्राफी 
पूर्ण नाव कार्तिक तिवारी
टोपणनाव कोकी 
व्यवसायअभिनेता, मॉडेल 
जन्मतारीख २२ नोव्हेंबर १९८८
वय (नोव्हेंबर २०२० मध्ये)३२ वर्षे  
सोशल मीडिया इंस्टाग्राम – kartikaaryan
फेसबुक – Kartik Aaryan
ट्विटर – Kartik Aaryan
शरीरयष्टी 
उंची (अंदाजे) १८३ सेंमी
१.८३  मीटर 
६.० फूट 
डोळ्यांचा रंगतपकिरी 
केसांचा रंग काळा
वैयक्तिक आयुष्य 
जन्म ठिकाणग्वालियर, मध्यप्रदेश
रास  वृश्चिक
राष्ट्रीयत्वभारतीय
मूळ शहरग्वालियर, मध्यप्रदेश
शाळा सेंट पॉल स्कूल, ग्वालियर
कॉलेज डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग नेरुळ, नवी मुंबई
शैक्षणिक पात्रता इंजिनीरिंग इन बायोटेक्नोलॉजी
पदार्पण चित्रपट: प्यार का पंचनामा (२०११)
कुटूंब वडील: डॉ.मनीष तिवारी (बालरोगतज्ञ) 
आई:डॉ. माला तिवारी (स्त्रीरोगतज्ञ)
भाऊ: नाही 
बहीण: कृतिका तिवारी
धर्म हिंदू 
छंद अभिनय
वैवाहिक स्थितीअविवाहित 

सुरुवातीचे जीवन

कार्तिकचा जन्म २२ नोव्हेंबर १९८८ रोजी ग्वालियर, मध्यप्रदेश येथे झाला.

त्याचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत.

वडील डॉ. मनीष तिवारी हे ‘बालरोगतज्ञ’ तर आई डॉ. माला तिवारी ही ‘स्त्रीरोगतज्ञ’ आहे.

कार्तिकला एक छोटी बहीण देखील आहे. तिचे नाव कृतिका तिवारी आहे. कार्तिक तिला लाडाने किट्टू म्हणतो.

कार्तिकने आपले शालेय शिक्षण सेंट पॉल स्कूल, ग्वालियर (St. Paul’s School, Gwalior) आणि किडीज स्कूल, ग्वालियर (Kiddy’s School, Gwalior) येथून पूर्ण केले आहे.

यासोबतच त्याने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग नेरुळ, नवी मुंबई (D. Y. Patil College of Engineering Nerul, Navi Mumbai ) येथून बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनीरिंगची पदवी घेतली आहे.

त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे की कॉलेजमधील लेक्चर्स बुडवून तो दोन दोन तास प्रवास करून ऑडिशन्स देण्यासाठी जात असे.

कार्तिकने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

तीन वर्षे ऑडिशन्समध्ये अयशस्वी झाल्यानंतर त्याने क्रिएटिंग कॅरेक्टर्स इन्स्टिट्यूट (Kreating Charakters Institute) येथे अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली.

पहिला चित्रपट मिळाल्यानंतर त्याने आपल्या आईवडिलांना अभिनेता बनण्याचे आपले स्वप्न आहे असे सांगितले.

आणखी वाचा: दीपिका पदुकोण बायोग्राफी

करिअर

कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात असताना कार्तिकने लव रंजन यांच्या प्यार का पंचनामा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

लव रंजन यांनी फेसबुकवर त्याला ऑडिशन देण्याविषयी मेसेज केला होता.

कार्तिकचा पहिला चित्रपट प्यार का पंचनामा प्रदर्शित झाल्यानंतर आईच्या आग्रहाखातर त्याने आपले इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट ‘आकाशवाणी’ हा दोन वर्षानंतर म्हणजेच २०१३ साली रंजन आणि नुसरत भरूचा यांच्यासोबतच प्रदर्शित झाला.

कार्तिक आर्यनच्या कामाने प्रभावित होऊन सुभाष घई यांनी त्याला ‘कांची: द अनब्रेकेबल’ हा चित्रपट ऑफर केला.

‘आकाशवाणी’ आणि ‘कांची: द अनब्रेकेबल’ या दोन्ही चित्रपटांना फारसे काही यश मिळाले नाही त्यामुळे कार्तिकच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

परंतु कार्तिक २०१५ साली पुन्हा लव रंजन यांच्या ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

यामध्ये त्याने जवळपास ६ ते ७ मिनिटांचा सिंगल शॉट मोनोलॉग सादर केला जे या अगोदर भारतीय सिनेसृष्टीत फार क्वचितच घडले होते. हीच नंतर कार्तिकची अभिनय क्षेत्रातली ओळख बनली.

कार्तिक आर्यन ने केलेल्या चित्रपटांची यादी

चित्रपटवर्षभाषा
प्यार का पंचनामा२०११ हिंदी
आकाशवाणी २०१३ हिंदी
कांची: द अनब्रेकेबल२०१४हिंदी
प्यार का पंचनामा २२०१५ हिंदी
सिलवट (शॉर्ट फिल्म)२०१६ हिंदी
गेस्ट इन लंडन २०१७ हिंदी
सोनू के टिटू की स्वीटी २०१८ हिंदी
लुका छुपी २०१९ हिंदी
पती पत्नी और वो२०१९ हिंदी
लव्ह आज कल २०२० हिंदी

अभिनय क्षेत्राबरोबरच कार्तिकने काही नावाजलेल्या ब्रँड साठी जाहिराती देखील केल्या आहेत.

त्यामध्ये क्रीम ‘इमामी फेअर अँड हँडसम’, कपड्यांचा ब्रँड ‘मान्यवर’ असे काही मोठे ब्रॅण्ड्स सामील आहेत.

याशिवाय २०१८ साली झालेल्या ‘आयफा अवॉर्ड्स’ (2018 IIFA Awards) मध्ये आयुष्यमान खुराना सोबत तर २०१९ साली ‘झी सिने अवॉर्ड्स’ ( 2019 Zee Cine Awards) मध्ये अभिनेता विकी कौशल सोबत सहाय्यक सूत्रसंचालकाचे कामही केले आहे.

२०१६ साली चॅरिटी साठी फुटबॉल सामन्यांचे आयोजन करणाऱ्या ‘ऑल स्टार फुटबॉल क्लब’ चा मेंबर बनला.

पुढील काही दिवसांत कार्तिक ‘धमाका’, ‘दोस्ताना २’, ‘भूल भुलैय्या २’ या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

आणखी वाचा: नोरा फतेही बायोग्राफी

Kartik Aaryan Cool Look HD ImagesPin
Kartik Aaryan Cool Look HD Images
Kartik Aaryan Cool ImagesPin
Kartik Aaryan Cool Images
Kartik Aaryan Cool Attitude HD ImagesPin
Kartik Aaryan Cool Attitude HD Images
Kartik Aaryan Classy ImagesPin
Kartik Aaryan Classy Images
Kartik Aaryan Stylish ImagesPin
Kartik Aaryan Stylish Images
Kartik Aaryan Professional ImagesPin
Kartik Aaryan Professional Images
Kartik Aaryan in Kurta ImagesPin
Kartik Aaryan in Kurta Images
Kartik Aaryan Full HD ImagesPin
Kartik Aaryan Full HD Images
Kartik Aaryan Cute ImagesPin
Kartik Aaryan Cute Images
Kartik Aaryan Cool Hairstyle ImagesPin
Kartik Aaryan Cool Hairstyle Images
Kartik Aaryan Classy LookPin
Kartik Aaryan Classy Look
Kartik Aaryan Blazer ImagesPin
Kartik Aaryan Blazer Images
Kartik Aaryan Traditional ImagesPin
Kartik Aaryan Traditional Images
Kartik Aaryan New HD ImagesPin
Kartik Aaryan New HD Images
Kartik Aaryan Killer lookPin
Kartik Aaryan Killer look
Kartik Aaryan Hot ImagesPin
Kartik Aaryan Hot Images
Kartik Aaryan HD ImagesPin
Kartik Aaryan HD Images
Kartik Aaryan Decent LookPin
Kartik Aaryan Decent Look
Kartik Aaryan Decent Look ImagesPin
Kartik Aaryan Decent Look Images
Previous

सॅमसंगचे तीन नवीन स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीला… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तैमूर झाला दादा! सैफ आणि करिनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न!

Next

Leave a Comment