इंग्लंडचा भारत दौरा आता दुसऱ्या टप्प्यात येऊन पोचला आहे.
कसोटी मालिकेमध्ये ३-१ अशी धूळ चारत भारतीय संघाने इंग्लंड संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (ICC World Test Championship) शर्यतीतून बाहेर काढत थाटात फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.
याचा वचपा टी -२० मालिकेमध्ये काढण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच टी -२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. १२ मार्च पासून या मालिकेला सुरुवात होईल. (India vs England T-20 Series 2021)
याअगोदर झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी -२० सामन्यांच्या मालिकेत विराटच्या सेनेने इंग्लंडचा २-१ असा पराभव केला होता.
नुकतीच कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
त्यामुळे इंग्लडला विजयासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत.
दरम्यान इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर जाणार असल्याची चर्चा होत आहे.
या मालिकेसाठीचे भारतीय खेळाडू आधीच भारतीय ताफ्यात सामील झाले आहेत तर इंग्लंडचे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तरबेज असणारे खेळाडूही त्यांच्या संघात सहभागी झाले आहेत.
पुढे येणाऱ्या टी -२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
वेळापत्रक
या मालिकेतील पाचही सामने जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
दिनांक १२, १४, १६, १८ आणि २० मार्च रोजी खेळवण्यात येतील.
सर्व सामन्यांचे प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून करण्यात येईल.
भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल,शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, वरून चक्रवर्ती, यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतीया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी
इंग्लड संघ
इयॉन मॉर्गन, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिन्ग्ज, सॅम करन, जोस बटलर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लाएम प्लंकेट, आदिल रशीद, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जेसन रॉय, रिसे टॉप्लि, मार्क वूड, जॅक बॉल,मॅट पर्किसन
प्रक्षेपण
स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार आणि जिओ टीव्ही