मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी व्यक्तिमत्व श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

| | ,

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुणे येथे काल वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी ते ९१ वर्षांचे होते. (Marathi Veteran Actor Shrikant Moghe Passes Away)

कायम हसरा चेहरा आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची खास बाब होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव अभिनेता शंतनू आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे.

मोघे यांच्या पार्थिव शरीरावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोघे हे दिवसांपासून आजारांनी ग्रसित होते. कुठेही जायचे झाले तरी त्यांना व्हिलचेअर मधून जावे लगे.

अशाही परिस्थितीत ते वेगवेगळ्या सभांना किंवा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावायचे.

शनिवारी त्यांनी कर्वे नगर येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं.

६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्माला आलेल्या मोघे यांचं शालेय शिक्षण किर्लोस्करवाडी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलंगडं कॉलेज येथे झालं.

पुण्याच्या एस. पी कॉलेज मधून त्यांनी बीएससी पूर्ण केली तर मुंबईतून त्यांनी बी. आर्च ही पदवी संपादन केली.

पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा कल नाटकांच्या दिशेने वळला. लग्नाची बेडी, अंमलदार अशी अनेक नाटके त्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली.

त्यांनी ६० हून अधिक नाटके आणि ५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

२००५-०६ – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार
२०१० – काशीनाथ घाणेकर पुरस्कार
२०१० – केशवराव दाते पुरस्कार
२०१० – अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार
२०१२ – सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
२०१३ – गदिमा पुरस्कार
२०१४ – महाराष्ट्र सरकारचा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार

शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटर वरून “जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनाने एक उमदा व बहारदार रंगकर्मी आपल्यातून हरपला.” अशा शब्द सुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Previous

टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने!

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदक जिंकत रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी

Next

Leave a Comment