व्हॅलेंटाईन वीक मध्ये दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ

| |

रोज डे निमित्त दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ (Meaning of Rose Colors in Marathi) जाणून घ्यायचा आहे?

तर मग वाचा…

रोज डे…गुलाबाच्या फुलाचा आधार घेऊन प्रेम व्यक्त करण्याचा दिवस…

किती भारी असतं ना सांकेतिक भाषेत आपलं प्रेम व्यक्त करणं!

लाजत लाजत गुपचूप आपल्या आवडत्या व्यक्तीला हळूच गुलाबाचं फुल देऊन आपल्या भावना व्यक्त करणं.

पण जर आपल्याला ती सांकेतिक भाषा माहीतच नसेल तर… कोणत्या रंगाचा काय अर्थ होतो हे माहीतच नसेल तर … मग बोंबला!

आपल्याला सांगायचं असेल एक अन समोरची व्यक्ती समजायची भलतंच.

एका गोड कहाणीची सुरुवात होण्याअगोदरच तिला ‘दि एंड’ ची पाटी लागायची.

बिच्चारे तुम्ही…

आपलं नेमकं कुठे काय चुकलं हे शोधण्यातच अर्ध आयुष्य जायचं.

यासाठी कोणत्या रंगाचा गुलाब काय संदेश देतो हे जाणुन घेणं फार गरजेचं आहे.

चला तर मग जाणुन घेऊया…

व्हॅलेंटाईन वीक मध्ये दिल्या जाणाऱ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ

लाल गुलाब

लाल गुलाब Red RosePin
लाल गुलाब (Red Rose)

याच्या बद्दल तर कोणाला काही सांगायची गरज नसेलच.

अगदी लहान मुलाला जरी विचारलं तरीही तो आत्मविश्वासाने सांगेल, लाल गुलाब म्हणजे प्रेयसी आणि प्रियकर यांच्यामधलं प्रेम…

एखाद्या व्यक्तीवर जीवापाड केलं जाणारं प्रेम…

ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य जगू इच्छितो त्या व्यक्तीवर केलं जाणारं प्रेम…

तुमच्याही आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल जी तुमच्या ह्रदयात घर करून असेल, रात्री स्वप्नात येऊन झोपेतच तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्यस्मित आणत असेल, जिच्यासोबत तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण जगण्याची स्वप्नं बघत असाल तर तिला बिनधास्त लाल गुलाब द्या आणि तुमच्या गोड कहाणीची सुरुवात करा.

आणखी वाचा: हॅपी रोज डे इमेजेस मराठी

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब Pink RosePin
गुलाबी गुलाब (Pink Rose)

काही वेळा असं होतं एखाद्या व्यक्तीसोबत आपण काही काळ घालवतो किंवा फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईट वरून एकमेकांच्या परिचयाचे होतो.

काही दिवसांच्या संभाषणानंतर हळू हळू ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. परंतु तिचा स्वभाव तिच्या आवडीनिवडी अशा तिच्याबद्दलच्या सर्वच गोष्टी आपल्याला माहित नसतात.

अशावेळी आपण दिलेला एखादा चुकीच्या रंगाचा गुलाब आपलं नातं खराब करू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेणं महत्त्वाचं असतं.

अशा परिस्थितीत गुलाबी गुलाब तुमची मदत करू शकतो.

‘मला तुला आणखी जाणुन घ्यायचं आहे.’ असा सरळ सोपा संदेश गुलाबी गुलाब देतो.

चला तर मग तुमच्या आयुष्यातील अशा व्यक्तीला गुलाबी गुलाब द्या अन सांगा तिला मला तुला अजून थोडं जाणून घ्यायचं आहे.

पिवळा गुलाब

पिवळा गुलाब Yellow RosePin
पिवळा गुलाब (Yellow Rose)

प्रेमी प्रेमिकांच्या लफड्यात आपला मित्रपरिवार राहिलाच की!

त्यांना विसरून कसं चालेल. तेच तर असतात जे आपली सेटिंग लावायला आपली मदत करतात, फेसबुक इंस्टाग्रामवरती आपल्या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्स चा पाऊस पाडून आपल्याला पॉप्युलर करतात.

त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं नाही तर हा आपल्या मैत्रीचा एक प्रकारे अपमान होऊ शकतो.

त्यामुळे आपल्या यार दोस्ताना पिवळा गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करा कारण पिवळा गुलाब मैत्रीचा संदेश देतो.

पांढरा गुलाब

पांढरा गुलाब White RosePin
पांढरा गुलाब (White Rose)

तसं पहायला गेलं तर पांढरा रंग हे शांततेचंच प्रतीक आहे.

मग त्याला गुलाब तरी अपवाद कसा असणार?

जर तुमची कोणी प्रिय व्यक्ती खूप दिवसांपासुन नाराज असेल, भांडण झाल्यामुळे तुमच्याशी बोलत नसेल तर त्याला मनवण्यासाठी पांढरा गुलाब तुमची मदत करू शकतो.

तर मग घ्या पुढाकार आणि आपल्या नाराज असलेल्या प्रिय व्यक्तीला मनवून आयुष्यरुपी पुस्तकाच्या नवीन पानाला सुरुवात करा.

जांभळा गुलाब

जांभळा गुलाब Purple RosePin
जांभळा गुलाब (Purple Rose)

कधी कधी आपल्याला फिल्मी दुनियेप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर पहिल्या नजरेतच प्रेम होत.

त्या व्यक्तीला पाहताक्षणीच आपलं हृदय ओरडून ओरडून सांगू लागतं ‘यहि है वो!’.

नजरेला नजर भिडताच हृदय धडधडू लागतं.

असं प्रेम क्वचीतच होतं. त्यामुळे जांभळा गुलाबही तुम्हाला क्वचीतच मिळेल.

थोडेसे कष्ट तर करावे लागणारच ना. शेवटी पहिल्या नजरेचं प्रेम खासच असतं.

काळा गुलाब

काळा गुलाब, Black RosesPin
काळा गुलाब (Black Roses)

हा गुलाब सापडणं कठीण आहे परंतु त्याचा अर्थ मात्र खूप खास आहे.

काळा गुलाब एखाद्याबरोबर असणारी आपली दुश्मनी व्यक्त करण्यासाठी दिला जातो.

सहसा असं कोण करत नाही. मनातल्या मनात चार शिव्या घालतील पण दुश्मनी उघड करणार नाही.

तुमच्यामध्ये असेल हिंमत तर तुमच्या दुष्मनाला काळा गुलाब देऊन बघा…’क्या पता दुश्मन भी दोस्त बन जाए!’

तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रत्येक रंगाचा अर्थ नीट समजून घ्या आणि आपल्या प्रिय व्यक्तीला योग्य त्या रंगाचा गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करा.

आणखी वाचा: हॅपी प्रपोज डे इमेजेस मराठी

त्याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या रंगांचा अर्थ समजावून सांगा जेणेकरून त्यांचीही कुठे चूक होणार नाही.

Previous

हॅपी प्रपोज डे इमेजेस मराठी

रिहाना, मिया, ग्रेटानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचं शेतकरी आंदोलनावर ट्विट; तोडगा काढण्याचा दिला सल्ला

Next

Leave a Comment