पाण्याचे महत्व

| |

पाण्याचे महत्व मराठी निबंध (Essay On Importance of water in Marathi)

आज सकाळी उठायला जरा उशीरच झाला.

ऑफिसला वेळेत जाण्यासाठी सर्वकाही पटापट आटोपून बस पकडणे गरजेचे होते.

त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर कामे आटोपण्याच्या प्रयत्नात ब्रश करत बाथरूममध्ये घुसलो.

नळ चालू करून पाहतो तर काय नळाला पाणीच नाही!

आता पाण्याशिवाय तोंड धुणार कसं?, अंघोळ कशी करणार?, प्यायचं काय? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालू लागले.

चेहरा अगदी रडवेला झाला.

काय करावे काहीच सुचेना.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तोंड धुताना नळ सताड सुरु ठेवणाऱ्या मला आज पाण्याचे महत्व चांगलेच कळून चुकले.

खरंच पाणी  हा आपल्या आयुष्यातला फार महत्वाचा घटक आहे याची जाणीव मला त्यावेळी झाली.

फक्त आपल्याच नाही तर पृथीवरील प्रत्येक सजीवाच्या जीवनात पाण्याचे मोल अनन्यसाधारण आहे.

पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. (Essay on Importance of Water in Marathi) 

असं म्हणतात माणसाचे ६० टक्के शरीर हे पाण्याचे बनलेले असते.

रक्ताभिसरण, पचन, मलविसर्जन, शरीराचे तापमान नियंत्रित करणे अशा अनेक कामांसाठी मानवी शरीराला पाण्याची गरज असते.

शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाणी गेले नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.

म्हणूनच डॉक्टर आपल्याला दिवसातून कमीतकमी २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.

पाण्यामध्ये असलेले मिनरल्स शरीराला आवश्यक असतात.

याशिवाय दैनंदिन वापरासाठीही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाईसाठी अशा कित्येक दैनंदिन कामकाजास आपल्याला पाणी लागते.

फक्त मनुष्यालाच नाही तर प्राणी, वनस्पती यांनाही पाण्याची नितांत गरज असते.

वनस्पती पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीने अन्न  तयार करतात.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

या वनस्पती पाणी जमिनीतून मुळांमार्फत शोषून घेतात.

या पाण्याचे पानांपर्यंत वहन केले जाते.

यानंतर सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाने अन्न तयार करतात.

जर का पाणी नसेल तर फक्त सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती अन्न तयार करु शकणार नाहीत.

पाण्याअभावी त्या मरून जातील.

परिणामी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असलेल्या आपल्याला भुकेने तडफडावे लागेल.

पर्यावरणातील अतिशय महत्वाची अशी जलचर प्रजाती तर सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे.

मासे, खेकडे, कासव यांसारख्या जलचरांचे पाणी हेच घर आहे.

हे जलचर निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचे घटक आहेत.

जर पाणीच नसेल तर या जलचरांचे अस्तित्व नामशेष होईल.

परिणामी पर्यावरणावर आणि निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होईल. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

आजच्या घडीला पाण्याचे महत्व पटवून देण्याची वेळ ही मनुष्यामुळेच आली आहे.

पाण्याच्या बेजबाबदार आणि अतिरेकी वापरामुळे वापरायोग्य पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

पृथ्वीवर एकूण ७१ टक्के पाणी आहे.

त्यापैकी फक्त ३ टक्के पाणी हे पिण्यायोग्य आणि वापरायोग्य आहे.

पृथ्वीवरील भरमसाठ लोकसंख्या पाहता वापरायोग्य पाण्याचे प्रमाण फारच कमी आहे.

असे असताना सुद्धा आपण पाण्याचा काळजीपूर्वक वापर करताना दिसून येत नाही.

गरज नसताना नळ सुरु ठेवून पाणी वाया जावू देणे ही तर आपल्यासाठी नेहमीचीच गोष्ट आहे.

दुष्काळी भागात लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.

एक घोट पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना रखरखत्या उन्हातून मैलोनमैल चालावे लागते.

पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन न केल्यामुळे अशी परिस्थिती येते.

पाण्याचा अपव्यय करून आपण स्वतःच जीवन बरबाद तर करत असतोच परंतु कारखान्यांतील विषारी द्रव्ये असलेले सांडपाणी नदी, नाले, समुद्र यांमध्ये कशाचीही पर्वा न करता बिनधास्त सोडून देतो.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचरांचे जीवन आपण धोक्यात घालत असतो.

असं म्हणतात अन्नाशिवाय माणूस तीन आठवडे जिवंत राहू शकतो परंतु पाण्याशिवाय तीन दिवसही नाही.

म्हणूनच कदाचित पाण्याला जीवन असे म्हणतात.

परंतु या अनमोल जीवनाचे महत्व आपल्याला आहे कुठे? पाण्याचा अपव्यय आपण सर्रास करतो.

आपल्या आणि पर्यावरणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळून काटेकोर वापर करणे गरजेचे आहे. 

पाण्याचे संवर्धन कसे करावे? (How to Save Water in Marathi)

पाण्याचा होणार अपव्यय आणि दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता पाण्याचा काटेकोर आणि काळजीपूर्वक वापर कारणे गरजेचे आहे.

आजच पाण्याचे संवर्धन केले नाही तर नजीकच्या भविष्यकाळात याचे खूपच वाईट परिणाम दिसू शकतात.  

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

घरगुती स्तरावर पाण्याची बचत कशी करावी?

  • काही जण अंघोळीसाठी नाळ अथवा शॉवरचा वापर करतात. शॉवरखाली अंघोळ करताना काही जणांना वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाते. त्याऐवजी बादलीभर पाणी घेऊन अंघोळ करावी कारण साधारणतः तेवढ्याच पाण्याची अंघोळीकरता गरज असते. 
  • काही लोकांना ब्रश करताना किंवा दाढी करताना बेसिनचा नळ सुरु ठेवण्याची सवय असते. त्यामुळे कित्येक लिटर पाणी वाया जाते. या पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य नसते. त्यामुळे शक्यतो गरज असेल तेव्हाच नळ चालू ठेवावा आणि काम झाल्यावर बंद करावा. 
  • घरामधील एखादा नळ किंवा पाईप लिकेज असेल तर वेळीच दुरुस्त करून घ्यावा. कारण लिकेज पाईप मधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. 
  • टॉयलेटमध्ये फ्लशसाठी वापरले जाणारे पाणी हे शक्यतो पुनर्वापर केलेले असेल याची काळजी घ्यावी. 
  • स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा जेवढा शक्य होईल तेवढा पुनर्वापर करण्यावर भर दिला पाहिजे. 
  • बागेतील झाडांना पाणी देताना शक्यतो नळाऐवजी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो. 
  • रोज गाडी न धुता आठवड्यातून १ ते २ वेळा गाडी धुवावी. शक्यतो बादलीने पाणी घेऊन गाडी धुवावी. 

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

पाणी बचतीचे काही सामाजिक उपाय 

रेन वॉटर हार्वेस्टिंग 

रेन वॉटर हार्वेस्टिंग हा पाण्याची बचत करण्याचा सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता योग्य प्रकारे त्याची साठवणूक करणे किंवा जमिनीत मुरू देणे. या पद्धतीमध्ये जास्त करून घर किंवा बिल्डिंगच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून ते जमिनीखाली हौद किंवा टाकीमध्ये साठवले जाते. त्यानंतर पाहिजे तेवढ्या पाण्याचा उपयोग करून बाकीचे पाणी जमिनीत मुरवले जाते. 

कृत्रिम तलाव अथवा शेततळी 

या पद्धतीमध्ये शेतामध्ये एक कृत्रिम तलाव बनवला जाते. पावसाचे पाणी त्या तलावामध्ये साठवले जाते. यामुळे पाऊस कमी पडला तरी या तलावातील पाणी पिकांसाठी वापरता येते. 

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

डोंगरउतारावर चार खणणे 

पावसाचे पाणी हे डोंगरउतारावरून खूप वेगाने खाली येते. त्यामुळे मातीची खूप मोठ्या प्रमाणावर झीज होते. याशिवाय पाणी जमिनीत न मूरता सरळ समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे डोंगरउतारावर अरुंद आणि आडवे चार खणले जातात. यामुळे मातीची झीज होत नाही आणि वाहून जाणारे पाणी चरांमधून साठवले जाते. तेथेच ते जमिनीत मुरते.

Previous

Road Safety World Series 2021। भारताचा फायनल मध्ये प्रवेश, सचिन – युवी यांची आतिषबाजी

Assembly Election 2021 | रामायणातील श्रीराम आता भाजप मध्ये, अभिनेते अरुण गोविल यांचा भाजप प्रवेश

Next

Leave a Comment