यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु होण्याची चिन्हे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सदोदित प्रयत्नशील असणारे महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत अजून एक महत्त्वाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरु करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रत्नागिरीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नेहमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून त्यांच्या हितासाठीचे निर्णय घेत आलेले आहेत. त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम आणि द्वितीय वर्षातील मुलांच्या परीक्षा न घेणे, ऑनलाईन शिकवणी चालू करणे, ७५ टक्क्यांच्या हजेरीबाबतचा निर्णय असे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. आताही विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे
Read more