तैमूर झाला दादा! सैफ आणि करिनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न!

| |

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी सैफ अली खान आणि करिना कपूर हे नुकतेच दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत.

त्यांच्या घरी एका गोंडस लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. (Kareena Kapoor and Saif Ali Khan become Parents Second Time, Welcomes Baby Boy)

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री करिना कपूर खान हिने काल सकाळी ९ वाजता मुलाला जन्म दिला आहे.

Kareena Kapoor And Saif Ali Khan Blessed With Second Baby BoyPin
Kareena Kapoor And Saif Ali Khan Blessed With Second Baby Boy

यामुळे कपूर परिवार आणि खान परिवार यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे हे दुसरे अपत्य आहे.

२०१६ साली तैमूर हा त्यांना पहिला मुलगा झाला होता.

मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात करिनाला दाखल करण्यात आले होते.

इथेच तिने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

करिनाला मुलगा झाला आहे अशी बातमी रणधीर कपूर यांनी दिली. 

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांना प्राप्त झालेले हे दुसरे पुत्ररत्न आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती करिना आणि सैफ यांनी दिली होती.

आई व बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे समजतेय.

दुसऱ्या बाळाच्या आगमनामुळे सैफ आणि करिनावर चहुबाजुंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

या दुसऱ्या अपत्यप्राप्ती आधी सैफ आणि करिना एका नव्या आलिशान घरात शिफ्ट झाले आहेत.

याच नव्या घरात ते आपल्या बाळाचे जंगी स्वागत करणार आहेत.

तैमूरला आता एक छोटा भाऊ मिळाला आहे.

ज्याप्रमाणे स्टार किड्सची कायम चर्चा होत असते त्याचप्रमाणे सैफ आणि करिनाचे हे बाळ कायम चर्चेत असेल यात वादच नाही.

तैमूरच्या जन्मानंतर तैमूरही कायम चर्चेत होता.

२०१६ साली पहिल्यांदा गर्भवती असताना त्या काळात करिनाने काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.

बेबी बम्प सह तिने काही जाहिरातींमध्ये काम केले होते.

बेबी बम्प सह तिने केलेला रॅम्प वॉक प्रसिद्ध झाला होता.

दुसऱ्यांदा गर्भवती असतानाही तिने या काळात काम केले आहे. बेबी बम्प सह डिझाइनर कपड्यात केलेलं फोटोशूट यावेळी प्रसिद्ध झाले होते. 

तैमूरच्या जन्मानंतर करिनाने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले होते.

करिना लवकरच आमिर खान सोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटातील तिच्या वाट्याचे शूटिंग तिने कधीच पूर्ण केले आहे.

याशिवाय आगामी काही दिवसात ती कारण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात झळकणार आहे.

Previous

कार्तिक आर्यन बायोग्राफी

सहकार्य करा, नाहीतर…अमरावती पोलिसांची जनतेला तंबी!

Next

Leave a Comment