Registration For Corona Vaccine Through Aarogya Setu App
भारतामध्ये कोरोना व्हॅक्सिनेशनचे दुसरे सत्र सोमवार दिनांक १ मार्च पासून सुरु झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विमा संस्थेमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेऊन या सत्राची सुरुवात केली.
त्यावेळी त्यांनी दुसऱ्या सत्रामध्ये व्हॅक्सिनेशन साठी पात्र असणाऱ्या सर्व लोकांना लस टोचून घेण्याचे आवाहनही केले आहे.
कोरोना व्हॅक्सिनच्या या दुसऱ्या सत्रात ६० वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना तसेच पूर्वीच्या काही आजारांनी ग्रसित असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.
यासाठीचे रजिस्ट्रेशन आता आरोग्य सेतू ॲप वरूनही करता येणार आहे. (Registration For Corona Vaccine Through Aarogya Setu App).
आरोग्य सेतू ॲपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधीची माहिती देणारा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.
कसे कराल रजिस्ट्रेशन?
स्टेप १: सर्वात आधी आरोग्य सेतू ॲपच्या CoWin या टॅब वर क्लिक करा.
स्टेप २: तेथे तुम्हाला व्हॅक्सिनेशन इन्फॉर्मेशन (Vaccination Information), व्हॅक्सिनेशन (Vaccination), व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Vaccination Certificate), व्हॅक्सिनेशन डॅशबोर्ड (Vaccination Dashboard) असे चार पर्याय दिसतील.
त्यातील व्हॅक्सिनेशन (Vaccination) या पर्यायावर क्लिक करून रजिस्टर नावू (Register Now) वर क्लिक करा.
स्टेप ३: ओपन झालेल्या टॅब मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Proceed to Verify करा.
स्टेप ४: तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. तो टॅब मध्ये टाका.
स्टेप ५: नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर एक ओळखपत्र जे तुम्ही व्हॅक्सिनेशन सेंटरवर घेऊन जाऊ शकता, ओळखपत्राचा नंबर, ओळखपत्रावर असल्याप्रमाणे पूर्ण नाव त्यानंतर तुमचं लिंग (स्त्री/ पुरुष) आणि तुमचं वय अशी माहिती भरावी लागेल.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, वोटर आयडी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही ओळखपत्र म्हणून वापरू शकता.
स्टेप ६: जर तुमचे वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही डायरेक्ट सबमिट या बटनावर क्लिक करू शकता. परंतु जर तुम्ही ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील असाल तर तुम्हाला खाली येणाऱ्या चौकोनामध्ये बरोबरची खूण (✓) करणे अनिवार्य आहे.
स्टेप ७: अपॉइंटमेंट साठी जाताना ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांना मेडिकल सर्टिफिकेट घेऊन जाणे गरजेचे आहे.
स्टेप ८: शेड्युल अपॉइंटमेंट या टॅब मध्ये तुमच्या एरियाचा पिन कोड टाकून जवळचे कोविड सेंटर शोधा. त्यानंतर तुमच्या सोयीची तारीख टाकून अपॉइंटमेंट बुक करा.
स्टेप ९: अपॉइंटमेंट कन्फर्मेशन पेजवर तुमची सर्व माहिती दाखवण्यात येईल. माहिती बरोबर असल्यास तुम्ही कन्फर्म वर क्लिक करा.
स्टेप १०: रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज पाठवला जाईल.