महाराष्ट्रातील मुंबई, विदर्भ यांसारख्या काही भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
ठाणे शहरातही मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रयत्ननांची पराकाष्ठा करून देखील रुग्ण संख्या कमी करण्यास अपयश येत आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे येथील १६ ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
याठिकाणील लॉकडाऊन वाढवून ३१ मार्च पर्यंत करण्यात आले आहे. (Lockdown Extended Till March 31 in Thane)
या काळात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
एकंदरीत पाहता ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.
परंतु तरीही कोरोना प्रादुर्भावावर म्हणावे तसे नियंत्रण दिसून येत नाही.
त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून ठोस पाऊले उचलण्याच्या प्रयत्नात आहे.
शहरात अधिक धोका असलेल्या ठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
ठाण्यात १६ ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
हे जर असेच सुरु राहिले तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन जाईल.
ही बाब लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
ज्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात होत आहे अशी १६ ठिकाणे निश्चित करून ती हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
या ठिकाणी कोरोना संबंधित कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
हे आहेत ठाण्यातील १६ हॉटस्पॉट (Thane Lockdown Hotspots)
कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, सुर्यनगर, आईनगर, खारेगाव परिसर.
परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, श्रीनगर आणि वागळे.
परिमंडळ 3 मध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले, हिरानंदानी इस्टेट.
लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातील दोस्ती विहार, कोरस टॉवर, शिवाई नगर, रुस्तुमजी, कोलबाड.