मराठी विनोद | पोट धरून हसा!

| | ,

Marathi Jokes

सत्यनारायणाची कथा आणि फाटकी नोट

एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती.

आरती झाल्यावर माझ्या समोर आरतीचं ताट आले.

नमस्कार करुन मी खिशातुन १० रुपयांची फाटकी नोट काढुन त्या ताटात अशा प्रकारे ठेवली की कुणी पाहु नये.

गर्दी खूप होती, त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला.

तेवढ्यात त्या गर्दीमध्ये माझ्या मागे उभ्या असलेल्या काकुंनी माझ्यापुढे २००० रु.ची नोट धरली.

मी ती नोट घेउन आरतीच्या ताटात टाकली.

ती २००० रु.ची नोट बघून आपण फक्त १० रुपयेच तेही फाटके आरतीच्या ताटात टाकले, या गोष्टीची थोडी लाज पण वाटली आणि त्या काकुंबद्दल चांगलाच आदर वाटला, म्हणुन बाहेर जाताना मी त्यांना नमस्कार केला.

तसे त्या म्हणाल्या, “तुम्ही १० रूपयांची नोट काढताना तुमच्या खिशातुन २००० रुपयांची नोट खाली पडली होती, ती तुम्हाला मी परत देत होते!”

😀 🙏बोला सत्यनारायण महाराज की जय!🙏 😄

Previous

व्हॅक्सिनेशन साठी आता रजिस्टर करा आरोग्य सेतू ॲप वरून

श्रेया घोषाल होणार आई, नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल

Next

Leave a Comment