मराठी भाषा गौरव दिन इमेजेस

| |

मराठी भाषा गौरव दिन विशेष…

२७ फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जेष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे.

हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

कवी कुसुमाग्रजांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.

त्यामुळे कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून आणि आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आजचा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून विविध मराठी प्रेमी संस्थांकडून वेगवेगळ्या मराठी साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यांमध्ये कवी संमेलने, व्याख्याने इत्यादींचा समावेश असतो.

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक होते.

त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर.

परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले.

कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक बहीण होती.

त्या एकुलत्या एक बहिणीचे नाव कुसुम… कुसुमचे अग्रज म्हणून त्यांनी त्यांचे टोपणनाव कुसुमाग्रज असे धारण केले.

कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले.

१० मार्च १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.

नाशिकमधील टिळकवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे मोठे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

Marathi Bhasha Gaurav Din Images in Marathi

मराठी राजभाषा दिन इमेजेस (Marathi Rajbhasha Din Quotes in Marathi)Pin
मराठी राजभाषा दिन इमेजेस (Marathi Rajbhasha Din Quotes in Marathi)

मराठी राजभाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक
जाणतो मराठी
एवढ्या जगात माय
मानतो मराठी

Marathi Rajbhasha Dinachya
Hardik Shubhechha!
Labhale Aamhans Bhagya
Bolato Marathi
Jahalo Kharech Dhanya
Aikato Marathi
Dharm, Panth, Jat Ek
Janato Marathi
Evadya Jagat Maya
Manato Marathi

मराठी राजभाषा दिन इमेजेस, Marathi Rajbhasha Din Wishes in MarathiPin
मराठी राजभाषा दिन इमेजेस (Marathi Rajbhasha Din Wishes in Marathi)

मराठी भाषा गौरव दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

Marathi Bhasha Gaurav Dinachya
Hardik Shubhechha!

मराठी राजभाषा दिन इमेजेस, Marathi Rajbhasha Din Status in MarathiPin
मराठी राजभाषा दिन इमेजेस (Marathi Rajbhasha Din Status in Marathi)

मराठी भाषा
गौरव दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम्य धीराने,
केली मृत्यूवरी मात

Marathi Bhasha
Gaurav Dinachya
Hardik Shubhechha!
Mazya Marathi Maticha,
Lava Lalatas Tila
Hichya Sangane Jagalya,
Daryakhoryantil Shila
Hichya Kushit Janmale,
Kale Kanakhar Hat
Jyanchya Durdamya Dhirane,
Keli Mrutyuvari Mat

Previous

डोळ्यांत तुझ्या मी पाहता वाटे…

महेंद्र सिंह धोनी बायोग्राफी

Next

Leave a Comment