जेईई २०२१ में परीक्षेचा निकाल जाहीर, ६ जणांना १०० टक्के

| | ,

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2021) जाहीर झाला आहे.

कोरोना महामारीमुळे ही परीक्षा प्रथमच चार वेगवेलग्या टप्प्यांत घेण्यात येणार आहे.

फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (JEE Main 2021 Results for February Examination Released)

देशभरातून ६ लाख ५२ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

यातील ६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल मिळाले आहे.

राजस्थान चा साकेत झा हा देशात पहिला आला आहे तर महाराष्ट्रातून सिद्धांत मुखर्जी पहिला आला आहे.

२०२१ ची जेईई मेन परीक्षा २३,२४,२५ आणि २६ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. 

jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

ही परीक्षा ३३१ वेगवेगळ्या शहरांमध्ये घेण्यात आली होती.

यामध्ये कोलंबो, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, शारजाह, सिंगापूर, कुवेत यांसाख्या भारताबाहेरील शहरांचाही समावेश होता. 

अव्वल स्थान मिळवलेले विद्यार्थी (JEE Main Topper 2021)

  • १) साकेत झा – राजस्थान 
  • २) प्रवर कटारिया – दिल्ली 
  • ३) रंजीम प्रबल दास – दिल्ली 
  • ४) गुरमीत सिंह – चंदिगड 
  • ५) सिद्धांत मुखर्जी – महाराष्ट्र 
  • ६) अनंत क्रिष्णा किदांबी – गुजरात 

याशिवाय SC कॅटेगरी मधून उत्तर प्रदेश च्या आर्यांश कुमार सिंह ने ९९.९५८२ पर्सेन्टाइल मिळवत प्रथम स्थान पटकावले तर OBC कॅटेगरी मध्ये तामिळनाडू च्या थिरुवरुल पी याने ९९.९५ पर्सेन्टाइल मिळवत अव्वल स्थान पटकावले.

नवीनच समाविष्ट करण्यात आलेल्या EWS कॅटेगरीमध्ये अनुमला व्यंकट जया चैत्यन्य याने प्रथम स्थान पटकावले आहे. 

कसा पाहणार निकाल?

  • स्टेप १: jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईट वर जा.
  • स्टेप २: या वेबसाईटवर JEE Main Feb Result या ऑप्शनवर क्लिक करा.
  • स्टेप ३ त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
  • स्टेप ४: यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल
  • स्टेप ५: निकाल तपासा
  • स्टेप ६: त्यानंतर प्रिंट काढा.
Previous

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला दिनानिमित्त केले आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव, ठाण्यात १६ ठिकाणी लॉकडाऊन वाढवला

Next

Leave a Comment