मित्रांनो या लेखामध्ये आपण आय पी एल मधील आतापर्यंत झालेल्या सर्व हंगामातील विजेत्यांची यादी (IPL All Seasons Winners List in Marathi) पाहणार आहोत. आय पी एल म्हटलं कि डोळ्यांसमोर येते मनोरंजनाची पर्वणी, अटीतटीच्या लढती, चाहत्यांमधली चुरस, आणि अचंबित करणारं क्रिकेट. आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League). २००८ साली सुरु झालेली हि क्रिकेट ची स्पर्धा अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. आताच्या घडीला आय पी एल माहित नाही असा जगाच्या पाठीवर क्वचितच कोणीतरी असेल. आय पी एल हि क्रिकेट मधील सर्वात कठीण लीग मानली जाते. एका पेक्षा एक सरस संघ चषकासाठी स्वतःला झोकून देतात.
२००७ साली सर्वप्रथम २० षटकांच्या सामन्याच्या विश्वचषक झाला आणि हा विश्वचषक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकला. यानंतर पुढच्याच वर्षी २००८ साली भारताने २० षटकांच्या या स्पर्धेचे म्हणजेच आय पी एल चे (IPL)आयोजन करण्यास सुरुवात केली. आठ संघांच्या प्रवेशाने सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये आता १० संघ चषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करतात. २०२३ साली या स्पर्धेचा १६ वा हंगाम यशस्वीरीत्या पार पडला. या सोळा हंगामांमध्ये आपल्याला अनेक अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. अनेक नवीन खेळाडू उदयास आले. नवोदित खेळाडूंना स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. अनुभवी खेळाडूं कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळेच कदाचित हि स्पर्धा एव्हडी कठीण आणि लोकप्रिय आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ (IPL Winners in Marathi) राजस्थान रॉयल्स होता. परंतु सर्वात जास्त वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी केली आहे. या दोन्ही संघानी तब्ब्ल ५-५ वेळा या चषकावर नाव कोरले आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने २ वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
IPL विजेता संघांची यादी (IPL All Seasons Winners List in Marathi)
आय पी एल स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आता पर्यंत तब्बल १६ हंगाम झाले आहेत. या सर्व हंगामातील विजेत्यांची नावे आपल्याला खालील तक्त्यामध्ये पाहायला मिळतील.
हंगाम | विजेता संघ | IPL Winning Franchise Name |
२००८ | राजस्थान रॉयल्स | Rajasthan Royals |
२००९ | डेक्कन चार्जेर्स | Deccan Chargers |
२०१० | चेन्नई सुपर किंग्स | Chennai Super Kings |
२०११ | चेन्नई सुपर किंग्स | Chennai Super Kings |
२०१२ | कोलकाता नाईट रायडर्स | Kolkata Knight Riders |
२०१३ | मुंबई इंडियन्स | Mumbai Indians |
२०१४ | कोलकाता नाईट रायडर्स | Kolkata Knight Riders |
२०१५ | मुंबई इंडियन्स | Mumbai Indians |
२०१६ | सन रायझर्स हैदराबाद | Sunrisers Hyderabad |
२०१७ | मुंबई इंडियन्स | Mumbai Indians |
२०१८ | चेन्नई सुपर किंग्स | Chennai Super Kings |
२०१९ | मुंबई इंडियन्स | Mumbai Indians |
२०२० | मुंबई इंडियन्स | Mumbai Indians |
२०२१ | चेन्नई सुपर किंग्स | Chennai Super Kings |
२०२२ | गुजरात टायटन्स | Gujrat Taitans |
२०२३ | चेन्नई सुपर किंग्स | Chennai Super Kings |
आय पी एल हंगामातील विजेते, उपविजेते, ठिकाण आणि सामनावीर | IPL All Seasons Winners, Runner-ups, Venue & MOM
खालील तक्त्यामध्ये आय पी एल हंगामातील विजेते, (IPL Winners in Marathi) उपविजेते, अंतिम सामन्याचे ठिकाण आणि अंतिम सामन्याचे सामनावीर यांचं तपशीलवार विश्लेषण दिलेले आहे.
हंगाम | विजेता संघ | उपविजेता संघ | ठिकाण | सामनावीर |
२००८ | राजस्थान रॉयल्स | चेन्नई सुपर किंग्स | मुंबई | युसूफ पठाण |
२००९ | डेक्कन चार्जेर्स | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | जोहान्सबर्ग | अनिल कुंबळे |
२०१० | चेन्नई सुपर किंग्स | मुंबई इंडियन्स | मुंबई | सुरेश रैना |
२०११ | चेन्नई सुपर किंग्स | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | चेन्नई | मुरली विजय |
२०१२ | कोलकाता नाईट रायडर्स | चेन्नई सुपर किंग्स | चेन्नई | मनविंदर बिस्ला |
२०१३ | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्स | कोलकाता | किरॉन पोलार्ड |
२०१४ | कोलकाता नाईट रायडर्स | किंग्स XI पंजाब | बँगलोर | मनीष पांडे |
२०१५ | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्स | कोलकाता | रोहित शर्मा |
२०१६ | सन रायझर्स हैदराबाद | रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | बँगलोर | बेन कटिंग |
२०१७ | मुंबई इंडियन्स | रायझिंग पुणे सुपरजायंट्स | हैदराबाद | कृणाल पांड्या |
२०१८ | चेन्नई सुपर किंग्स | सन रायझर्स हैदराबाद | मुंबई | शेन वॉटसन |
२०१९ | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्स | हैदराबाद | जसप्रीत बुमराह |
२०२० | मुंबई इंडियन्स | दिल्ली कॅपिटल्स | दुबई | ट्रेंट बोल्ट |
२०२१ | चेन्नई सुपर किंग्स | कोलकाता नाईट रायडर्स | दुबई | फाफ डू प्लेसिस |
२०२२ | गुजरात टायटन्स | राजस्थान रॉयल्स | अहमदाबाद | जोस बटलर |
२०२३ | चेन्नई सुपर किंग्स | गुजरात टायटन्स | अहमदाबाद | डेवोन कॉनवें |
काही रोचक तथ्ये
प्र. १. कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल विजेतेपदे जिंकली?
सर्वात जास्त वेळा हा चषक जिंकण्याची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघानी केली आहे. या दोन्ही संघानी तब्ब्ल ५-५ वेळा विजेतेपद जिंकले आहे.
प्र. २. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे?
विराट कोहली हा आय पी एल मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आय पी एल मध्ये आता पर्यंत ७२६३ धाव बनवल्या आहेत. यांमध्ये ७ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे.
प्र. ३. IPL इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडू कोणता आहे ?
ख्रिस गेल हा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. त्याने एकूण ३५७ सिक्सेस मारले आहेत.
प्र. ४. आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोणता आहे?
युझवेंद्र चहल हा आय पी एल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.
प्र. ५. IPL मधील सर्वात यशस्वी कप्तान कोण आहे?
महेंद्रसिंग धोनी हा IPL मधील सर्वात यशस्वी कप्तान आहे. त्याने ५ वेळा विजेते तर ५ वेळा उपविजेते पद पटकावले आहे. सर्वाधिक वेळा अंतिम सामना खेळण्याचा मानही त्याच्याच नावे आहे.
मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कंमेंट द्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.