MNS Nondani.in | मनसे सभासद नोंदणी | MNS Nondani in Marathi 2021

मनसे सभासद नोंदणी (MNS Nondani in Marathi 2021)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी (MNS Sabhasad Nondani) अभियानाला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे (Raj Shrikant Thackeray) यांच्या उपस्थितीत या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला.

यावेळी राज ठाकरे यांनी देखील बारकोड स्कॅन करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी केली.

Raj Thackeray MNS Nondani 2021 Showing Registration on Mobile
Raj Thackeray MNS Nondani 2021

या प्रसंगी राज ठाकरे यांच्यासह पत्नी सौ. शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

त्याचबरोबर धडाडीचे मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

डिजिटल माध्यमातून मनसे सभासद नोंदणी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान राबवले जात आहे.

महाराष्ट्र शासनाचे सुरक्षा निकष पाळूनच मनसे सभासद नोंदणी होत असल्यामुळे या अभियानाचे विशेष कौतुक आहे.

मनसे सभासद नोंदणी (MNS Registration 2021)

जर आपण मनसे पक्षाचे अधिकृत सदस्य म्हणून नोंदणी (MNS Sabhasad Nondani)करू इच्छित असाल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व तुमचा मोबाईल नंबर व इतर माहिती टाकून मनसे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

MNS Registration Form 2021 Link: https://mnsnondani.in/ma.html

मनसे सभासद नोंदणी प्रक्रिया (MNS Registration Process 2021)

स्टेप १: वरील लिंक वर क्लिक करून मनसे सभासद नोंदणी वेबपेजला भेट द्या आणि आपला मोबाईल क्रमांक एंटर करा.

मी सहमत आहे‘ या पर्यायासमोरील रेडिओ बॉक्स मध्ये टिक करा आणि ‘पुढे जा‘ बटणावर क्लिक करा.

MNS Nondani.in Marathi Step: 1 - Add Mobile Number
MNS Nondani.in Marathi Step 1 Add Mobile Number

स्टेप २: यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ४ आकडी ओटीपी पाठवण्यात येईल. तो कोड रकान्यात भरा.

जर ओटीपी मिळाला नाही, तर पुन्हा ओटीपी पाठवण्यासाठी विनंती करू शकता.

MNS Nondani.in Marathi Step: 2 - Add OTP
MNS Nondani.in Marathi Step: 2 – Add OTP

स्टेप ३: आपले नाव, आडनाव, वडील/पतीचे नाव,आणि जन्मतारीख इत्यादी वैयक्तिक माहिती भरा. ही माहिती देणे मनसे सदस्य नोंदणीसाठी अनिवार्य आहे.

MNS Nondani.in Marathi Step: 3 - Add Personal Information
MNS Nondani.in Marathi Step: 3 – Add Personal Information

स्टेप ४: पिनकोडसह आपला पत्ता भरा.

MNS Nondani.in Marathi Step: 4 - Add Address
MNS Nondani.in Marathi Step: 4 – Add Address

स्टेप ५: आपला एक फोटो अपलोड करा.

MNS Nondani.in Marathi Step: 5 - Upload Photo
MNS Nondani.in Marathi Step: 5 – Upload Photo

Leave a Comment