शब्दांच्या जाती । Shabdanchya Jati in Marathi

| |

कोणतीही भाषा हि वाक्यांपासून बनते आणि वाक्य शब्दांपासून. मराठी भाषा हि अशाच अगणित शब्दांपासून बनली आहे. या शब्दांचे एकूण आठ भागांत विभाजन केले आहे. त्यांना शब्दांच्या जाती (Shabdanchya Jati in Marathi) असे म्हणतात. या आठ जाती म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, आणि केवलप्रयोगी अव्यय. या लेखात आपण याच शब्दांच्या जाती (Parts of Speech in Marathi) पाहणार आहोत. 

शब्दांच्या जाती (Shabdanchya Jati in Marathi)

 या आठ जातींचे मुख्यता दोन भाग पडतात.

अ. विकारी शब्द

ब. अविकारी शब्द

अ.  विकारी शब्द

विकारी शब्द मराठी भाषेतील असे काही शब्द जे वाक्यात जसेच्या तसे वापरले जात नाहीत. वाक्यात उपयोग होत असताना त्यांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात विकारी म्हणजे बदल घडणारे शब्द. विकारी शब्दांना सव्यय असेही म्हणतात. 

विकारी शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे:

१. नाम

२. सर्वनाम

३. विशेषण

४. क्रियापद

नामाची व्याख्या : एखाद्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक, सजीव किंवा निर्जीव गोष्टींना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम. 

उदा. सागर, पृथ्वी, स्वर्ग, पुस्तक, प्राणी, गाडी, देव, मासा, खुर्ची, पेन इत्यादी. 

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

सर्वनाम : एखाद्या वाक्यात किंवा परिच्छेदामध्ये नामाचा उल्लेख वारंवार होत असेल तर त्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. 

उदा. तो, ती, ते, हा, हि, हे, त्याचे, त्याला, ह्याने, ह्याला इत्यादी. 

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हा शब्द नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगतो. 

उदा. मेहनती मुलगा, सुंदर दृश्य, हिरवा निसर्ग 

वरील उदाहरणांमध्ये मेहनती, सुंदर, आणि हिरवा हि विशेषणे आहेत. 

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. हा शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. 

उदा. केले, करतो, बसला, लिहितो, खातो.

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

ब. अविकारी शब्द

ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती यांमुळे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द म्हणतात. अविकारी शब्दांना अव्यय असेही म्हणतात. 

अविकारी शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे:

१. क्रियाविशेषण अव्यय

२. शब्दयोगी अव्यय

३. उभयान्वयी अव्यय

४. केवलप्रयोगी अव्यय

क्रियाविशेषण अव्यय : वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. 

उदा. कधीकधी, थोडी, हळू, सर्वदा, जलद, फार, मागून.

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्यय : वाक्यातील काही शब्द जे स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यये म्हणतात. हे शब्द नामासोबत जोडून संयुक्त शब्द तयार करतात आणि इतर शब्दांसोबत संबंध दर्शवतात. 

उदा. कडे, खाली, जवळ, वर, समोर इत्यादी. 

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदा. पण, आणि, परंतु, म्हणून, व इत्यादी.

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

केवलप्रयोगी अव्यय : आपल्या मनातील भावना म्हणजेच आश्चर्य, दुःख, आनंद, तिरस्कार व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. 

उदा. ओहो!, बापरे!, अरेरे!, वाहवा!, अबब!, अं! इत्यादी. 

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

मराठी व्याकरणातील (Shabdanchya Jati in Marathi) हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Previous

नाम आणि नामाचे प्रकार । Nam Va Namache Prakar

सर्वनाम व त्याचे प्रकार । Sarvanam Va Tyache Prakar

Next

Leave a Comment