भारताच्या कायदेव्यवस्थेचा पाया असलेल्या आणि देशाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा संच म्हणजे संविधान होय. (Bhartiy Savidhan in Marathi) भारत हे एक सार्वभौम आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे. अशा देशाचे संविधान (Bhartache Savidhan in Marathi ) तयार करणे हि तेवढीशी सोपी गोष्ट नव्हती. हे कठीण आव्हान पूर्ण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला. याच संविधानाबद्दल (Constitution of India in Marathi) या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
भारताचे संविधान (Bhartiy Savidhan in Marathi)
प्रास्ताविका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
आणखी वाचा : भारताचे राष्ट्रगीत
भारतीय संविधान (Constitution of India in Marathi)
भारतीय संविधानाला भारताची राज्यघटना असेही म्हणतात. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. आपल्या देशाची संपूर्ण कायदेव्यवस्था या संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच कार्य करते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. ते मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याना एका चौकटी मध्ये एकसंध बांधण्याचे काम करते. या कार्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आहे म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती तयार करण्यात आली होती. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम या समितीकडे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेपुढे मांडल्यानंतर त्यातील अनेक कलमांवर चर्चा झाली आणि काही दुरुस्त्याही करण्यात आल्या.
आणखी वाचा : वंदे मातरम्
भारताच्या राज्यघटनेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी
१. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
२. या समितीने तयार केलेला मसुदा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.
३. म्हणूनच २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
४. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान पूर्ण रूपाने लागू झाले. म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
५. संविधानाच्या निर्मितीसाठी एकूण २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा दीर्घ कालावधी लागला.
६. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ते हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये हाताने लिहिले गेले.
७. बिहारी नारायण रायजादा याना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे हस्तलेखनाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
८. संविधान लिहिण्यासाठी एकूण ६ महिन्यांचा कालावधी लागला तसेच २५४ दौत आणि ३०३ पेन वापरले गेले.
९. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान असे दिग्गज नेते मसुदा समितीचे सदस्य होते.
१०. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांच्या आधारे राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आहे.
आणखी वाचा : देशभक्तीपर गीते
११. मूळ संविधानामध्ये १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. परंतु यामध्ये आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
१२. सध्या (जानेवारी २०२०) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.
१३. भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला हि तिनिकेतनमधील कलाकारांनी आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
१४. याशिवाय आपण जे प्रास्ताविक पाहतो त्याचे व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.
१५. भारताचे संविधान हे जरी १९५० साली अंमलात आले असले तरी ते १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) आधारित आहे.
आणखी वाचा : पसायदान
वाचकहो भारताच्या संविधानाविषयीची (Bhartiy Rajyaghatana in Marathi) हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा.