स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

| |

१५ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. या दिनानिमित्त शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Essay in Marathi) लिहायला सांगितला जातो. म्हणूनच या लेखात आपण पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असा स्वातंत्र्यदिनावर मराठी निबंध (Independence Day Marathi Essay) पाहणार आहोत.

१० ओळींमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (10 Lines Independence Day Essay in Marathi)

१. भारत दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

२. शेकडो वर्षे इंग्रजांच्या गुलामीत राहिलेल्या आपल्या या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

३. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा आदर करतो.

४. संपूर्ण देश राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.

५. स्वातंत्रदिनाच्या दिवशी आपल्या संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी दिली जाते.

६. आम्हाला सुट्टी असली तरी ध्वजारोहण समारंभाला आम्ही शाळेत जातो.

७. आम्ही राष्ट्रगीत गातो आणि तिरंग्याला सलामी देतो.

८. शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर, आम्ही घरी जातो आणि राजधानीत होणारी राष्ट्रीय परेड दूरदर्शनवर पाहतो.

९. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाच्या विविध संस्कृतींचा उत्सवही आहे.

१०. देशभक्तीपर गीते गाऊन, झेंडा दाखवून लोक देशावरील प्रेम दाखवतात.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 300 Words)

१५ ऑगस्ट १९४७ हा भारतीयांसाठी सुवर्ण दिवस होता, कारण भारत त्या दिवशी २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर स्वतंत्र झाला. ज्या लोकांनी स्वातंत्र्याचा संघर्ष सहन केला आणि पाहिला त्यांच्यासाठी हा काळ इतका सोपा नव्हता. हा एक खडतर प्रवास होता कारण स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक सामान्य लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी आपल्या बहुमोल प्राणांची आहुती दिली.

महात्मा गांधी, लाला लजपत राय, सरदार वल्लभ भाई पटेल, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि इतर अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी खूप काही केलेले आहे. त्यांना अनेक वेळा पोलिसांची मारहाण आणि तुरुंगवास भोगावा लागला पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि प्रसंगी आपल्यासाठी बलिदान दिले मात्र या देशाला स्वतंत्र केले.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

१५ ऑगस्ट १९४७ पासून आजतागायत स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीय राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात.  तो संपूर्ण देशात साजरा केला जात असला तरी देखील भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ,संपूर्ण सोहळा राजपथापासून सुरू होतो, राष्ट्रपती भवन किंवा संसद भवनाकडे जातो.रस्त्यावर प्रचंड गर्दी असते.अनेक लष्करी अधिकारी,पोलीस आणि सामान्य लोकही तिथे सामील होतात. शाळा,महाविद्यालये,विद्यापीठांचे विद्यार्थी अनेक कला सादर करतात,देशभक्तीमध्ये सहभागी होतात. गायन आणि नृत्य हे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. 

ध्वजारोहण केल्याशिवाय स्वातंत्र्यदिन अपूर्ण आहे.म्हणून पंतप्रधान लाल किल्ल्यावर आपला भारतीय ध्वज ‘तिरंगा’ फडकवतात आणि लाल किल्ल्याभोवती असलेले सर्व लोक आपले राष्ट्रगीत गातात.त्यानंतर आपल्या संरक्षण दलाच्या परेड होतात आणि 21 तोफांची सलामी होते. स्वातंत्रदिनाचा हा सोहळा दिल्ली येथे साजरा करण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्येही साजरा केला जातो. प्रत्येक शाळा-कॉलेज देशभक्तीपर गीत गायन आणि देशभक्तीपर नृत्य  इत्यादी अनेक स्पर्धा आयोजित करतात.

 आजच्या पिढीला ज्यांनी की आपल्या हुतात्म्यांचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांनाही राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि प्रेमाची माहिती व्हावी आणि समजून घेता यावे यासाठी हे उत्सव साजरे केले पाहिजेत. पण दुर्दैवाने आपण आपल्या हुतात्म्यांनी केलेल्या कष्टाकडे दुर्लक्ष करत आहोत. केवळ १५ ऑगस्टला देशभक्ती हे आमचे कर्तव्य आहे असे वाटते. 

स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशीच करावे असेच आपल्यातील बऱ्याच जणांना वाटते. इतरवेळी मात्र आपले कर्तव्य बजावताना आणि समाजात वावरताना आपण ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरतो…

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Marathi Essay on Independence Day 500 Words)

भारत देशात १५ ऑगस्ट हा दिवस  स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. १९४७  मध्ये या दिवशी सुमारे दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारताला मुक्तता मिळाली. भारतातील लोकांसाठी हा अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा क्षण होता. त्यामुळे भारतात स्वातंत्र्यदिन धार्मिक उत्साहाने सुद्धा साजरा केला जातो.

१७ व्या शतकात भारत बऱ्याच लहान मोठया संस्थानांचा आणि राज्यांचा मिळून बनलेला एक समूह होता. बहुतेक राज्ये ही श्रीमंत आणि स्वयंपूर्ण होती. मग, युरोपियन व्यापारी सागरी मार्गाने भारतात आले. त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आणि जमीन आणि व्यापारावर त्यांची मजबूत पकड निर्माण केली. हळूहळू त्यांची व्यापारी धोरणे स्वकेंद्रित झाली आणि त्यांनी भारताला आपल्या अधिपत्याखाली घेण्यास सुरुवात केली.

१७०० च्या मध्यात, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे लक्ष व्यापारावरून महत्वाकांक्षी राज्यकर्ते होण्याचे बनले. त्यांनी लष्करी बळाचा वापर करून राज्ये बळजबरीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. भारतातील लहान राज्ये त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले परंतु कंपनीच्या अनुभवाशी आणि दारूगोळा यांच्या तुलनेत ते कमी पडायचे.

ब्रिटीशांच्या दडपशाहीविरुद्ध अखंड भारताचा पहिला संघर्ष १८५७ चा उठाव हा होता. मेरठमधील शिपाई-बंडाच्या रूपात त्याची सुरुवात झाली जी झपाट्याने देशाच्या इतर भागात सुद्धा पसरली. तथापि, भारतीय लोकांमध्ये असणाऱ्या नेतृत्वाच्या कमतरतेचा फायदा घेऊन ब्रिटिशांना वेळीच त्यावर अंकुश ठेवता आला.

या उठावाने मात्र भारतीयांच्या मनात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची बीजे पेरली गेली. 1857 च्या उठावाने भारताला एकत्र आणण्यात आणि देशाने एकजुटीने लढा दिल्यास स्वातंत्र्य मिळू शकते याची जाणीव तेथील जनतेला करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

बंडानंतर सुमारे तीन दशकांनंतर १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाप्रमाणे संपूर्ण भारतात नागरी संस्था उदयास येऊ लागल्या. भारताला राष्ट्रवादाच्या एकाच धाग्याने जोडण्याचे सर्वात महत्त्वाचे काम पक्षांनी आणि त्यांच्या राजकीय संरक्षकांनी केले.

मॉन्टेगु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, दांडी यात्रा हे सर्व भारतीय लोकांच्या दडपशाहीची आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेल्या लढ्याची साक्ष देतात. हा तो काळ होता जेव्हा भारताने इंग्रजांकडून स्वराज्याची किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली होती.

अखेरीस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि इतरांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांनी, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशभर दरवर्षी राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. यादिवशी ध्वजारोहण कार्यक्रम वगळता दिवसभर सर्व खाजगी व सरकारी कार्यालये, सरकारी आणि  खाजगी शाळा व महाविद्यालये बंद असतात.

आज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करताना जी एकता दाखवत असतो तीच एकता स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवली होती. आज विविध क्षेत्रातील, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील लोक देशभक्तीने ओतप्रोत भरून राष्ट्रवाद आणि देशभक्तीने हा राष्ट्रीय उत्सव साजरा करतात.

या दिवशी भारतीय राष्ट्रध्वज असणारा तिरंगा सर्वत्र विकला जातो आणि लोक अभिमानाने त्यांच्या डेस्क, वाहने आणि इमारतींवर त्याला लावतात. ध्वजारोहण हा सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बंधनकारक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये कार्यालयातील प्रमुख ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर आपले राष्ट्रगीत “जण-गण-मन” गायले जाते.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टांबद्दल शाळा आणि महाविद्यालये देखील अनेक कार्यक्रम आयोजित करतात. मुले काही लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत आणि त्यांचे प्रसिद्ध संवाद, ब्रीदवाक्य इत्यादी सादर करताना दिसतात.

नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभानंतर भारताचे पंतप्रधान राष्ट्राला संबोधून अभिभाषण करतात.

स्वातंत्र्य दिन हा स्वतंत्र भारताचा नव्याने झालेला जन्म आहे ज्यामध्ये भारतीय लोक स्वतःचे राज्यकर्ते निवडू शकतील आणि स्वतःचे शासन स्वतः ठरवू शकतील. अर्थात भारतात लोकशाही अस्तित्वात आली. स्वातंत्र्यदिन हा भारतासाठी एक अविषमरनिय दिवस आहे, खरं तर भारतातील लोकांचा सर्वात महत्वाचा सण आहे.

धन्यवाद…!

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये स्वातंत्र्यदिन मराठी निबंध (Independence Day Marathi Essay in 1000 Words)

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो. आपल्या भारत देशावर जवळपास २०० वर्षे ब्रिटनचे राज्य होते, अखेरीस ते स्वतंत्र होऊन स्वतंत्र राष्ट्र बनले. आणि तेव्हापासूनच हा दिवस भारतीय स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारताला स्वतंत्र बनविण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्या स्वातंत्र्य योद्धांचे समरण देखील स्वातंत्र्यदिनी केले जाते. हा भारतातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करतात, कारण आपणा सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.

शाळा, महाविद्यालये आणि देशभरातील कार्यालयांत तो अतिशय उत्साहात साजरा केला जातो आणि यामध्ये देशातील विद्यार्थी आणि नागरिक हिरीरीने सहभाग घेतात. 

१५ ऑगस्ट ही राष्ट्रीय सुट्टी असली तरीदेखील देशभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित आणि साजरा केला जातो. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवामध्ये ध्वज उभारणे, देशभक्तीपर भाषणे करणे, वादविवाद आणि स्पर्धा आयोजित करणे, नृत्यादी कला सादर करणे, कवितांचे सादरीकरण या आणि इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. विद्यार्थी या उपक्रमांबद्दल खूप उत्सुक असतात आणि त्यामध्ये ते मनापासून सहभागीही होतात. विविध केडीट कोरचे विद्यार्थी जसे की NCC आणि MCC हे सुद्धा स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशात परेड करताना दिसतात. हे सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांना एकजुटीचे महत्व समजावून देण्यात मदत करतात आणि आजच्या पिढीमध्ये उणीव असलेल्या देशभक्तीची भावना त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविध खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्येही हा दिवस उत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. कार्यालयांमध्ये, कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी थीम सोबत जुळण्यासाठी अनेकदा भगवे, पांढरे किंवा हिरवे कपडे घालण्यास सांगितले जाते. या रंगांमध्ये लोक राष्ट्रीय पोशाख परिधान केलेले दिसतात आणि संपूर्ण वातावरण उजळून निघते. देशभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते, कर्मचार्‍यांमधील संबंध मजबूत करण्यासाठी विशेष सहभोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते. काहीवेळा, अनेक लोक उस्फूर्तपणे भाषण देण्यासाठी देखील येतात. तसेच काही कार्यालये खास कर्मचाऱ्यांना एकमेकांशी  भावनिकरित्या जोडण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करतात.

विविध निवासी भागातील रहिवासी कल्याणकारी संस्था आणि सोसायट्या या हल्ली स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहाटेच लोक जवळच्या ध्वजारोहन कार्यक्रमास एकत्र जमतात आणि खर्‍या अर्थाने एकतेचा संदेश देत हा दिवस साजरा करतात. ते स्वातंत्र्य दिनाच्या थीमनुसार कपडे परिधान करतात आणि कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी सुद्धा होतात, ध्वज उभारणी नेहमी समारंभाच्या सुरुवातीला केली जाते. ध्वजारोहण झाल्यानंतर लोक आदराने उभे राहून राष्ट्रगीत म्हणत आपल्या तिरंग्यास मानवंदना देतात.

तसेच या संपूर्ण उत्सवादरम्यान देशभक्तीपर गाणी वाजवली जातात आणि लोक राष्ट्रवादाच्या भावनेत आकंठ बुडलेले दिसतात. या कार्यक्रमांदरम्यान नृत्य स्पर्धा आणि कविता स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात. लहान मुलांसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेवर आधारित ड्रेस स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात, जिथे मुलांना जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, भगतसिंग इत्यादी स्वातंत्र्यसैनिक बनण्याची संधी मिळते. या स्पर्धा अनेकदा दुपारच्या जेवणानंतर होतात. या कार्यक्रमांदरम्यान लोक एकत्र राहतात आणि एकत्र जेवणाचा आनंद सुद्धा घेतात, आपल्या शेजाऱ्यांना समजून घेत त्यांच्यासोबत  वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये स्वातंत्र्यदिनी पतंग उडवण्याची प्रथा आहे. आकाशामध्ये स्वच्छदपणे  विहार करणारे विविधरंगी पतंग हेच खरे  स्वातंत्र्यप्रतिक आहेत. पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी लोक त्यांच्या गच्चीवर जातात किंवा जवळच्या मैदानावर जातात. आणि त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित करतात. विविध ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि लोक मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात.

भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी खूप मोठी आहे, ज्यामध्ये विविध स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या धैर्याने या भारतभू साठी आणि सहिष्णुतेसाठी लढले.  युरोपियन व्यापारी भारतात स्थायिक होऊन भारतीय उपखंडात स्वत:च्या साम्राज्याची स्थापना करू पाहत होते. त्याच वेळी, १७५७ मध्ये प्लासीच्या आणि १७६४ मध्ये बक्सारच्या लढाईत  भारताने परदेशी सैन्याचा सामना केला, परंतु यात भारत आपली ताकद सिद्ध करू शकला नाही आणि या युद्धांमध्ये पराभूत झाला. त्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपल्या साम्राज्याचे जाळे पसरवण्यास सुरुवात केली आणि लजसजसे ते प्रदेश जिंकत गेले तसतसे १८ व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी भारताच्या अनेक भागांमध्ये आपली राजेशाही प्रस्थापित केली.

त्याच वेळी, कंपनी सरकारने अनेक कठोर कायदे करून भारतीय समाजाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारतातील लोकांवर अनेक जाचक धोरणे  लागू केली. कारण भारतीयांनी परकीय साम्राज्याला विरोध करून इंग्रजांविरोधी कारवायांना सुरुवात केली होती. त्याच वेळी, ब्रिटिशांच्या या दडपशाही धोरणांमुळेच १० मे १८५७ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून १८५७ च्या उठावाच्या रूपाने भारतीय लोकांचा असंतोष बाहेर पडला.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

त्यामुळेच १८५७ चे युद्ध हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध मानले जाते.  मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नाना साहेब, बेगम हजरत महल, राणी अवंतीबाई आणि बाबू कुंवर या प्रमुख बंडखोर नेत्यांनी या युद्धात आपली महत्त्वाची भूमिका बजावली. या युद्धात भारतीयांना यश प्राप्त करता आले नाही, परंतु या सर्व घटनांचा सर्व भारतीयांवर खोल परिणाम झाला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्य भारताची इच्छा जागृत झाली.

असे असले तरी १८५७ च्या युद्धानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांची शक्ती ओळखली आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला हळूहळू दूर करत ब्रिटनच्या राणीच्या सरकारचे राज्य निर्माण केले.

१८५७ च्या उठावानंतर, १८५८ मध्ये भारतीय राज्य प्रशासन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन ब्रिटिश राजसत्तेला सोपवले.

१८५७ च्या युद्धाच्या शेवटी, स्वातंत्र्य संग्रामाचे  लोन सर्व भारतभर पसरले आणि  ब्रिटिशांना असे वाटू लागले की ते भारतावर आता जास्त काळ राज्य करू शकत नाहीत. त्याच वेळी, भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक गोपाळ कृष्ण गोखले, मदन मोहन मालवीय आणि दादाभाई नौरोजी यांच्यासह अनेक प्रमुख भारतीय क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली १८८५ ते १९०५ पर्यंतच्या गृहयुद्धानंतर भारतीयांनी बंड केले. या युद्धाला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती या वैचारिक आणि राजकीय होत्या त्यामुळे त्यांनी शांततेच्या मार्गाने हे युद्ध लढले.

१९ व्या शतकापर्यंत मात्र ब्रिटिशांनी भारतीय उपखंडावर केलेले अत्याचार तीव्र झाले. कारण १९ व्या शतकाच्या अखेरीस लाला लजपत राय, बिपीन चंद्र पाल यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक पावले उचलली ज्यांना इंग्रजांनी दडपून टाकले त्यामुळे भारतीयांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. भारतात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वजण एक झाले. त्याच वेळी या स्वातंत्र्यसैनिकांच्या एकजुटीने ब्रिटिशांना भारतीयांची भीती वाटू लागली

१९ व्या शतकात, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो आंदोलन, महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळी यासह अनेक चळवळींनी ब्रिटिश साम्राज्यांचा पाया हादरला आणि  स्वातंत्र्याचा मार्ग सोपा होत गेला. म्हणून इंग्रजांना भारत सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. दरम्यान, १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजसत्तेकडे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि भारतीय जनतेने एकत्र येऊन स्वातंत्र्याविरुद्धच्या ब्रिटिश बंडाला बळ दिले. याचा परिणाम म्हणून, ब्रिटीश संसदेने लॉर्ड माउंट बॅटन यांना ३० जून १९४८ पर्यंत भारतात राज्य करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे भारतातील ब्रिटीश साम्राज्य अजूनच कमकुवत झाले. परंतु तेव्हाच ब्रिटीशांना भारतातील लोकांच्या भावना अजूनच भडकलेल्या दिसल्या. लॉर्ड माउंटबॅटन यांना देण्यात आलेली अंतिम मुदतीची वाट पाहण्यापूर्वीच इंग्रजांनी ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या इंग्रजांनी इतकी वर्षे भारतीयांचा छळ केला, त्या इंग्रजांनी भारतीयांचे धैर्य आणि एकजुटीच्या बळावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना नमुन भारताला स्वातंत्र्य दिले.  त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

धन्यवाद…!

Previous

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

Next

Leave a Comment