यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु होण्याची चिन्हे

| |

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सदोदित प्रयत्नशील असणारे महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत अजून एक महत्त्वाचे पाऊल उचलताना दिसत आहेत.

रत्नागिरीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

रत्नागिरीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नेहमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून त्यांच्या हितासाठीचे निर्णय घेत आलेले आहेत.

त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम आणि द्वितीय वर्षातील मुलांच्या परीक्षा न घेणे, ऑनलाईन शिकवणी चालू करणे, ७५ टक्क्यांच्या हजेरीबाबतचा निर्णय असे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत.

आताही विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु व्हावे या दिशेने उदय सामंत यांनी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

कालच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे यासंबंधी बैठक घेतली.

cabinet minister uday samant chaired meeting at collector office about ycmou and kavi kulaguru kalidas sanskrit vishwavidyalaya regional centre in ratnagiriPin
Cabinet Minister Uday Samant Chaired Meeting at Collector Office About YCMOU Regional Centre in Ratnagiri

या बैठकीत प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, संचालक धनराज माने, कुलगुरू इ. वायुनंदन, अपर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यासोबतच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक या विद्यापीठाचेदेखील उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करण्यासाठी ते आग्रही आहेत.

यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या बैठकीत उदय सामंत यांच्यासह प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, संचालक धनराज माने, कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरीमध्ये ही दोन्ही उपकेंद्र सुरु झालयास रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना जवळच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल.

याशिवाय शिकण्याची इच्छा असणाऱ्या नोकरदार वर्गाला दूरस्थ शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भूमिका महत्वाची ठरू शकते.

Previous

दीपिका पदुकोण बायोग्राफी

भारतीय मातीतून २४ देशांना कोविड वॅक्सिनचा पुरवठा

Next

Leave a Comment