पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण (Pulwama Terror Attack), शहीदांना आदरांजली

| |

भारतीयांच्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. (2 Years Completed to Pulwama Terror Attack).

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले होते.

संपूर्ण देशात या शहिदांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

या ४० शहीद जवानांमध्ये CRPF च्या ७६ व्या बटालियनच्या ५ जवानांचा समावेश होता. या सर्व शहीदांना आज CRPF च्या ७६ व्या बटालियन तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

नवी दिल्ली येथील इन्टिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या (IDS) मुख्यालयात पुलवामा हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्याचबरोबर पाकिस्तानच्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी CRPF च्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

त्यावेळी त्या बसमधून प्रवास करत असलेले ४० जवान शहीद झाले होते.

या घटनेने संपूर्ण देशाला जबरदस्त धक्का बसला होता.

या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती आहे.

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्जिकल स्ट्राइक केला होता आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त करून टाकले होते.

जम्मूच्या CRPF मुख्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.

या ७६ व्या बटालियनमधील जवानांनी आपल्या काही खास मित्रांना गमावलंय. त्यामुळे आपल्या मित्रांचे बलिदान वाया जाऊ न देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous

हॅपी व्हॅलेंटाईन डे इमेजेस मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू व केरळ दौरा | करणार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन | अर्जुन रणगाडा (Arjun MBT MK-1A) होणार सैन्यात सामील

Next

Leave a Comment