मराठी साहित्य संमेलनाला कोरोनाचा फटका, मे अखेर होणार संमेलन

| | ,

२६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च मध्ये होणारे हे साहित्य संमेलन पुढे ढकलून मे मध्ये करण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. (Nashik Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Postponed)

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रविवार दिनांक ७ मार्च रोजी एका पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

त्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे होणारे मराठी साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे अथवा पुढे ढकलावे अशी प्रतिक्रिया साहित्यिक आणि नाशिक करांकडूनही दिली जात होती.

नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या साहित्यिकांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, विदर्भ याठिकाणी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता आयोजकांनी सावध भूमिका घेत संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

तयारीमध्ये शिथिलता

गेल्या काही दिवसांपासून या संमेलनाच्या तयारीत शिथिलता दिसून येत होती.

कार्यालयातील हालचालींचा वेग कमी झाला होता.

अजूनपर्यंत कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे.

तसेच संमेलनाचे उदघाटन आणि समारोप कोण करणार यांसारख्या अनेक छोट्या मोठया गोष्टींचे नियोजन करणे बाकी आहे.

त्यातच संमेलनाच्या आयोजन समितीवरही कोरोनाचे वादळ घोंगावत आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ते उपचार घेत आहेत.

त्याचबरोबर इतर समित्यांचे काही कार्यकर्तेही कोरोना बाधित झाले आहेत.

साहित्य संमेलनाला जास्त करून जेष्ठ नागरिक येतात.

त्यामुळे कार्यक्रमाला काही गालबोट लागू नये म्हणून संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक चे पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Previous

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदक जिंकत रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी

आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये

Next

Leave a Comment