व्हाट्सअ‍पला भारतीय पर्याय, संदेस अ‍ॅप (Sandes App) सर्वांसाठी उपलब्ध! जाणून घ्या काय आहे खास

| | ,

व्हाट्सअ‍प वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर आहे.

प्रायव्हसी पॉलिसी मुळे वादात अडकणाऱ्या व्हाट्सअप ला आता देशी पर्याय आला आहे. (Sandes App – Indian Whatsapp Alternative)

व्हाट्सअपच्या बदल करण्यात आलेल्या प्रायव्हसी पॉलिसी मुळे खूप यूजर्सनी आपला मोर्चा सिग्नल आणि अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपकडे वळवला आहे.

अशातच भारतीय युजर्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे भारत सरकारने व्हाट्सअपचं देशी व्हर्जन लाँच केले आहे आणि ते आता सर्वसामान्यांसाठीही खुले करण्यात आले आहे.

संदेस असं या मेसेजिंग अ‍ॅपच नाव आहे.

Government Insatant Messaging System GIMS AppPin
Government Insatant Messaging System GIMS App

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांनी हे मेड इन इंडिया अ‍ॅप बनवलं असून केंद्र सरकारने हे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत सादर केले आहे.

सुरुवातीला फक्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वापरासाठी उपलब्ध असलेले हे अ‍ॅप आता सर्वसामान्य लोकांसाठी देखील खुले करण्यात आले आहे.

त्यामुळे व्हाटसअप च्या प्रायव्हसी पॉलिसी मुळे संभ्रमात पडणाऱ्या वापरकर्त्यांना आता देशी पर्याय उपलब्ध झाला आहे.

काय आहे खास?

संदेस अ‍ॅपचा इंटरफेस व्हाट्सअप सारखाच आहे.

व्हाट्सअपची बहुतेक फीचर्स आपल्याला यामध्ये पहायला मिळतील.

यासोबतच आणखी काही खास आणि इंटरेस्टिंग फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत.

व्हाट्सअपमध्ये फक्त मोबाईल नंबर वापरून अकाउंट सुरु करता येत होते परंतु संदेस अ‍ॅपमध्ये मोबाईल नंबर सोबतच ई-मेल आयडी वापरून देखील अकाउंट सुरु करता येणार आहे.

तुमची चॅटिंग एंड टू एंड इन्स्क्रिप्टेड (End to End Encrypted) असेल, म्हणजे दोघांच्या संभाषणात कोणीही तिसरा ढवळाढवळ करू शकणार नाही.

या अ‍ॅपमध्ये ५०० एम बी पर्यंत व्हिडीओज आणि इमेजेस पाठवू शकतो जे व्हाट्सअप पेक्षा जास्त आहे.

Sandes App Share Options, GIMS Share OptionsPin
Sandes App Share Options

कार्यालयीन वापरासाठी यामध्ये Gimoji देण्यात आले आहेत.

Sandes App GimojiPin
Sandes App Gimoji

याशिवाय Confidential, Priority आणि Auto Delete यांसारखे tags ही देण्यात आले आहेत.

Sandes App TagsPin
Sandes App Tags

Confidential हा टॅग वापरून एखाद्या व्यक्तीला मेसेज किंवा एखादी फाईल पाठवल्यास ती व्यक्ती तो मेसेज किंवा फाईल कॉपी करू शकत नाही इतकेच नाही तर तो कोणाला फॉरवर्ड ही करू शकत नाही.

याप्रमाणेच Auto Delete हा टॅग वापरून पाठवलेला मेसेज किंवा फाईल त्या व्यक्तीने रीड करून झाल्यानंतर आपोआप Delete होईल.

Sandes App Font StylePin
Sandes App Font Style

आहेत कि नाही भन्नाट फीचर्स!

त्यामुळे वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने हे मेड इन इंडिया अ‍ॅप व्हाट्सअप साठी उत्तम पर्यायी अ‍ॅप आहे.

कसं करणार डाऊनलोड?

संदेस अ‍ॅप फक्त gims.gov.in या भारत सरकारच्या साईटवर उपलब्ध आहे.

हे अ‍ॅप सध्या कोणत्याही प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

अँड्रॉइड आणि आय ओ एस सिस्टिम्स साठी तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपबद्दल दिलेल्या साईट वर तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

स्टेप १: https://www.gims.gov.in/dash/dlink या लिंक वरती क्लिक करा.
स्टेप २: आपल्या मोबाईल प्रमाणे अँड्रॉइड किंवा आय ओ एस व्हर्जन डाउनलोड करा.
स्टेप ३: डाउनलोड झालेली APK फाईल आपल्या डिव्हाईस मध्ये इन्स्टॉल करा.
स्टेप ४: मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी वापरून तुमचे अकाउंट सुरु करा.

महत्वाची टिप्पणी: डाऊनलोड करतेवेळी या अ‍ॅपचे नाव GIMS (Government Instant Messaging System) असं दिसेल परंतु सरकारने याला ‘संदेस’
हे नाव दिले आहे.

Previous

IPL Auction २०२१: चेतेश्वर पुजारा चेन्नईच्या संघात तर ऍरॉन फिंच अनसोल्ड!

सॅमसंगचे तीन नवीन स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीला… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Next

Leave a Comment