क्रियापद व त्याचे प्रकार । Kriyapad Va Tyache Prakar

| |

मराठी व्याकरणातील पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे क्रियापद. या लेखात आपण क्रियापद व त्याचे प्रकार (Kriyapad Va Tyache Prakar) पाहणार आहोत.

सर्वप्रथम आपण क्रियापद म्हणजे काय? (Kriyapad in Marathi) त्याची व्याख्या पाहू.

क्रियापद : वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

उदा. १. रमेश आंबा खातो. 

       २. निकिता फार सुंदर गाते. 

वरील वाक्यांमध्ये “खातो” आणि “गाते” हि क्रियापदे आहेत. 

धातू : क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.

उदा. १. धावणे = धाव + णे

       २. जिंकणे = जिंक + णे 

वरील उदाहरणांमध्ये “धाव”, “जिंक” हे धातू आहेत. तर “णे” हा धातू ला लागलेले प्रत्यय आहे.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती

धातुसाधित : धातूला विविध प्रत्यय लागूनसुद्धा क्रिया पूर्ण ना करणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण न करणाऱ्या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदंते असे म्हणतात.

उदा. १. खुर्चीत बसून (बस) त्याने भाषण दिले. 

       २. मला त्याचे वागणे (वाग) आवडले नाही.

वरील वाक्यांमध्ये “बसून” आणि “वागणे” हि धातुसाधिते किंवा कृदंते आहेत.

आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहू.

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

क्रियापदाचे प्रकार (Kriyapad Va Tyache Prakar)

मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. 

  • सकर्मक क्रियापद 
  • अकर्मक क्रियापद 
  • व्दिकर्मक क्रियापद
  • उभयविध क्रियापद 
  • सहाय्यक क्रियापद 
  • संयुक्त क्रियापद

१. सकर्मक क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला जेव्हा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते अशा क्रियापदांना सकर्मक क्रियापदे असे म्हणतात. 

उदा. १. राहुल आंबा खातो. 

       २. गाय दूध देते. 

वरील वाक्यांमध्ये खातो आणि देते हि सकर्मक क्रियापदे आहेत. कारण त्यांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आंबा आणि दूध या कर्मांची गरज आहे. 

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

२. अकर्मक क्रियापद 

ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पुनः करण्यासाठी कर्माची आवश्यकता लागत नाही त्यांना अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. 

उदा. १. समीर पळाला. 

       २. ती हसली. 

वरील वाक्यांमध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नाही. फक्त करता आणि क्रियापद यांनीच वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे. म्हणून पळाला आणि हसली हि अकर्मक क्रियापदे आहेत. 

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

३. व्दिकर्मक क्रियापद 

ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन क्रियापदांची आवश्यकता असते त्यांना व्दिकर्मक क्रियापदे म्हणतात.  दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या वाक्यातील क्रिया हि एकाचवेळी दोन घटकांवर होत असते अशा क्रियापदांना व्दिकर्मक क्रियापदे असे म्हणतात. 

उदा. १. गुरुजीनी मुलांना गणित शिकवले. 

वरील वाक्यामध्ये शिकवण्याची क्रिया मुलांवर आणि गणितावर झाली आहे. म्हणून शिकवले हे व्दिकर्मक क्रियापद आहे. 

      २. रमेशने सुरेशला पैसे दिले. 

या वाक्यामध्ये देखील देण्याची क्रिया सुरेश आणि पैसे यांवर झाली आहे. म्हणून दिले हे व्दिकर्मक क्रियापद आहे.

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

४. उभयविध क्रियापद 

अशी क्रियापदे जी वेगवेगळ्या वाक्यांत सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतातत्यान उभयविध क्रियापदे असे म्हणतात. 

उदा. १. माझा पेन हरवला. 

       २. राजेशने माझा पेन हरवला. 

वरील दोन्ही वाक्यांमध्ये हरवला हे क्रियापद आहे. परंतु पहिल्या वाक्यामध्ये पेन हा कर्ता आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये राजेश हा कर्ता आहे आणि पेन हे कर्म आहे. याचाच अर्थ वरील वाक्यांमध्ये हरवला हे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले गेले आहे. म्हणून त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. 

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

५. सहाय्यक क्रियापद

जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातुसाधिताला सहकार्य करते त्याला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. 

उदा. १. तो नेहमी रडत असतो. 

वरील वाक्यामध्ये असतो हे क्रियापद रडत या धातुसाधिताला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सहकार्य करते. म्हणून असतो हे साहायक क्रियापद आहे.

आणखी वाचा : शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

६. संयुक्त क्रियापद

धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या सहयोगाने बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. परंतु धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद या दोधांमधूनही एकाच क्रियेचा बोध व्हावा लागतो. 

उदा. १. साहिल मैदानावर पळू लागला. (पळू = धातुसाधित, लागली = सहाय्यक क्रियापद)

       २. जाताना ते घेऊन जा. (घेऊन = धातुसाधित, जा = सहाय्यक क्रियापद)

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

वाचकहो या लेखातील क्रियापद व त्यांचे प्रकार (Types of Verbs in Marathi) याबद्दलची हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कंमेंटद्वारे जरूर कळवा. काही सुधारणांची आवश्यकता असल्यास आपल्या सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. माहिती आवडल्यास आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा.

Previous

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध । Shetkaryache Manogat Marathi Nibandh

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

Next

Leave a Comment