आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्या देशाबद्दल आपल्या सर्वाना अभिमान आहेच. भारत एक महान देश आहे. या महान देशाचे राष्ट्रगीत आहे जन गण मन. (Jana Gana Mana in Marathi) या लेखात आपण भारताचे राष्ट्रगीत आणि त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत
जन गण मन हे भारताचे म्हणजेच आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे. कवी रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या नावाने गीताची रचना केली होती. नंतर या गीताचे संस्कृत मध्ये भाषांतर केले गेले. खरं तर या गीताची एकूण पाच कडवी आहेत परंतु त्यातील संस्कृत मध्ये भाषांतर केलेल्या पहिल्याच कडव्याचा भारताचे राष्ट्रगीत (National Anthem in Marathi) म्हणून स्वीकार करण्यात आला. २४ जानेवारी १९५० साली हे पहिले कडवे भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. (National Anthem of India In Marathi) अधिकृतरीत्या ४८ ते ५२ सेकंदामध्ये राष्ट्रगीत गायले गेले पाहिजे असा नियम आहे.
२७ डिसेंबर १९११ रोजी हे गीत (Bhartache Rashtrageet) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम सार्वजनिकरीत्या गायले गेले. या गीतात भारताचे गौरवगान गेले गेले आहे. आपला देश किती सुजलाम् सुफलाम् आहे, किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून रवींद्रनाथ टागोर यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्वराकडे भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.
भारताचे राष्ट्रगीत (Jana Gana Mana in Marathi)
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे||
आणखी वाचा: वंदे मातरम् | Vande Mataram in Marathi
National Anthem of India Lyrics
Jana-gana-mana-adhinayaka, jaya he
Bharata-bhagya-vidhata.
Punjab-Sindh-Gujarat-Maratha
Dravida-Utkala-Banga
Vindhya-Himachala-Yamuna-Ganga
Uchchala-Jaladhi-taranga.
Tava shubha name jage,
Tava shubha asisa mage,
Gahe tava jaya gatha,
Jana-gana-mangala-dayaka jaya he
Bharata-bhagya-vidhata.
Jaya he, jaya he, jaya he, Jaya jaya jaya, jaya he!
राष्ट्रगीत कधी म्हटले जाते?
- शासकीय कार्यकम प्रसंगी
- स्वातंत्र्यदिन
- प्रजासत्ताक दिन
- मा. राष्ट्रपती यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
- राज्यपाल, उप राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
- नौदलात राष्ट्रध्वज उभारण्यात येत असताना
- लष्करी रेजिमेंटला राष्ट्रध्वज प्रदान करताना
- सध्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायले जाते.