दीपिका पदुकोण बायोग्राफी

| |

दीपिका पदुकोण बायोग्राफी (Dipika Padukone Biography)

दीपिका पदुकोण नाव तर सर्वाना माहित असेलच.

हिंदी चित्रपट सृष्टीतली आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती म्हणून दीपिकाची ओळख आहे.

तीन फिल्म फेअर अवॉर्ड्स मिळालेली दीपिका ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

भारतातील सर्वांत सुंदर आणि लोकप्रिय असलेल्या दीपिकाने २०१८ साली टाइम्सच्या शंभर प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान मिळवले होते.

कोंकणी कुटुंबात जन्मलेली दीपिका पदुकोण ही प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी.

तिचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी कोपेनहेग, डेन्मार्क येथे झाला तर तिचं संगोपन बंगळुरू येथे झालं.

लहानपणी तिला बॅडमिंटन खेळण्याची खूप आवड होती.

तिने बॅडमिंटनच्या राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियनशिप मध्येही भाग घेतला होता.

परंतु फॅशन मॉडेल होण्यासाठी तिने आपला हा खेळ सोडला.

तिने आपल्या मॉडेलिंगची सुरुवात लिरिल साबणाची टेलिव्हिजन जाहिरात करून केली.

त्यानंतर तिने अनेक ब्रॅड आणि उत्पादनांसाठी मॉडेलिंग केलं.

२००५ साली तिने किंगफिशर फॅशन अवॉर्ड्समध्ये “मॉडेल ऑफ द इयर” पुरस्कार जिंकला.

लवकरच तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या.

२००६ साली तिला ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या संधीसह तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

२००७ साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये डबल रोल करून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत धमाकेदार पदार्पण केलं.

हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि दीपिका रातोरात स्टार बनली होती. 

सुरुवातीचे जीवन

दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी कोपेनहेग, डेन्मार्क येथे एका कोंकणी भाषा बोलणाऱ्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला.

तिचे वडील प्रकाश पदुकोण हे व्यावसायिक बॅडमिंटनपटू होते तर आई ट्रॅव्हल एजंट आहे.

तिची लहान बहीण अनीशा ही गोल्फर आहे.

तिचे आजोबा रमेश हे म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी होते.

दीपिका एक वर्षाची असताना तिचे कुटुंब बंगलोरला येऊन स्थायिक झाले.

तिचे शालेय शिक्षण सोफिया हायस्कूल (Sophia High School) आणि माउंट कार्मेल कॉलेज (Mount Carmel College) येथून झाले आहे.

समाजशास्त्र या विषयात पदवी मिळवण्यासाठी तिने इंदिरा गांधी नॅशनल क्वीन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University) मध्ये प्रवेश घेतला होता परंतु मॉडेलिंग करिअरवर ताण पडत असल्यामुळे तिने पदवी शिक्षण अर्धवट सोडले.

लहानपणी दीपिका जास्त कोणामध्ये मिसळणारी नव्हती तिचे कोणी जास्त मित्र नव्हते.

तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू हा फक्त बॅडमिंटन होता जो ती फार कमी वयापासून खेळत आली होती.

२०१२ साली दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिची दिनचर्या सांगितली होती. ती सकाळी ५ वाजता उठायची, कसरत करायची,शाळेत जायची,नंतर बॅडमिंटन खेळायची, होमवर्क पूर्ण करायची आणि झोपी जायची.

आपल्या शैक्षणिक आणि खेळातील करिअरवर लक्ष केंद्रित करत असतानाच वयाच्या आठव्या वर्षी तिने काही जाहिरातींमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले.

दहावीमध्ये असताना तिने आपले ध्येय बदलून मॉडेलिंग करण्याकडे लक्ष केंद्रित केलं.

२००४ साली तिने प्रसाद बिदापा यांच्या अधिपत्याखाली मॉडेल म्हणून पूर्ण-काळ आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. 

करिअर 

२००६ साली ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या दीपिकाने ‘ओम शांती ओम’ या फराह खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमातून हिंदी चित्रपट सृष्टीत धमाकेदार पदार्पण केले.

या पदार्पणातील चित्रपटातच उठावदार कामगिरी केल्यामुळे दीपिका रातोरात स्टार बनली होती.

यानंतर तिने ‘बचना ए हसींनो’, ‘चांदनी चौक टु चायना’, ‘लव्ह आज कल’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फक्त हिंदी आणि कन्नड चित्रपट सृष्टीतच नाही तर हॉलीवूड चित्रपट सृष्टीतही तिने काम केले आहे. ‘एक्स एक्स एक्स-द रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटात तिने ‘विन डिझेल’ सोबत काम केले आहे.  

दीपिका पदुकोणने केलेल्या चित्रपटांची यादी

चित्रपटवर्षभाषा
ऐश्वर्या२००६ कन्नड
ओम शांती ओम२००७ हिंदी
बचना ऐ हसीनो२००८हिंदी
चांदनी चौक टू चायना२००९ हिंदी
लव्ह आज कल२००९ हिंदी
कार्तिक कॉलिंग कार्तिक२०१० हिंदी
हाउसफुल्ल२०१० हिंदी
लफंगे परिंदे२०१० हिंदी
ब्रेक के बाद२०१० हिंदी
खेलें हम जी जान से२०१० हिंदी
आरक्षण२०११ हिंदी
देसी बॉइज२०११ हिंदी
कॉकटेल२०१२ हिंदी
रेस २२०१३ हिंदी
ये जवानी है दीवानी२०१३ हिंदी
चेन्नई एक्सप्रेस२०१३ हिंदी
गोलियों की रासलीला राम-लीला२०१३ हिंदी
हैप्पी न्यू इयर२०१४ हिंदी
पिकू२०१५ हिंदी
तमाशा२०१५ हिंदी
बाजीराव मस्तानी२०१५ हिंदी
xXx: रिटर्न ऑफ़ ज़ेंडर केज२०१७ इंग्लिश
राब्ता२०१७ हिंदी
पद्मावत२०१८ हिंदी
छपाक२०२० हिंदी

वैयक्तिक आयुष्य 

२००८ मध्ये बचना ए हसीनो चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना, दीपिका रणबीर कपूर यांच्या प्रेमात होती.  त्याच्या नावाचा टॅटूही तिने आपल्या गळ्याभोवती काढला होता. तिने आपले प्रेमप्रकरण मोकळ्यापणाने सर्वांना सांगितले होते. मध्यंतरी तिचं नाव निहार पांड्या, युवराज सिंग, सिद्धार्थ मल्ल्या, उपेन पटेल या व्यक्तींसोबत जोडण्यात आले होते. परंतु २०१८ साली तिने रणवीर सिंग सोबत विवाह करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. २०१८ साली तिने स्वतःच्या प्रोडक्शन कंपनीची स्थापना केली आणि २०२० साली ‘छपाक’ या ऍसिड हल्ला पीडितेच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती केली. 

अशाप्रकारे आपण दीपिका पदुकोणबद्दल थोडीफार माहिती घेतली आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.  

आणखी वाचा: नोरा फतेही बायोग्राफी

Dipika Padukone Beautiful ImagesPin
Dipika Padukone Beautiful Images
Dipika Padukone Simple Look ImagesPin
Dipika Padukone Simple Look Images
Dipika Padukone Saree ImagesPin
Dipika Padukone Saree Images
Dipika Padukone Naughty ImagesPin
Dipika Padukone Naughty Images
Dipika Padukone Innocent Look ImagesPin
Dipika Padukone Innocent Look Images
Dipika Padukone ImagesPin
Dipika Padukone Images
Dipika Padukone Hot ImagesPin
Dipika Padukone Hot Images
Dipika Padukone Hot and Sexy ImagesPin
Dipika Padukone Hot and Sexy Images
Dipika Padukone Glamarous ImagesPin
Dipika Padukone Glamarous Images
Dipika Padukone ExpressionsPin
Dipika Padukone Expressions
Dipika Padukone Decent Look ImagesPin
Dipika Padukone Decent Look Images
Dipika Padukone Cute Smile ImagesPin
Dipika Padukone Cute Smile Images
Dipika Padukone Bold LookPin
Dipika Padukone Bold Look
Dipika Padukone Bold ImagesPin
Dipika Padukone Bold Images
Dipika Padukone Bold and Hot ImagesPin
Dipika Padukone Bold and Hot Images
Previous

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | राज्यसरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु होण्याची चिन्हे

Next

Leave a Comment