नाम आणि नामाचे प्रकार । Nam Va Namache Prakar

| |

मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे “नाम.”  या लेखात आपण नाम आणि नामाचे प्रकार (Nam Va Namache Prakar) याबद्दल माहिती घेणार आहोत. आशा करतो हा लेख आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचे काम करेल. अशाप्रकारची माहिती आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये खूपच उपयोगी पडू शकते. चला तर मग पाहूया नाम आणि नामाचे प्रकार. 

नाम हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच सर्वप्रथम आपण नामाची व्याख्या (Noun in Marathi) पाहूया. 

नामाची व्याख्या : एखाद्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक, सजीव किंवा निर्जीव गोष्टींना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम. 

उदा. टेबल, कागद, पेन, गाडी, साखर, देव, अप्सरा, खोटेपणा, औदार्थ, स्वर्ग, पुस्तक इ.

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

नामाचे प्रकार (Nam Va Namache Prakar)

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. 

  • सामान्य नाम 
  • विशेष नाम 
  • भाववाचक नाम 

१. सामान्य नाम

एकाच जातीच्या पदार्थातील सामान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. या नामातून संपूर्ण जातीचा बोध होतो.  

उदा. नदी, पुस्तक, मुलगा, माणूस, शहर, रस्ता, प्राणी, पक्षी इत्यादी. 

उदाहरणार्थ:

१. नदी डोंगरामध्ये उगम पावते आणि समुद्राला जाऊन मिळते. 

२. पुस्तक हा ज्ञानाचा कधीही न आटणारा झरा आहे. 

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

सामान्य नामाचे अजून दोन उपप्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे,

अ) समुदायवाचक सामान्य नाम

ब) पदार्थवाचक सामान्य नाम

अ) समुदायवाचक सामान्य नाम

वाक्यातील ज्या शब्दातून संपूर्ण समूहाचा बोध होतो त्याला समुदायवाचक नाम असे म्हणतात. 

उदा. कळप, घोळका, जुडगा, थवा, संघ, तुकडी, गट इत्यादी. 

उदाहरणार्थ:

१. पक्ष्यांचा थवा उंच आकाशात उडत होता. 

२. सैनिकांची एक तुकडी सीमेवर तैनात आहे. 

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

ब) पदार्थवाचक सामान्य नाम

जे पदार्थ संख्यांमध्ये न मोजता इतर परिमाणांनी मोजले जातात त्यांना पदार्थवाचक सामान्य नाम असे म्हणतात. 

उदा. सोने, तेल, दूध, तांदूळ इत्यादी. 

उदाहरणार्थ:

१. मी दोन तोळे सोने खरेदी केले. 

२. घरात पाच लिटर तेलाचा डबा ठेवलेला आहे. 

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

२. विशेष नाम 

एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा ठिकाणाचे विशिष्ट नाव दर्शवणाऱ्या शब्दाला विशेष नाम असे म्हणतात. 

उदा. भारत, पृथ्वी, सचिन, प्रियांका, हिमालय, गोदावरी, लाल, इत्यादी. 

उदाहरणार्थ:

१. गंगा हि भारतातील एक पवित्र नदी आहे. 

२. सचिन तेंडुलकर हा एक महान खेळाडू आहे. 

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

३. भाववाचक नाम 

ज्या नामामुळे व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यांच्या गुण, भावना अथवा धर्माचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. 

उदा. प्रामाणिक, राग, सुंदर, उदास, हुशार, आळशी, प्रेम, मेहनती इत्यादी.

उदाहरणार्थ:

१. सतीश खूप मेहनती मुलगा आहे. 

२. राधिका हुशार मुलगी आहे. 

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

आशा करतो या लेखातील नाम आणि त्याचे प्रकार (Namache Prakar in Marathi) याबद्दलची माहिती आपल्याला जरूर आवडली असेल. माहिती कशी वाटली हे  कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

भारतातील पहिले | List of First in India in Marathi

शब्दांच्या जाती । Shabdanchya Jati in Marathi

Next

Leave a Comment