पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू व केरळ दौरा | करणार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन | अर्जुन रणगाडा (Arjun MBT MK-1A) होणार सैन्यात सामील

| | ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई आणि कोची दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

भारतीय बनावटीच्या अर्जुन मेन बॅटल टॅंक एमके- १ए या रणगाड्याचे हस्तांतरण आज मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (Prime Minister Narendra Modi to Visit Chennai and Kochi and Hand Over Arjun Main Battle Tank to Indian Army).

पंतप्रधान मोदी हा रणगाडा आज औपचारिकरीत्या भारतीय सैन्याला सुपूर्त करतील.

Prime Minister Narendra Modi Hand Over Arjun Main Battle Tank to Indian ArmyPin
Prime Minister Narendra Modi Hand Over Arjun Main Battle Tank to Indian Army

हा रणगाडा कॉम्बॅट व्हेइकल रिसर्च डेव्हलपमेंट इष्टाब्लिशमेंट (Combat Vehicles Research and Development Establishment) चेन्नई यांनी डिझाईन, विकसित आणि तयार केलाआहे.

संपूर्ण चाचण्या पार पाडल्यानंतर हा रणगाडा आज भारतीय सैन्यामध्ये सेवा बजावण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रोपेलिन डेरीवेटीव्हज पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचं अनावरण

त्याबरोबरच या दौऱ्यावर नरेंद्र मोदी आणखी काही गोष्टींचे उदघाट्न करणार आहेत.

यातील महत्वाची गोष्ट म्हणजे कोची रिफायनरीमधील नवीन प्रोपेलिन डेरीवेटीव्हज पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचं अनावरण मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.

आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देणाऱ्या या प्रकल्पामध्ये ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

दरसाल ३.२९ लाख टन इंधन कॅपॅसिटी असलेल्या या कॉम्प्लेक्सची खास बात ही आहे की कोची रिफायनरी ही आधुनिक रिफायनरी सोबतच एक पेट्रोकेमिकल युनिट म्हणून पुढे येणार आहे.

सध्या परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या एका विशिष्ट पेट्रोकेमिकलची निर्मिती करणारी भारतातील पहिली रिफायनरी होण्याचा मान कोची रिफायनरीला मिळणार आहे.

त्यामुळे वार्षिक ४००० कोटी रुपयांपर्यंत बचत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे जवळपास ५०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचं उदघाटन

चेन्नई आणि कोची दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी कोची बंदर येथे ‘सागरिका’ या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे उदघाटन करणार आहेत.

सोबतच ‘विज्ञान सागर’ या सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचं (Marine Engineering Training Institute, Vigyana Sagar) उदघाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

रो रो जहाज देशाला समर्पित आणि साऊथ कोल बर्थच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन

एवढ्यावरच न थांबता नरेंद्र मोदी कोची बंदरावरील साऊथ कोल बर्थच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजनही करणार आहेत.

पंतप्रधान मोदी विलिंग्डन बेटावर रो रो जहाज देशाला समर्पित करणार आहेत.

भारतीय अंतरराष्ट्रीय जलमार्ग प्राधिकरण राष्ट्रीय जलमार्ग – ३ वर बोलगाटी आणि विलिंग्डनमध्ये दोन नवीन रोल ऑन/रोल ऑफ जहाज तैनात करण्यात येणार आहेत.

या सेवेमुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि खर्च कमी होणार आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळणार आहे.

मेट्रो रेल्वे फेज-१ एक्स्टेंशनचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७७० कोटी रुपये खर्च आलेल्या चेन्नई मेट्रो रेल्वे फेज-१ चे वाशरमेनपेट ते विम्को नगरपर्यंत प्रवासी सेवेला हिरवा कंदील दाखवून रवाना करणार आहेत.

९.०५ किमी लांबीचा हा विस्तारित मार्ग उत्तरी चेन्नईला एयरपोर्ट आणि सेंट्रल रेलवे स्टेशनला जोडण्याचे काम करेल.

Prime Minister Narendra Modi Inaugurate Chennai Metro Ph-1 ExtensionPin
Prime Minister Narendra Modi Inaugurate Chennai Metro Ph-1 Extension

त्याचबरोबर मोदी ‘चेन्नई बीच आणि अट्टिपट्टु’ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनचं देखील उदघाटन करणार आहेत.

२९३.४० करोड रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा २२.१ किमीचा मार्ग चेन्नई आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांतून जातो व चेन्नई बंदर आणि एन्नोर बंदर यांना एकमेकांना जोडतो.

यानंतर विल्लुपुरम- कुड्डालोर- मयिलादुथुरई- थंजावुर आणि मयिलादुथुरई- थिरुवरुर याठिकाणी सिंगल लाईन रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे उद्धघाटनही करणार आहेत.

यामुळे चेन्नई एग्मोर आणि कन्याकुमारी दरम्यात प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

अशा काहीशा व्यस्त अशा दौऱ्याची सुरुवात दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. यु ट्यूब, ट्विटर आणि फेसबुक वर याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

Previous

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण (Pulwama Terror Attack), शहीदांना आदरांजली

जम्मू काश्मीरमध्ये ७ किलो विस्फोटक जप्त | पुलवामा आतंकवादी घटनेच्या द्वितीय स्मृतिदिनी हल्ल्याचा होता कट

Next

Leave a Comment