राजमाता जिजाऊ मराठी निबंध | Rajmata Jijau Essay in Marathi

| |

राजमाता जिजाऊंना आपण सगळेच ओळखतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पहिले आणि आणि ते सत्यात उतरवण्यासाठी शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन केले अशा राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती (Jijamata Information in Marathi) आपण या लेखात पाहणार आहोत. येथे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा वेगवेगळ्या शब्दांत राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Rajmata Jijau Essay in Marathi) दिले आहेत. 

दहा ओळींमध्ये राजमाता जिजाऊ मराठी निबंध (10 Lines Rajmata Jijau Essay in Marathi)

१. जिजाबाई शहाजी भोसले या भारताच्या महान देशभक्त होत्या.

२. जिजाबाई या थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी यांच्या आई होत्या.

३. जिजाबाईंना राजमाता किंवा मासाहेब म्हणूनही ओळखले जाते.

४. जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेडराजा येथे झाला.

५. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई जाधव होते.

६. जिजाबाईं यांचा विवाह लहानच वयामध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

७. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना वाढवले ​​आणि त्यांचे एक चांगले व्यक्तिमत्व किंवा चारित्र्य विकसित केले.

८. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजीं महाराजांना अखंड भारताचे महान योद्धे बनवले.

९. जिजाबाईंचे संपूर्ण जीवन धैर्य आणि त्यागाचे होते.

१०. १७ जून १६७४ या काळ्या दिवशी राजमाता जिजाबाई यांचे दुःखद निधन झाले.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Rajmata Jijau Marathi Nibandh in 300 Words)

जिजाबाई ज्यांना आपण सर्वजण राजमाता जिजाऊ म्हणूनही ओळखतो यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेडराजा,बुलढाणा येथे झाला. त्यांचे वडील श्री.लखुजीराव जाधव हे सिंदखेड या गावची जहागीर असलेले राजे होते. अगदीच लहान वयात लग्न झाल्यामुळे जिजाबाई यांना आपल्या वडिलांचा तसेच माहेरकडील लोकांचा सहवास फारच कमी कालावधीसाठी लाभला.

जिजाबाई यांचे पती श्री. शहाजीराजे भोसले हे निजाम शहाच्या दरबारात एक मातब्बर सरदार म्हणून नामवंत होते. त्यांच्या लग्नानंतर जिजाऊ जसजसे मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांना राजकारणातील समज येऊ लागली. विजापूरचे आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा कसा आपल्या जनतेची पिळवणूक करत आहे हे त्यांनी पाहिले. जेव्हा शहाजीराजे विजापूरच्या दरबारात दाखल झाले त्यावेळी त्यांनी विजापूरच्या आदिलशहाला अनेक लढाया जिंकून दिल्या, यामुळे खुश होऊन आदिलशहाने शहाजीरांना अनेक जहागिरी भेट म्हणून दिल्या होत्या. यामध्ये शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याचा देखील समावेश होता. शहाजीराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना जिजाबाई याच किल्ल्यावर आपल्या अपत्यांसह राहत असत. शहाजीराजे आणि जिजाबाई या दांपत्यांना एकूण सहा मुली (मात्र या मुली जास्त काळ जगू शकल्या नाहीत) व दोन मुले शिवाजी महाराज व संभाजी महाराज होती.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

जिजाबाईनी मुघलांचा जनतेवर होणारा अनन्वित छळ पाहिला होता. त्यांना स्वराज्य व्हावे असे मनोमन वाटत होते. त्यामुळे त्यांनी बालवयापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारत यातील साहस-कथा सांगितल्या. यामधून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हे देखील अन्यायाविरुद्ध पेटून उठले आणि त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रतिज्ञा घेऊन स्वराज्य स्थापनेचे महत्-कार्य केले. स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक जिवाभावाच्या माणसांची साथ लाभली. याच माणसांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंना नमविले. या सर्वांमध्ये शिवरायांबरोबरच मासाहेब जिजाऊ यांचा देखील मोलाचा वाटा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुषोत्तम योद्धा केवळ आणि केवळ मासाहेब जिजाऊ यांच्या संस्कारातूनच निर्माण झाला. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिलेले संस्कार इतके प्रभावी होते की शिवराय स्वतःसाठी जगणे विसरून रयतेच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य झिजवू लागले. मासाहेब जिजाऊंच्या सानिध्यात फाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फार मोठे कार्य केले म्हणूनच आज अखंड हिंदुस्तान महाराजांचे नाव मोठ्या आदराने घेतो.

जिजामाता या इतिहासातील पहिल्याच महिला आहेत ज्यांनी देशकार्यासाठी पहिले पाऊल उचलले. जनतेसाठी अविरत झटणाऱ्या या माऊलीचा १७ जून १६७४ रोजी देहांत झाला.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Rajmata Jijau Essay in Marathi in 500 Words)

इतिहासात गौरवाने ज्यांचे ज्यांचे नाव महान योद्धा म्हणून घेतले जाते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथिल देवगिरीच्या यादव घराण्यात झाला. त्यांची आई म्हाळसा बाई आणि वडील श्री. लखोजीराव जाधव हे एक मातब्बर हिंदू सरदार होते आणि निजाम शाहच्या सैन्यात अहमदनगरमध्ये सेवेत तैनात होते.

लहान वयातच निजामशहा याच्या दरबारातील मराठा सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजामाता यांचा विवाह झाला. त्यांच्या लग्नानंतर लगेचच, निजामशहाने शहाजीराजे यांना पुण्याची जहागीर आणि सुपा सुपूर्द केल्यावर शहाजीराजे आणि जिजाबाई हे दाम्पत्य पुण्यात आले.

त्या काळात पुणे ही जंगले आणि वन्य प्राणी यांनी भरलेली लांबच लांब ओसाड जमीन होती. असे असून देखील, जिजामातांनी आपल्या प्रजेला पुण्यातच स्थायिक होण्यासाठी आणि शेती करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी पुण्यात कसबा पेठ गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांना त्यांच्या लग्नाआधीच्या सर्व सुखसोयीने संपन्न असलेल्या आयुष्याची आठवण येत असली तरी तसेच जीवन मिळावे ही मुळीच इच्छा नव्हती, त्याऐवजी पुण्यालाच त्यांनी आपले नवीन घर म्हणून स्वीकारले.

राजमाता जिजाऊ यांनी आपल्या आयुष्यात आठ मुलांना जन्म दिला, त्यापैकी सर्वच्या सर्व सहा मुली या बालपणातच मरण पावल्या आणि फक्त दोन मुलगे जिवंत राहिले, ज्यांचे नाव होते संभाजी आणि शिवाजी. दोघांमध्ये संभाजी हे वयाने मोठे मुलगे होते, जे आपले वडील शहाजीराजे भोसले यांच्यासोबत विविध मोहिमांवर जात असत. मात्र शिवाजी महाराज लहान असल्याने आईकडेच राहत असत.

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना उत्तम नैतिकतेने वाढवले ​​आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये स्वतंत्र असे हिंदू राज्य अर्थात स्वराज्याची इच्छा जागृत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आपले बालसवंगडी जमवून सैन्य उभा केले आणि सेनापती झाले. 

कर्नाटकातील लष्करी मोहिमेदरम्यान अफझल खान याने मासाहेब जिजाऊंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना ठार केले. ही खदखद किंवा सल जिजाबाईंच्या मनात कायम होती, तसेच त्यांनाही देखील भीती होती की अफजल खान हळूहळू आपले सर्व कुटुंब संपवून टाकेल. जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाने वेढा टाकला तेव्हा जिजाऊंनी हेरले की आता एक तर अफजल खाना शिवाजी महाराजांना संपवेल किंवा त्यांना कैद करून विजापुरी घेऊन तरी जाईल. मात्र अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत त्यांनी काळजावर दगड ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना अफजलखानाची भेट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जाण्याचे सुचित केले. यामागे राजमाता जिजाऊ यांचा फार मोठा दूरदृष्टीकोन होता. या भेटीमुळे संभाजी राजे यांच्या मृत्यूचा बदला देखील घेतला जाईल, आणि स्वराज्यापुढे उभा असलेला हा खानरूपी सांड कायमचा बाजूला काढला जाईल. आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या भेटीदरम्यान काय घडले याचा इतिहास साक्ष आहे.

जिजामाता यांना त्यांच्या राज्यातील जनतेच्या कल्याणाची खूप आस्था होती. प्रत्येक सामाजिक-राजकीय घडामोडींमध्ये त्या सक्रियपणे सहभाग  घेत असत आणि मोठ्या प्रश्नांवर आपला निर्णय सुद्धा देत असत. त्यांनी आपले वडील आणि पती यांना मुघलांची सेवा सोडून स्वतंत्र राज्य स्थापन करण्यास अनेकदा प्रेरित केले. त्यांना फक्त महाराष्ट्रातून यव्वनी मोगल आक्रमकांना हुसकावून लावायचे होते आणि जनतेचे कल्याणकारी असे मराठा साम्राज्य उभे करायचे होते. त्या काळात मराठ्यांच्या दोन कुळांमध्ये – जाधव आणि भोसले यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले होते. मात्र जिजाबाईंच्या सल्ल्याने भोसले कुटुंब आणि जिजाबाईंचे वडिलांना मतभेद दूर करण्यात आणि दोन्ही कुळांना एकत्र आणण्यास मदत झाली. तिनेच आपल्या वडिलांना सांगितले की मराठे वैयक्तिक अहंकार आणि लोभ बाजूला ठेवून संघटित झाले तर या मोगली आक्रमकांचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही.

अशा या स्वराज्य प्रेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि छत्रपती शिवराय यांच्या आई म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या जिजाबाई यांनी १७ जून १६७४ या दिवशी आपला इहलोकीचा प्रवास संपवला. अशा या माय माऊलीस मानाचा मुजरा…!

 धन्यवाद.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Jijamata Information in Marathi in 1000 Words)

आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक कर्तबगार वीर योद्धे घराणे होऊन गेले. या घराण्यांमध्ये अनेक उमदे सरदार, राजे, सेनापती यांचा समावेश होतो. यांच्या जोडीलाच अनेक स्त्रियांनी देखील देश कार्यात स्वतःला झोकून देऊन अनेक साहसी मोहिमा पार पाडल्या हे आपल्याला माहितीच आहे. अशाच एक वीर योद्धा स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब होय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई असणाऱ्या मासाहेब जिजाऊ या अतिशय कडक मराठा शासक होत्या. शिवरायांनी अशक्य असे वाटणारे स्वराज्य उभा केले त्या कामी त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहण्याचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी नेटाने पार पाडले.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात असणाऱ्या सिंदखेडराजा येथे लढवय्या घराण्यात अर्थात जाधवांच्या घरात झाला. ती तारीख होती १२ जानेवारी १५९८. राजमाता जिजाऊ या सिंदखेडाचे लखोजीराव जाधव आणि म्हाळसाबाई या दाम्पत्याच्या कन्या होत. सिंदखेडा या गावचे प्रमुख आणि राजे असणारे लखोजीराव जाधव यांना देवगिरी येथील यादव घराण्याचा वारसा लाभलेला होता, ते याच घराण्याचे वंशज समजले जात.

जसजसे जिजाऊ मोठ्या होऊ लागल्या तशा त्या गावगाड्यात आपले लक्ष घालू लागल्या. बालपणापासूनच त्यांना मोघली राजवटीचा प्रचंड राग वाटत असे. जिजाबाई सहा वर्षांच्या झाल्यानंतर लखुजीराव जाधवांनी त्यांच्यासाठी वर संशोधन सुरू केले, आणि  मालोजीराव भोसले यांचे सुपुत्र असणारे शहाजीराजे त्यांच्या मनात भरले, आणि दोन सरदार घराणे जिजाबाईंच्या विवाह निमित्त सगेसोयरे झाले.

आणखी वाचा : माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांचे हे दृढ संबंध फार कमी काळ टिकले, याला कारण असे झाले की मोगली दरबारात झालेल्या गैरसमजातून शहाजीराजांचे भाऊ शरीफजी भोसले यांनी जिजाबाईंच्या सख्ख्या भावाला कंठस्नान घातले. त्यामुळे लखोजीराव जाधव भयंकर संतापले आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्याचे त्यांनी मनोमन ठरविले आणि यातूनच जिजाबाईंच्या वडिलांनी शहाजीराजांचे बंधू शरीफजी भोसले यांची हत्या केली. हा वाद आणखी वाढतच गेला यामध्ये शहाजीराजे आपले सासरे लखोजीराव जाधव यांच्यावर आक्रमण करून गेले. या सर्व घडामोडी दरम्यान जिजाबाई फारच व्यतीत झाल्या, मात्र त्यांनी धीटपणे या सर्व प्रसंगाला तोंड दिले  आणि नियमाप्रमाणेच आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून माहेरच्या व्यक्तींशी कुठलेही संबंध ठेवले नाही  त्यांनी अतिशय धैर्याने आपल्या पतीची साथ दिली आणि मुलाबाळांचे देखील संगोपन केले.

दरम्यानच्या काळात मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे अशी दोन मुले तसेच सहा मुली अशी आठ अपत्य झाली. मात्र काळाला हे मान्य नव्हते आणि जिजाबाईंनी आपल्या सर्वच्या सर्व सहा मुली गमविल्या.

शहाजीराजे आणि जिजाबाई यांनी मोठ्या आनंदाने आपला संसार थाटला होता, मात्र काही कारणास्तव शहाजीराजांना मोहिमेवर जावे लागले. अशा वेळी मोठे असणारे संभाजी महाराज यांना शहाजीराजांनी सोबत घेतले तर बाल शिवाजी महाराज आपल्या आईजवळ शिवनेरी गडावरच राहिले.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

मासाहेब जिजाऊ यांनी आपल्या उभ्या आयुष्यात खूप संघर्ष केला. त्यांनी पुण्याच्या कायापालटाचा जणू वसाच घेतला होता. अतिशय उजाड नापीक आणि परकीयांच्या आक्रमणाने ग्रासलेल्या या पुण्याला नवचैतन्य प्रदान करण्याचे काम मासाहेब जिजाऊ यांनी अविरतपणे केले. मात्र या सोबतच त्यांनी एक आईची भूमिका देखील अगदी लीलया पार पाडली. त्यांनी लहानपणापासून परकीयांचा बघितलेला अन्याय आणि अत्याचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. छत्रपती शिवरायांच्या शिक्षणाच्या बाबतीत देखील जिजामाता अतिशय जागरूक होत्या.

शिवरायांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यामध्ये दादोजी कोंडदेव यांना नेमले होते, आणि दादोजींनी देखील शिवरायांच्या शिक्षणाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना उत्तम शिक्षण आणि सोबतच विविध शस्त्रास्त्रे चालविण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. तसेच मासाहेबांनीही त्यांनी एक आदर्श पुत्र व्हावे म्हणून अतिशय उत्कृष्ट संस्कार देखील शिवरायांच्या मनावर बिंबविले. शिवरायांना लहान वयातच राज्यकारभाराची सवय व्हावी म्हणून जिजाऊ यांनी महाराजांकडे अवघ्या चौदाव्या वर्षीच पुण्याच्या कारभाराची धुरा सोपवली, आणि या कामी जिजामाता स्वतः त्यांच्या सोबत असत.

त्याकाळी पुणे अतिशय वाईट अवस्थेत होते. सततच्या मोघली, आदिलशाही आणि निजामशाही आक्रमणांना जनता अगदी कंटाळून गेलेली होती. शेतकरी देखील शेती पिकवेनासे झाले होते, मात्र राजमाता जिजाऊंनी पुण्याचा कारभार आपल्या हातात घेतल्यानंतर लगेचच रयतेच्या कल्याणाची अनेक कामे सुरू केली.

सर्वप्रथम त्यांनी शेतकऱ्यांना अभय दिले. शेतीवरील अनेक जाचक कर रद्द केले  शेतकऱ्यांना शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवून मोत्याची शेती पेरली, तसेच हिंस्त्र प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना संघटित देखील केले. त्यांनी अतिशय कल्पकतेने पुणे शहर वसविले. राजमाता जिजाऊंच्या काळात पुण्याला एक वेगळे चैतन्य आले. पुणे पुन्हा बाळसे धरू लागले, सर्वत्र भरभराट झाली आणि जनतेमध्ये पुन्हा आनंदी वातावरण निर्माण झाले.

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध 

कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना शहाजीराजे आणि संभाजी राजे यांनी अनेक पराक्रम गाजविले, मात्र शेवटी युद्धामध्ये अफजलखानाने या दोघांचीही हत्या केली. पती आणि थोरल्या मुलाच्या अशा अनपेक्षित जाण्याने जिजामातांवर दुःखांचा डोंगर कोसळला. त्यांचे मन अतिशय दुःखी झाले आणि अशातच त्यांनी शहाजीराजांसोबतच सती जाण्याचा निर्णय घेतला. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजामातांना सती जाण्यापासून रोखले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आता त्यांच्या आई अर्थात जिजाबाई ह्याच एक जवळच्या व्यक्ती उरल्या होत्या, त्याही जर सती गेल्या तर स्वराज्य स्थापनेचे हे महत कार्य होणार नाही हे जिजाबाईंना उमजले. आणि त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला. छत्रपती शिवाजी राजांसाठी मासाहेब जिजाऊ या मार्गदर्शक, शिक्षक, गुरु, पालक अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या होत्या. 

पुढे प्रतापगडाच्या पायथ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात भेट होण्याची निश्चित झाली तेव्हा मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना मानसिक बळ दिले, आणि सांगितले की राजे आपल्या वडील आणि भाऊ यांच्या हत्याऱ्याला जिवंत सोडू नका. त्या घटनेचा बदला घेण्याची आता हीच योग्य वेळ आलेली आहे, आणि छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध करून आपल्या आईच्या मनात असलेली बऱ्याच वर्षांपूर्वीची खदखद शांत केली. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शिवरायांच्या इतकेच राजमाता जिजाऊ यांचे देखील योगदान आहे.

अखंड महाराष्ट्राचे स्वराज्य स्थापन झाल्याचे बघून जिजाऊंना खूप हायसे वाटले, मात्र त्यांच्यासाठी अजून देखील हे पुरे नव्हते. त्यांनी शिवरायांजवळ या हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेकाची मागणी धरली. शिवरायांनी ६ जून १६७४ मध्ये आपला राज्याभिषेक केला, यावेळी राजमाता जिजाऊ धन्य झाल्या. मात्र स्वराज्यासाठी हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, आणि शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसातच जिजाबाई यांनी रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी आपला इहलोकीचा प्रवास संपविला, आणि त्या वैकुंठवासी झाल्या. त्यादिवशी स्वराज्यातील अखंड प्रजा पोरकी झाली, आणि हा दिवस १७ जून १६७४  इतिहासात एक काळा दिवस म्हणून कोरल्या गेला.

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

 मित्रांनो जिजामाता या अतिशय विद्वान, दिलेल्या वचनाला जागणाऱ्या आणि थोर अशा योध्या होत्या. त्यांचे विचार अतिशय प्रभावी आणि दूरदर्शी स्वरूपाचे होते. शिवबांच्या रूपात त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनाच पुन्हा जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या वंदनीय आणि सर्वांच्या आदरास पात्र असणाऱ्या जिजाबाईंना मानाचा मुजरा…!

 धन्यवाद.

Previous

सूर्यमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती | Solar System Planets Information in Marathi

माझी सहल मराठी निबंध | Mazi Sahal Essay in Marathi

Next

Leave a Comment