आयपीएल २०२१ चा लिलाव पार पडला आहे.(IPL Auction 2021 Season 14 Full Players List)
चेन्नई येथे झालेल्या या लिलावात २९८ खेळाडूंची बोली लावण्यात आली होती त्यापैकी ५७ खेळाडूंना खरेदी करण्यात ८ फ्रेंचायजीनी रुची दाखवली.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हा आयपीएल च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. १६.७५ कोटी इतक्या मोठ्या किंमतीसह राजस्थान रॉयल्सने (RR) त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज कायले जॅमीन्सन याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने १५ कोटी किंमत मोजून खरेदी केले. हा या मोसमातील दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे.
यासोबतच ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यालाही १४ कोटी २५ लाख रुपये मोजून आरसीबी(RCB)ने आपल्या ताफ्यात घेतले आहे.
IPL Auction 2021: बेस प्राईझ मध्ये खेळाडूंची खरेदी.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याला २ कोटी या बेस प्राईझ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) तर केदार जाधव यालाही बेस प्राईझ २ कोटी मध्ये सनरायजर्स हैदराबादने (SRH) खरेदी केले आहे.
याशिवाय IPL Auction 2021मध्ये बेस प्राईझ ला खरेदी केलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत.
- अर्जुन तेंडुलकर – २० लाख बेस प्राईझ – मुंबई (MI)
- सुयश प्रभुदेसाई- २० लाख बेस प्राईझ – बंगलोर (RCB)
- एम हरिशंकर – २० लाख बेस प्राईझ – चेन्नई (CSK)
- कुलदीप यादव – २० लाख बेस प्राईझ – राजस्थान (RR)
- जेम्स निशम – ५० लाख बेस प्राईझ – मुंबई (MI)
- फॅबियन एलन – ७५ लाख बेस प्राईझ – पंजाब (PK)
- वैभव अरोरा – २० लाख बेस प्राईझ – कोलकाता (KKR)
- जलज सक्सेना – ३० लाख बेस प्राईझ – पंजाब (PK)
- एम सिद्धार्थ – २० लाख बेस प्राईझ – दिल्ली (DC)
- विष्णु विनोद – २० लाख बेस प्राईझ – दिल्ली (DC)
- मोहम्मद अजहरुद्दीन – २० लाख बेस प्राईझ – बंगलोर (RCB)
- लुकमान हुसैन मेरीवाला – २० लाख बेस प्राईझ – दिल्ली (DC)
चेतेश्वर पुजारा चेन्नईकडून खेळणार.
भारताकडून फक्त कसोटी सामने खेळणारा चेतेश्वर पुजारा आयपीएल च्या या हंगामात चेन्नई कडून खेळताना दिसणार आहे.
पुजाराला २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणत्या फ्रँचायजीने खरेदी केलं आहे. चेन्नईने त्याला ५० लाखाच्या बेस प्राईझ वर खरेदी केले आहे.
बोली लागलेले खेळाडू (Top Players Sold in IPL Auction 2021)
- मोसेस हेनरिक्स – ४.२ कोटी – पंजाब (PK)
- टॉम करन – ५.२५ कोटी – दिल्ली (DC)
- चेतन सकारिया – १.२ कोटी – राजस्थान (RR)
- कृष्णप्पा गौतम – ९.२५ कोटी – चेन्नई (CSK)
- शाहरुख खान – ५.२५ कोटी – पंजाब (PK)
- पियूष चावला – २.४० कोटी – मुंबई (MI)
- डॅनियल क्रिश्चियन – ४.८ कोटी – बंगलोर (RCB)
बोली न लागलेले खेळाडू (Unsold Players in IPL Auction 2021)
- मार्नस लाबुशने
- हनुमा विहारी
- गुरकीरत मान
- मॅथ्यू वेड
- थिसारा परेरा
- वरुण एरॉन
- ओशेन थॉमस
- मोहित शर्मा
- बिली स्टॅनलेक
- मिचेल मॅक्लॅनघन
- जेसन बेहरनडॉर्फ
पंजाबने सर्वाधिक ९ खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. तर हैदराबादने सर्वात कमी म्हणजेच 3 खेळाडू घेतले. बंगलोर, राजस्थान, कोलकाता आणि दिल्ली ने प्रत्येकी 8 खेळाडू खरेदी केले.