भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदक जिंकत रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी

| | ,

रोम येथे सुरु असलेल्या मात्तेव पेलिकॉन रँकिंग सिरीज (Matteo Pellicone Ranking Series) मध्ये भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने सुवर्णपदक जिंकत तिच्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. (Indian Wrestler Vinesh Phogat Reclaims No.1 Rank with Gold in Rome)

२६ वर्षीय विनेश फोगट ही जागतिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेली आणि टोकियो गेम्स मध्ये प्रवेश करणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे.

तिने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन विकर हिला ४-० अशा फरकाने पराभूत केले.

विनेश फोगट हिने आपले सर्व गुण पहिल्या काही मिनिटांतच संपादित केले.

नंतर तिने ही आघाडी कायम राखत सामना आपल्या खिशात घातला.

या सुवर्ण पदकासोबतच तिच्या गटात रँकिंग मध्ये तिने अव्वल स्थान मिळवले आहे.

कोण आहे विनेश फोगट?

अनेकांना माहीतही नसेल विनेश फोगट कोण आहे.

२५ ऑगस्ट १९९४ साली जन्मलेली विनेश फोगट ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य असणाऱ्या विनेशने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पदक मिळवले आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

२०१६ साली तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Previous

मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी व्यक्तिमत्व श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

मराठी साहित्य संमेलनाला कोरोनाचा फटका, मे अखेर होणार संमेलन

Next

Leave a Comment