शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार । Shabdyogi Avyay v Tyache Prakar

| |

मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातींमधील पुढचा महत्त्वपूर्ण घटक आहे शब्दयोगी अव्यय. या लेखात आपण शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार (Shabdyogi Avyay v Tyache Prakar) सविस्तरपणे पाहणार आहोत. 

सर्वप्रथम आपण शब्दयोगी अव्यय (Shabdyogi Avyay in Marathi) म्हणजे काय ते पाहू. 

शब्दयोगी अव्यय (Preposition in Marathi)

वाक्यातील असे शब्द जे स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोघांच्या सहयोगाने तयार झालेला नवीन शब्द वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतो. अशा जोडून आलेल्या शब्दांना शब्दयोगी अव्यय (Shabd Yogi Avyay in Marathi) असे म्हणतात. 

उदा. १. घरासमोर मोठे पटांगण आहे.

       २. त्याने झाडावर दगड मारला.

       ३. त्याच्याजवळ खूप पुस्तके आहेत. 

वरील वाक्यांमध्ये समोर, वर, जवळ हि शब्दयोगी अव्यये आहेत. 

शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये 

  • शब्दयोगी अव्ययाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. काही वेळा ते क्रियापदे किंवा क्रियाविशेषणे यांनासुद्धा जोडून येतात. 
  • शब्दयोगी अव्यय हा अविकारी शब्द असतो. त्यात लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
  • शब्दयोगी अव्यय ज्या शब्दाला जोडून येते त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवते. 
  • शब्दयोगी अव्यये ज्या शब्दाला जोडून येतात त्याच्या मागील शब्दाचे सामान्यरूप होते.

आता आपण शब्दयोगी अव्ययाचे प्रकार सविस्तरपणे पाहू. 

आणखी वाचा : उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्ययाचे प्रकार (Shabdyogi Avyay v Tyache Prakar)

शब्दयोगी अव्ययाचे खालील प्रकार आहेत. 

१. कालवाचक शब्दयोगी अव्यय

२. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय

३. करणवाचक शब्दयोगी अव्यय

४. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय

५. व्यक्तिरेखा वाचक शब्दयोगी अव्यय

६. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय

७. योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय

८. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय

९. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

१०. संबंधवाचक शब्दयोगी अव्यय

११. साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय

१२. भागवाचक शब्दयोगी अव्यय

१३. विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय

१४. दिकवाचक शब्दयोगी अव्यय

१५. विरोधावाचक शब्दयोगी अव्यय

१६. परिणाम वाचक शब्दयोगी अव्यय

१. कालवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.

अ) तो दुपारनंतर येईल. 

आ) मी तिथपर्यंत जात आहे. 

२. स्थलवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.

अ) घरापुढे विहीर आहे. 

आ) देवळानजीक त्यांचे घर आहे.

आणखी वाचा : नाम आणि नामाचे प्रकार

३. करणवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती

अ) हे सर्व तुझ्यामुळे झालं. 

आ) मी राहुलकडून पुस्तक घेतले. 

४. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव

अ) पूजेनिमित्त कीर्तन ठेवण्यात आले आहे. 

आ) देवाकरिता नैवेद्य बनवला आहे.

आणखी वाचा : विशेषण व त्याचे प्रकार

५. व्यक्तिरेखा वाचक शब्दयोगी अव्यय

उदा. शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता

अ) सागरव्यतिरिक्त हे काम दुसरं कोणीच करू शकत नाही. 

आ) हे करण्यावाचून आता पर्याय नाही. 

६. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय

उदा. पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस

अ) भाजीपेक्षा आमटी गरम, आहे. 

आ) या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे.

आणखी वाचा : सर्वनाम व त्याचे प्रकार

७. योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय

उदा. योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम

अ) तो चंद्राप्रमाणे शीतल आहे. 

आ) प्रतीक चित्त्यासारखा चपळ आहे. 

८. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. मात्र, ना, पण, फक्त, केवळ

अ) त्याचा काडीमात्र उपयोग नाही.

आ) मी त्यालापण सोबत घेतले.

आणखी वाचा : क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार

९. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त

अ) मी पाचही आंबे खाऊन टाकले. 

आ) आता फक्त काही क्षण शिल्लक आहेत. 

१०. संबंधवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. विषयी, विशी

अ) मला त्या पुस्तकाविषयी थोडी माहिती हवी आहे.

आणखी वाचा : शब्दांच्या जाती 

११. साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत

अ) मी सुकेशबरोबर बाहेर जात आहे.

आ) राजेशसकट आपण दहा जण आहोत.

१२. भागवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. पैकी, पोटी, आतून

अ) मला शंभरपैकी नव्वद गुण मिळाले.

आ) दहातून तीन वजा केले. 

आणखी वाचा : क्रियापद व त्याचे प्रकार

१३. विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. बद्दल, ऐवजी, जागी, बदली

अ) भेंडीऐवजी मी कोबी आणली. 

आ) राहुलच्या बदली आपण प्रतीकला घेऊन जाऊ. 

१४. दिकवाचक शब्दयोगी अव्यय

उदा. प्रत, प्रति, कडे, लागी

अ) त्याने देवाकडे मागणे मागितले. 

आ) मुक्या प्राण्यांप्रती सहानुभूती दाखवली पाहिजे.

आणखी वाचा : केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

१५. विरोधावाचक शब्दयोगी अव्यय

उदा. विरुद्ध, वीण, उलटे, उलट

अ) प्रवाहाविरुद्ध चालणाराच आयुष्यामध्ये प्रगती करतो. 

आ) तुजविण मला कोणीही वाली नाही. 

१६. परिणाम वाचक शब्दयोगी अव्यय

उदा. भर

अ) आम्ही झाडावरून टोपलीभर पेरू काढले.

वाचकहो या लेखातील शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार (Shabdyogi Avyay v Tyache Prakar) याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हांला कंमेंटद्वारे जरूर कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. 

Previous

क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार । Kriyavisheshan Avyay va Tyache Prakar 

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार । Ubhayanvayi Avyay v Tyache Prakar

Next

Leave a Comment